Get Updates
Get notified of breaking news, exclusive insights, and must-see stories!

राज्य कर्मचाऱ्यांसाठी खूशखबर! महागाई भत्त्यात 3 टक्के वाढ; तुमच्या सर्व प्रश्नाची उत्तरे एका क्लिकवर

Maharashtra government's decision : केंद्र सरकारच्या धर्तीवर महाराष्ट्र सरकारने महागाई भत्ता वाढवण्याचा मोठा निर्णय घेतला आहे. या निर्णयाद्वारे आता महागाई भत्ता 50 वरुन 53 टक्के इतका झाला आहे. हा भत्ता थकबाकीच्या स्वरुपात दिला जाणार आहे.

राज्य कर्मचाऱ्यांसाठी महाराष्ट्र शासनाने गुड न्यूज दिली आहे. महागाई भत्ता वाढावा यासाठी महाराष्ट्रातील कर्मचारी गेल्या अनेक काळापासून सरकारकडे पाठपुरावा करत होते. आता ही मागणी पुर्ण झाल्याने सरकारी कर्मचाऱ्यांत आनंद व्यक्त होत आहे.

Maharashtra government s decision

महाराष्ट्र शासनाने महागाई भत्त्यात वाढ करुन राज्य कर्मचाऱ्यांना एकप्रकारे खूशखबर दिली आहे, पण अनेकांच्या मनात बरेच प्रश्न आहेत, त्यामुळे आपण शासनाच्या या निर्णयासंबंधी सर्व प्रश्नांची उत्तरे जाणून घेऊया.

महागाई भत्ता किती टक्क्यांनी वाढला?

राज्य शासनाने महागाई भत्त्यात 3 टक्के वाढ केली आहे.

महागाई भत्ता कधीपासून मिळणार आहे?

महागाई भत्ता जुलै 2024 म्हणजेच गेल्या सात महिन्यापुर्वीपासूनची रक्कम मिळणार आहे.

महागाई भत्ता कशाप्रकारे शासन देणार आहे?

महागाई भत्त्याची रक्कम शासन थकबाकीच्या स्वरुपात वेतनातून देणार आहे.

शासनाच्या निर्णयाचा किती कर्मचाऱ्यांना फायदा होणार आहे?

महागाई भत्त्यात वाढ करण्यात आली असून शासनाच्या या निर्णयाचा राज्यातील जवळपास 14 लाख कर्मचाऱ्यांना मोठा फायदा होणार आहे.

निवृत्ती वेतनधारकांना शासनाच्या या निर्णयाचा फायदा होणार आहे का?

होय..निवृत्ती वेतनधारकांना राज्य शासनाच्या या निर्णयाचा फायदा होणार आहे आणि लाभही मिळणार आहे.

महागाई भत्त्यात 3 टक्के वाढ केल्यास सरकारी तिजोरीवर कसा भार पडतो?

शासनाने महागाई भत्त्यात 3 टक्के वाढ केल्यास या निर्णयाचा सरकारी तिजोरीवर 300 250 कोटींचा बोजा पडू शकतो आणि महागाई भत्त्यात जर 1 टक्का वाढ केली तर 100 ते 125
कोटींचा भार पडतो.

महागाई भत्ता म्हणजे काय?

जुलै 2024 पासून, भारतातील केंद्र सरकारी कर्मचाऱ्यांसाठी महागाई भत्ता दर 4% ने वाढवण्यात आला आहे, ज्यामुळे तो मूळ पगाराच्या 50% झाला आहे.

दरमहा महागाई भत्ता दिला जातो का?

दरमहा महागाई भत्ता हा पगाराचा एक भाग असल्याने तो दरमहा दिला जातो. तथापि, भारत सरकार दर सहा महिन्यांनी तो सुधारित करते.

या आकड्यानुसार, कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता सुधारित केला जातो आणि लागू केला जातो. तीन घटक VAD बनवतात. पहिला म्हणजे ग्राहक किंमत निर्देशांक, दुसरा म्हणजे बेस इंडेक्स आणि तिसरा म्हणजे भारत सरकारने निश्चित केलेली परिवर्तनशील महागाई भत्ता रक्कम . सरकार किमान वेतन सुधारित करेपर्यंत तिसरा घटक स्थिर राहतो.

Notifications
Settings
Clear Notifications
Notifications
Use the toggle to switch notifications
  • Block for 8 hours
  • Block for 12 hours
  • Block for 24 hours
  • Don't block
Gender
Select your Gender
  • Male
  • Female
  • Others
Age
Select your Age Range
  • Under 18
  • 18 to 25
  • 26 to 35
  • 36 to 45
  • 45 to 55
  • 55+