फडणवीस सरकारचा 100 दिवसांचा निकाल:आदिती तटकरेंचा प्रथम क्रमांक, कोणते कलेक्टर, SP, आयुक्त ठरले अव्वल
Devendra Fadnavis announces 100-day review of government's work : महायुतीचे सरकार स्थापन झाल्यानंतर देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री म्हणून पदभार स्वीकारला. त्यानंतर 100 दिवसांची कार्यालयीन सुधारणा मोहीम हाती घेतली. या मोहिमेद्वारे सर्व कार्यालये ऑनलाईन, स्वच्छ, नागरिकांच्या तक्रारीचे तत्काळ निवारण करणारे व झिरो पेन्डेन्सी आदींवर विशेष काम केले गेले.

दरम्यान, 100 दिवसांच्या कार्यालयीन सुधारणा कार्यक्रमाचा निकाल आता जाहीर झाला आहे. भारतीय गुणवत्ता परिषदतर्फे अंतिम मूल्यमापन करण्यात आले. यामध्ये आदिती तटकरे यांच्याकडे असलेले महिला व बालविकास खातं सर्वात आघाडीवर आहे. त्याखालोखाल सार्वजनिक बांधकाम विकास दुसऱ्या क्रमांकावर आहे. विशेष बाब म्हणजे टॉप फाईव्ह विभागांमध्ये भाजपच्या मंत्र्यांकडे असलेल्या तीन खात्यांचा समावेश आहे.
100 दिवसांच्या कार्यालयीन सुधारणा कार्यक्रमाचे भारतीय गुणवत्ता परिषद (Quality Council of India) तर्फे अंतिम मूल्यमापन करण्यात आले. या निकालानुसार वेबसाईट सुधारणा, कार्यालयीन सोयीसुविधा, तक्रार निवारण, सुलभ जीवनमान, गुंतवणुकीस चालना, तंत्रज्ञानाचा वापर इत्यादी 10 मुद्यांवर… pic.twitter.com/svAqMiLPok
— Devendra Fadnavis (@Dev_Fadnavis) May 1, 2025
देवेंद्र फडणवीसांच्या पोस्टमध्ये काय?
100 दिवसांच्या कार्यालयीन सुधारणा कार्यक्रमाचे भारतीय गुणवत्ता परिषदतर्फे अंतिम मूल्यमापन करण्यात आले. या निकालानुसार वेबसाईट सुधारणा, कार्यालयीन सोयीसुविधा, तक्रार निवारण, सुलभ जीवनमान, गुंतवणुकीस चालना, तंत्रज्ञानाचा वापर इत्यादी 10 मुद्यांवर उत्कृष्ट कार्य करणाऱ्यांची नावे घोषीत करण्यात आली आहे.
- 5 मंत्रालयीन विभागांचे सचिव,
- 5 मंत्रालयीन विभागांचे आयुक्त,
- 5 जिल्हाधिकारी,
- 5 पोलिस अधीक्षक,
- 5 मुख्य कार्यकारी अधिकारी (जि.प.),
- 4 महापालिका आयुक्त,
- 3 पोलिस आयुक्त,
- 2 विभागीय आयुक्त आणि
- 2 पोलिस परिक्षेत्र महानिरीक्षक
यांची नावे जाहीर करताना मला अतिशय आनंद होत आहे. या सर्व अधिकाऱ्यांनी व त्यांच्या टीमने प्रभावी व कल्पक अंमलबजावणीने राज्याचे प्रशासन अधिक कार्यक्षम, गतिमान व लोकाभिमुख केल्याबद्दल मी त्यांचे मनःपूर्वक कौतुक करतो आणि त्यांना भविष्यातही अशाच प्रकारे उत्तम कार्य करण्यासाठी शुभेच्छा देतो.
100 दिवसांच्या कामांचा निकाल जाहीर
आदिती तटकरे यांचा महिला आणि बालविकास विभाग सर्वात सर्वोत्तम विभाग म्हणून पुढे आला आहे. आदिती तटकरेंच्या खात्याला 80 टक्के गुण मिळाले. सार्वजनिक बांधकाम विभाग 77.95 टक्के गुणांसह द्वितीय क्रमांकावरती आहे, माणिकराव कोकाटेंच्या कृषी विभाग 66.15 टक्के गुण मिळाले आहेत. ग्रामविकास विभाग चौथ्या तर परिवहन व बंदरे विभाग पाचव्या स्थानावर आहे.
सरकारच्या 100 दिवसांत कोणचे जिल्हाधिकारी उत्तम!
- चंद्रपूरच्या जिल्हाधिकाऱ्यांना 100 पैकी 84.29 टक्के गुण
- कोल्हापूरचे जिल्हाधिकारी 81.14 टक्के गुणांसह द्वितीय
- जळगावचे जिल्हाधिकारी 80.86 टक्के गुणांसह तृतीय स्थानी
- अकोल्याच्या जिल्हाधिकाऱ्यांना चौथ्या क्रमांकाचे 78.86 टक्के गुण
- नांदेडचे जिल्हाधिकारी पाचव्या क्रमांकावर,66.86 टक्के गुण
उत्कृष्ट पोलिस अधीक्षक म्हणून कोणाची निवड
- 100 दिवसांच्या कामांत पालघर पो.अधीक्षकांना 90.29% गुण
- नागपूर ग्रामीण आणि गडचिरोलीचे पो.अधीक्षक द्वितीय स्थानी
- नागपूर ग्रामीण आणि गडचिरोलीच्या पो.अधीक्षकांना 80 टक्के गुण
- जळगावचे पो.अधीक्षक 65.71 टक्के गुणांसह चौथ्या स्थानी
- सोलापूर ग्रामीणचे पोलीस अधीक्षक 64 टक्के गुणांसह पाचवे












Click it and Unblock the Notifications