आज, उद्या नव्हे या तारखेला होणार मुख्यमंत्रीपदाचा शपथविधी! अनेक आमदार घेतील शपथ
Maharashtra oath ceremony : महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत महायुतीचे नशीब फळफळले.यंदाची विधानसभा निवडणूक महाविकास आघाडीची नव्हतीच असेच दिसते कारण या निवडणुकीत महाविकास आघाडीतील उमेदवाराशी मैत्रीपुर्ण लढणारा उमेदवारही विजयी झाला एवढे महाविकास आघाडीला जनतेने नाकारले अशी चर्चा आहे.
बंपर विजयानंतर महायुतीमध्ये मुख्यमंत्रीपदासाठी आता मंथन सुरू आहे. भाजप, शिंदे शिवसेना आणि राष्ट्रवादीतील अजित पवार हे तीन पक्षही स्वतंत्र बैठकीमध्ये चर्चा करत आहेत. पण मुख्यमंत्री हे राज्यपातळीवर नाही तर राष्ट्रीय पातळीवर ठरवला जाणार हे नक्की आहे. कारण मुख्यमंत्रीपद भाजच्याच वाट्याला जाणार असून देवेंद्र फडणवीस होतात का हे आता पाहायचे आहे.

29 नोव्हेंबरला महाराष्ट्रात शपथविधी सोहळा होऊ शकतो
दरम्यान, 29 नोव्हेंबरला महाराष्ट्रात शपथविधी सोहळा होऊ शकतो, अशी बातमी समोर आली आहे. अशा स्थितीत महायुतीतील कोणत्या पक्षाचे किती आमदार शपथ घेणार याची संपूर्ण माहितीही समोर आली आहे. महाराष्ट्र विधानसभेचा कार्यकाळ 26 नोव्हेंबरला संपल्यानंतर आता 29 नोव्हेंबरला शपथविधी होणार असल्याच्या बातम्या येत आहेत.
कुणाचे किती आमदार घेतील शपथ?
भाजपच्या कोट्यातील 25 आमदार शपथ घेऊ शकतात, तर शिवसेनेचे शिंदे आणि अजित पवार यांच्या राष्ट्रवादी गटातील 5-7, 5-7 आमदार शपथ घेणार आहेत. अधिकृत पातळीवर महायुतीच्या मुख्यमंत्रिपदी कोण असेल हे अद्याप जाहीर झालेले नाही. याबाबत अद्याप कोणताही खुलासा करण्यात आलेला नाही. मात्र, भाजपचे ज्येष्ठ नेते आणि संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांच्यावर मुख्यमंत्रिपदाची मोठी जबाबदारी देण्यात येणार आहे. अशा परिस्थितीत महाराष्ट्राचा मुख्यमंत्री चेहरा ठरवण्यात राजनाथ सिंह महत्त्वाची भूमिका बजावतील.
महाराष्ट्रात महायुतीचा फॉर्म्युला ठरला!
महाराष्ट्रात नव्या महायुतीचा सत्तेसाठीचा फॉर्म्युलाही निश्चित झाल्याचे बोलले जात आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, भाजपचे देवेंद्र फडणवीस पहिल्या अडीच वर्षांसाठी तर शिवसेना पक्षप्रमुख एकनाथ शिंदे उर्वरित अडीच वर्षांसाठी मुख्यमंत्री होऊ शकतात. मुख्यमंत्रीपद सोडल्यानंतर फडणवीस यांना भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष केले जाऊ शकते, असा दावा केला जात आहे.
कुणाला किती जागा?
भारतीय जनता पक्ष (भाजप), एकनाथ शिंदे यांचा शिवसेना आणि अजित पवार यांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष असलेल्या महायुतीने विधानसभा निवडणुकीत एकूण 236 जागा जिंकल्या आहेत. भाजपने 132 जागा जिंकल्या, शिवसेनेला 57 तर राष्ट्रवादीने 41 जागा जिंकल्या.
मुख्यमंत्र्यांच्या शपथविधीला, राष्ट्रपती राजवट का आवश्यक नाही?
महायुतीमध्ये मंत्रिमंडळाची योजना मंत्रिपदासाठी 21-12-10 चा फॉर्म्युला लागू करण्याचा युतीचा प्लॅन असल्याचा दावा केला जात आहे. यामध्ये एकूण 43 मंत्र्यांपैकी भाजपला 21, शिवसेनेला 12 आणि राष्ट्रवादीला 10 मंत्रिपद मिळतील असेही सांगण्यात येत आहे.












Click it and Unblock the Notifications