Get Updates
Get notified of breaking news, exclusive insights, and must-see stories!

बीडसह 3 जिल्ह्यात पाऊस पुराचे थैमान! शाळा-महाविद्यालयांना सुट्टी जाहीर, गरज असेल तरच घराबाहेर पडा..

Maharashtra Floods Schools and Colleges Closed : बीड जिल्ह्यात मागील ७२ तासांपासून अतिवृष्टी झाली असून पूरस्थिती आहे, यासह धाराशीव आणि सोलापूर जिल्ह्यातही पुरस्थिती असून पुराच्या धर्तीवर नागरिकांनी सतर्क राहावे, आवश्यकता नसल्यास घराबाहेर पडू नये, आपत्कालीन परिस्थितीत संपर्क करावा अशा सूचना आमदार धनंजय मुंडेंनी दिल्या आहेत. दरम्यान प्रशासनाकडून मदतकार्य सुरु असून या जिल्ह्यांत शाळाना सुट्टी जाहीर करण्यात आली आहे.

Maharashtra Floods Schools and Colleges Closed

बीड जिल्ह्यात पुराचे थैमान

मागील ७२ तासांपासून बीड जिल्ह्यात सर्वदूर अतिवृष्टी व पूर परिस्थिती निर्माण झाली असून, जवळपास सर्वच नद्यांना पूर आलेला आहे. अनेक गावांचा संपर्क तुटला असून अनेक गावांमध्ये पुराचे पाणी शिरल्याने जनजीवन विस्कळित झाले आहे. अशा परिस्थितीत बीड जिल्ह्याचे पालकमंत्री अजित दादा पवार यांच्या सातत्याने संपर्कात असून संपूर्ण परिस्थितीवर लक्ष ठेवून आहे, तसेच कोणत्याही प्रकारची नैसर्गिक आपत्ती उद्भवल्यास त्यासाठी सज्ज राहावे, याबाबत जिल्हा प्रशासनास सूचना केल्या असल्याचे माजी मंत्री आमदार धनंजय मुंडे यांनी म्हटले आहे.

Take a Poll

ओला दुष्काळ जाहीर करा- मुंडे

बीड जिल्ह्यात सर्वदूर पावसाने थैमान घातले असून, खरिपातील पिके जवळपास नष्ट झाले आहेत. धनंजय मुंडे यांनी दोन दिवसांपूर्वीच राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तसेच उपमुख्यमंत्री तथा पालकमंत्री अजितदादा पवार यांना लेखी पत्र द्वारे संपूर्ण बीड जिल्ह्यात ओला दुष्काळ जाहीर करून सरसकट मदत देण्याची विनंती केली आहे.

दरम्यान अनेक गावांमध्ये पूर परिस्थिती निर्माण झाली असून जिल्ह्यातील बहुतांश जलप्रकल्पांनी धोक्याची पातळी ओलांडली आहे. नद्या दुथड्या भरून वाहत असून अनेक ठिकाणी पुलांवरून पाणी वाहत आहे. अनेक पुलंची पडझड झाली असून, पूलांवरून पाणी वाहत असताना कोणताही धोका नकत करता पूल उलंडू नये अशा सूचना प्रशासन वारंवार देत आहे. अति पावसामुळे सर्व दूर नुकसान झाले असून नागरिकांनी सतर्कता बाळगावी तसेच आवश्यकता नसल्यास घराबाहेर पडू नये असे आवाहन धनंजय मुंडे यांनी केले आहे.

अजित पवारांची जिल्हाधिकाऱ्यांशी चर्चा

दरम्यान पूर परिस्थितीमध्ये कोणत्याही प्रकारची नैसर्गिक आपत्ती आढळल्यास एन डी आर एफ तसेच एस डी आर एफ च्या पथकांसह संपूर्ण जिल्हा प्रशासनाला सज्ज राहण्याचे निर्देश देण्यात आले असून धनंजय मुंडे यांनी याबाबत जिल्ह्याचे पालकमंत्री अजित दादा पवार तसेच जिल्हाधिकारी विवेक जॉन्सन यांच्याशी दूरध्वनीवरून चर्चा केली आहे.

सोला'पूर' जिल्ह्यातील ग्रामीण भागातील शाळा-महाविद्यालयांना सुट्टी

सोलापूर जिल्ह्यात सातत्याने होत असलेल्या पावसामुळे तसेच उस्मानाबाद आणि नगर जिल्ह्यातील पावसाची संततधार सुरू असल्यामुळे सोलापूर जिल्ह्यातून वाहणाऱ्या सीना नदीला महापूर आला आहे त्यामुळे अनेक गावचा संपर्क तुटला आहे तर अनेक गावांना पावसाच्या पाण्याने वेडा टाकला आहे अशा परिस्थितीत लहान मुलांची व विद्यार्थ्यांची सुरक्षेच्या दृष्टीने सोलापूर जिल्ह्यातील काही तालुक्यातील शाळा व महाविद्यालयांना मंगळवार दिनांक 23 सप्टेंबर रोजी सुट्टी जाहीर करण्यात आली आहे

सोलापूर जिल्ह्यातील सीना नदीकाठच्या अनेक गावांना या पुराचा फटका बसणार आहे त्यामुळे सीना नदीकाठी असलेल्या उत्तर सोलापूर दक्षिण सोलापूर करमाळा माढा मोहोळ बार्शी या तालुक्यातील अनेक गावे या पूर परिस्थितीला सामोरे जाणार आहेत त्यामुळे सुरक्षिततेचा भाग म्हणून जिल्हाधिकाऱ्यांनी शाळा व महाविद्यालयांना सुट्टी जाहीर केली आहे तसेच या कालावधीत कोणत्याही नागरिकांनी पाण्याच्या प्रवाहात अथवा नदी पात्रात विनाकारण उतरण्याचा प्रयत्न करू नये तसेच ज्या ज्या ठिकाणी लोकांना अडचणी आहेत त्यांनी आपत्ती व्यवस्थापन विभागाशी संपर्क साधावा असे आवाहन जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी केले आहे.

पुरस्थितीमुळे धाराशीव जिल्ह्यात शाळांना सुट्टी

धाराशीव जिल्ह्यात संततधार पाऊस अतिवृष्टी व पूरस्थितीमुळे आज २३ सप्टेंबर २०२५ मंगळवार रोजी शाळांना सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. यासंदर्भातील आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी दिले आहेत. २२ सप्टेंबरपासून जिल्ह्यात संततधार पाऊस होत आहे तसेच काही ठिकाणी अतिवृष्टी झालेली आहे व काही ठिकाणी पुरजन्य स्थिती आहे त्यामुळे विद्यार्थ्यांची सुरक्षितता लक्षात घेता हा निर्णय घेण्यात आला आहे. आज सर्व माध्यमांच्या व सर्व व्यवस्थापनाच्या प्राथमिक माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळांना सुट्टी जाहीर करण्यात येत आहे असे पत्रच जिल्हाधिकाऱ्यांनी शिक्षणाधिकाऱ्यांना पाठवले आहे.

Notifications
Settings
Clear Notifications
Notifications
Use the toggle to switch notifications
  • Block for 8 hours
  • Block for 12 hours
  • Block for 24 hours
  • Don't block
Gender
Select your Gender
  • Male
  • Female
  • Others
Age
Select your Age Range
  • Under 18
  • 18 to 25
  • 26 to 35
  • 36 to 45
  • 45 to 55
  • 55+