मोठी बातमी ! अनेक वर्षांचा दुष्काळ संपणार! इराणकडून भारताला सर्वात मोठी ऑफर
अमेरिका आणि इराण यांच्यातील वाढत्या तणावाच्या पार्श्वभूमीवर जागतिक ऊर्जा बाजारपेठेत मोठी खळबळ उडाली असतानाच, भारतासाठी एक अत्यंत महत्त्वाची बातमी समोर आली आहे. इराणने तब्बल सात वर्षांनंतर भारताला पुन्हा एकदा कच्चे तेल खरेदी करण्याची मोठी ऑफर दिली आहे. डोनाल्ड ट्रम्प प्रशासनाने इराणवरील निर्बंधांमध्ये काही काळासाठी शिथिलता दिल्यानंतर या हालचालींना वेग आला असून, यामुळे भारतीय बाजारपेठेत इंधनाचे दर कमी होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

सध्या आखाती देशांमध्ये युद्धजन्य परिस्थिती असल्याने होर्मुजची सामुद्रधुनी बंद झाली आहे, ज्याचा थेट परिणाम भारताच्या ऊर्जा पुरवठ्यावर झाला असून देशात कच्च्या तेलासोबतच एलपीजीचाही मोठा तुटवडा जाणवत आहे. या संकटाच्या काळात इराणने भारताला मदतीचा हात पुढे केला आहे. २०१९ पासून अमेरिकेच्या कडक निर्बंधांमुळे भारताने इराणकडून तेल खरेदी थांबवली होती, मात्र आता बदलत्या जागतिक समीकरणांमुळे ही कोंडी फुटताना दिसत आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, इराणच्या राष्ट्रीय तेल कंपनीने आणि तिथल्या व्यापाऱ्यांनी भारतीय रिफायनरी कंपन्यांना कच्चे तेल आणि एलपीजी खरेदीसाठी सुमारे एका महिन्याची मुदत दिली आहे. विशेष म्हणजे, ट्रम्प प्रशासनाने २० मार्च ते १९ एप्रिल या कालावधीसाठी ही विशेष सवलत जाहीर केली आहे. या ऑफरनुसार, इराणी तेल 'ICE ब्रेंट'च्या तुलनेत प्रति बॅरल ६ ते ८ डॉलर प्रीमियम दराने उपलब्ध होऊ शकते. पेमेंटच्या बाबतीतही इराणने लवचिकता दाखवली असून, काही व्यापाऱ्यांनी डॉलरमध्ये तर काहींनी चक्क भारतीय रुपयांत व्यवहार करण्याची तयारी दर्शवली आहे. माल पोहोचल्यानंतर सात दिवसांच्या आत हे पेमेंट करावे लागणार आहे.
भारताने यापूर्वीच रशियाकडून मोठ्या प्रमाणात तेल खरेदी करून आपली गरज भागवली आहे, मात्र आता इराणकडून मिळालेली ही ऑफर भारताची ऊर्जा सुरक्षा भक्कम करण्यासाठी आणि देशांतर्गत इंधन टंचाई दूर करण्यासाठी महत्त्वाची ठरू शकते. जर हा व्यवहार यशस्वी झाला, तर सात वर्षांनंतर पहिल्यांदाच इराणी तेल भारतीय बंदरांवर उतरताना दिसेल, ज्यामुळे सर्वसामान्यांना महागाईतून काहीसा दिलासा मिळण्याची चिन्हे आहेत.
-
साताऱ्यात 'ऑपरेशन लोटस' यशस्वी, पण खुर्ची धोक्यात? जिल्हा परिषद अध्यक्षांचे प्रमाणपत्रच 'बोगस'? -
SRH च्या गोटात राडा! ईशानची विकेट घेताच अन्सारीचा संयम सुटला; भर मैदानात नेमकं काय घडलं? -
VerSe Innovation चा नफा आणि AI-आधारित वाढीकडे कल, भविष्यात IPO चे नियोजन -
साताऱ्यात 'ऑपरेशन लोटस' यशस्वी, पण खुर्ची धोक्यात? जिल्हा परिषद अध्यक्षांचे प्रमाणपत्रच 'बोगस'? -
लिव्ह-इन, लॅविश लाईफ आणि ३५० कोटींची माया; 'मेजर इक्बाल' अर्जुनचा पडद्यामागचा शाही थाट -
दिलासा की धक्का? गॅस सिलिंडरबाबत सरकारने घेतला असा निर्णय, जो कुणीही अपेक्षित धरला नव्हता! -
SRH च्या गोटात राडा! ईशानची विकेट घेताच अन्सारीचा संयम सुटला; भर मैदानात नेमकं काय घडलं?







Click it and Unblock the Notifications