तटकरेंचा हात डोक्यावर होता म्हणून चाकणकरांना अहंकार, आता थेट मकोका लावण्याची मागणी
महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांच्या राजीनाम्यानंतर राजकारण कमालीचे तापले असून, शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी त्यांच्यावर टीकेची तोफ डागली आहे. अशोक खरात प्रकरणात चाकणकर यांचा केवळ राजीनामा पुरेसा नसून, त्यांना या गुन्ह्यात सहआरोपी करून अटक करण्याची मागणी अंधारे यांनी केली आहे.

तटकरेंचा वरदहस्त आणि फडणवीसांचा दणका
सुषमा अंधारे यांनी चाकणकर यांच्या राजकीय अहंकारावर बोट ठेवत म्हटले की, सुनील तटकरे यांच्यासारख्या ज्येष्ठ नेत्यांचा आशीर्वाद पाठीशी असेपर्यंत आपल्याला कुणीही धक्का लावू शकत नाही, अशा भ्रमात चाकणकर वावरत होत्या. मात्र, गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कारवाईचा बडगा उगारताच त्यांचे हे मनसुबे धुळीला मिळाले आहेत. सत्तेच्या हवेत उडणाऱ्या चाकणकर आता जमिनीवर आल्या असून, येणाऱ्या काळात त्या आणखी खाली जातील, असा टोलाही त्यांनी लगावला.
कथनी आणि करणीतील फरक उघडा
चाकणकर यांच्या सार्वजनिक प्रतिमेवर प्रहार करताना अंधारे यांनी त्यांच्या दुटप्पी भूमिकेवर टीका केली. जाहीर व्यासपीठावरून 'मुलींच्या हातात पोथ्या नको तर संविधान द्या' असे सांगणाऱ्या चाकणकर प्रत्यक्षात मात्र अंधश्रद्धेच्या आहारी गेल्या आहेत, असा आरोप अंधारे यांनी केला. रिल्ससाठी पतीकडून पूजा करून घेणे आणि प्रत्यक्षात मात्र कोणाचे तरी पाय धुणे, ही त्यांची खरी वस्तुस्थिती समोर आल्यानेच त्या सध्या सैरभैर झाल्या आहेत, असेही अंधारे म्हणाल्या.
५००-६०० कोटींची संपत्ती आणि 'मकोका'ची मागणी
अशोक खरात याच्या माध्यमातून चालवल्या जाणाऱ्या कथित संघटित गुन्हेगारीत चाकणकर यांचा सहभाग असल्याचा दावा करत, त्यांच्यावर 'मकोका' अंतर्गत कारवाई व्हायला हवी, असे अंधारे यांनी ठणकावून सांगितले. चाकणकर यांनी आतापर्यंत ५०० ते ६०० कोटींची अफाट संपत्ती जमवली असून, याच संपत्तीच्या जोरावर त्या डॅमेज कंट्रोल करण्याचा प्रयत्न करत आहेत. मात्र, "बुंद से गयी वो हौद से नही आती," या शब्दांत अंधारे यांनी त्यांची कायदेशीर नोटीसची धमकी फेटाळून लावली आहे.
-
सागरी सुरक्षा वाढवण्यासाठी APSEZ ने उभारले भारतातील पहिले 'पोर्ट ऑफ रिफ्यूज' -
सागरी सुरक्षा वाढवण्यासाठी APSEZ ने उभारले भारतातील पहिले 'पोर्ट ऑफ रिफ्यूज' -
अदानी आणि यूथ4जॉब्स यांची 'ग्लोबल ॲबिलिटी फोटोग्राफी चॅलेंज 2026' साठी भागीदारी -
चाकणकरांच्या राजीनाम्याने वाद मिटणार नाही; सुनील तटकरेंनाही 'सहआरोपी' करा! तटकरेंवर गंभीर आरोप -
आदित्य ठाकरे फिरत नाहीत अन् प्रियंका चतुर्वेदींचा उपयोग काय?" ठाकरे गटाच्या बैठकीत खासदारांचा संताप








Click it and Unblock the Notifications