Maharashtra Rain: आज पुन्हा पाऊस झोडपणार; लातूर जिल्ह्यात वीज पडून 2 ठार, कुठे किती पाऊस होणार, वाचा
Maharashtra Rain : महाराष्ट्रात आज पुन्हा जोरदार पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. तर काल झालेल्या जोरदार पावसाने मुंबईची तुंबई झाली तर लातूर जिल्ह्यात वीज पडून २ जणांचा मृत्यू तर ६ जण जखमी झाले आहेत.
मान्सूनच्या पावसाचे केरळमध्ये २४ जोरदार पावसाचे आगमन झाले आहे तर महाराष्ट्रातील देवगड येथे मान्सूनने २५ मे रोजी प्रवेश केला. यादरम्यान काल महाराष्ट्रातील मुंबईसह अनेक जिल्ह्यात अतीमुसळधार पाऊस झाला. आजही मान्सूनपुर्व पावसाची शक्यता आहे.

कुठे कसा पडणार पाऊस?
कोकण-मुंबई
राज्यातील कोकण विभागात तसेच मुंबई शहर आणि उपनगरात आज तुरळक ते मुसळधार पावसाची शक्यता आहे. जवळपास चार मीटर उंच लाटा किनाऱ्यावर येतील अशी शक्यता आहे. तर रत्नागिरी आणि सिंधुदुर्गमध्येही जोरदार पाऊस होऊ शकतो.
मध्य महाराष्ट्र- पुणे, सातारा, सांगली
मध्य महाराष्ट्रातील पुणे सातारा सांगली आणि जवळच्या भागात ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. या जिल्ह्यात मेघगर्जनेसह मुसळधार पावसाची शक्यता आहे. तापमानातही घट झालेली दिसून येत आहे.
मराठवाडा
मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगर, जालना, बीडसह काही जिल्ह्यात जिल्ह्यात हलका ते मध्यम स्वरुपाचा पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागाने व्यक्त केली आहे.
विदर्भ
विदर्भात नागपूर, चंद्रपूर आणि इतह जिल्ह्यात उष्णतेची लाट कायम असून या काळात या भागात हलका पाऊस पडण्याची शक्यता आहे.
उत्तर महाराष्ट्र
उत्तर महाराष्ट्रातील जळगाव आणि नाशिक येथे हलक्या ते मध्यम पावसाची शक्यता आहे तर त्र्यंबकेश्वर आणि ईगतपुरी येथे जोरदार पावसाची शक्यता आहे.
धाराशिव जिल्ह्यात मुसळधार पाऊस
धाराशिव जिल्ह्यात अनेक ठिकाणी काल मुसळधार पाऊस झाला, धाराशिव शहराने परिसरात सायंकाळच्या सुमारास झालेल्या पावसामुळे सर्वत्र पाणी साचल्याचे दिसून आले जिल्ह्यात अनेक ठिकाणी नदी नाले वाहते झाले
मे मध्येच नदी नाल्यांना पाणी आल्याने बळीराजा खरिपाच्या पेरणीची तयारी करत असल्याचे दिसून येत आहे
लातूर जिल्ह्यात वीज कोसळून दोन जण ठार
लातूर जिल्ह्याच्या अहमदपूर तालुक्यातील गोताळा या गावात पाऊस पडत असल्यामुळे झाडाखाली थांबलेल्या ०८ जणांवर वीज कोसळली. ज्यात ०२ जणांचा जागीच मृत्यू झाला तर इतर ०६ जण गंभीर जखमी झाले आहेत. काल २६ मे रोजी सायंकाळच्या सुमारास ही घटना घडली. मृतांमध्ये ५५ वर्षीय विक्रम सोपान कारले आणि ५५ वर्षीय रंजनाबाई संमुखराव यांचा समावेश आहे. जखमींना अहमदपूरच्या ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. जखमींची सहकारमंत्री बाबासाहेब पाटील यांनी रुग्णालयात जाऊन चौकशी केली.












Click it and Unblock the Notifications