DA Hike सरकारी कर्मचाऱ्यांसाठी खूशखबर! महागाई भत्त्यात 5% वाढ; पगार वाढणार 'या' राज्याचा मोठा निर्णय
DA Hike Tripura govt Dearness Allowance hike 5 percent : देशात एकीकडे नवीन वेतन आयोगाची चर्चा रंगत असताना, दुसरीकडे त्रिपुरा सरकारने आपल्या कर्मचाऱ्यांना मोठी होळी भेट दिली आहे. त्रिपुराचे मुख्यमंत्री माणिक साहा यांनी सरकारी कर्मचारी आणि पेन्शनधारकांसाठी महागाई भत्त्यात (DA/DR) ५ टक्क्यांची वाढ करण्याची ऐतिहासिक घोषणा केली आहे. वाढत्या महागाईच्या काळात कर्मचाऱ्यांना दिलासा देण्याच्या उद्देशाने सरकारने हे पाऊल उचलले असून, यामुळे लाखो कुटुंबांच्या आर्थिक स्थितीत सुधारणा होणार आहे.

बजेट सत्रात मोठी घोषणा
त्रिपुरा विधानसभेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनादरम्यान मुख्यमंत्री माणिक साहा यांनी ही घोषणा केली. या ५ टक्के वाढीनंतर आता राज्यातील कर्मचाऱ्यांचा एकूण महागाई भत्ता ४१ टक्क्यांवर पोहोचला आहे. ही नवीन दरवाढ १ एप्रिल २०२६ पासून लागू होणार असून, एप्रिल महिन्याच्या पगारात कर्मचाऱ्यांना ही वाढीव रक्कम मिळण्यास सुरुवात होईल.
पगारात नेमकी किती वाढ होणार?
- महागाई भत्ता ५ टक्क्यांनी वाढल्यामुळे कर्मचाऱ्यांच्या हातात येणाऱ्या पगारात (In-hand Salary) चांगली वाढ होईल.
- उदाहरण: जर एखाद्या कर्मचाऱ्याचा मूळ पगार ३०,००० रुपये असेल, तर त्याला आता दरमहा अंदाजे १२,३०० रुपये फक्त महागाई भत्ता म्हणून मिळतील. यापूर्वीच्या तुलनेत प्रत्येक श्रेणीतील कर्मचाऱ्यांच्या पगारात मोठी भर पडणार आहे.
कोणाकोणाला होणार फायदा?
संबंधित सरकारच्या या निर्णयाचा थेट लाभ राज्यातील सुमारे १.८३ लाख लोकांना मिळणार आहे. यामध्ये १ लाखाहून अधिक कार्यरत सरकारी कर्मचारी, अंदाजे ८०,००० पेक्षा जास्त सेवानिवृत्त पेन्शनधारकांचा समावेश असून यांना फायदा होईल.
सरकारी तिजोरीवर ५०० कोटींचा भार
कर्मचाऱ्यांना दिलासा देतानाच राज्य सरकारच्या तिजोरीवर याचा अतिरिक्त ताण पडणार आहे. या निर्णयामुळे त्रिपुरा सरकारला दरवर्षी सुमारे ५०० कोटी रुपयांचा जास्तीचा खर्च करावा लागणार आहे. केंद्र सरकार आणि राज्य सरकारच्या कर्मचाऱ्यांमधील महागाई भत्त्याची तफावत कमी करणे, हा यामागचा मुख्य उद्देश असल्याचे सरकारने स्पष्ट केले आहे.












Click it and Unblock the Notifications