पहिल्याच बैठकीत राज्य सरकारचा मोठा निर्णय; 'या' शेतकऱ्यांना मिळणार जमिनी
काही दिवसांपूर्वी देवेंद्र फडणवीस यांच्या मंत्रिमंडळाचा विस्तार झाला. आज गुरुवारी मंत्रिमंडळ विस्तारानंतर राज्य मंत्रिमंडळाची पहिलीच बैठक पार पडली. या बैठकीत शेतकऱ्यांसाठी एक महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला. या बैठकीस मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे उपस्थित होते. मात्र उपमुख्यमंत्री अजित पवार हे बैठकीला उपस्थित नव्हते.

काय घेतला निर्णय
राज्य मंत्रिमंडळाच्या आजच्या बैठकीत शेतकऱ्यांसाठी मोठा निर्णय घेण्यात आला. राज्य सरकार 4 हजार 849 एकर जमिन शेतकऱ्यांना परत करणार आहे. महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी याबाबतची घोषणा केली. सरकारच्या या निर्णयाचा राज्यातील 963 शेतकऱ्यांना फायदा होणार आहे. याशिवाय महाराष्ट्र जमीन महसूल संहिता, 1966 च्या कलम-220 मध्ये आकारी पड जमिनीच्या संदर्भात असलेल्या तरतुदीत सुधारणा करण्याचा देखील निर्णय मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आला.
अजित पवार गैरहजर
या पहिल्याच बैठकीत उपमुख्यमंत्री अजित पवार हे अनुपस्थित होते. ते परदेश दौऱ्यावर गेले असल्याची माहिती देण्यात आली. दुसरीकडे या बैठकीत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली अनेक लोकाभिमुख निर्णय घेण्यात आले. पड जमिनीबाबतही मोठा निर्णय घेण्यात आला. या बैठकीस मंत्री धनंजय मुंडे उपस्थित राहतील का, अशी चर्चा होती. मात्र या पहिल्याच बैठकीला मंत्री धनंजय मुंडे यांनी उपस्थिती लावली. वाल्मिक कराड यांना अटक केल्यानंतर मंत्री मुंडे यांच्या राजीनाम्याची मागणी केली जात असल्याने त्यांची उपस्थिती आज चर्चेचा विषय ठरली.












Click it and Unblock the Notifications