Maharashtra Exit PollS Result: 'या' एक्झीट पोलमध्ये भाजप सर्वात मोठा पक्ष, ठाकरेंना किती जागा मिळणार

Maharashtra Assembly Election 2024 : 20 नोव्हेंबर रोजी एकाच टप्प्यात महाराष्ट्रातील सर्व 288 जागांवर मतदान झाले. 23 नोव्हेंबरला निकाल लागणार आहे. दरम्यान, विविध संस्थांचे एक्झीट पोल जाहीर झाले आहेत. यात महायुती पुन्हा सत्तेत येण्याची शक्यता वर्तविली आहे. त्यातच आता दैनिक भास्करने देखील त्यांचा एक्झीट पोल जाहीर केला. यामध्ये पुन्हा महायुतीला सत्ता स्थापन करण्याची संधी मिळू शकते, असे वर्तवविले जात आहे.

भास्कर एक्झीट पोलमध्ये काय आहे?

भाजपला जास्तीत जास्त 80-90 जागा मिळू शकतात. 2019 मध्ये 105 जागा मिळाल्या होत्या. काँग्रेस 58-60 जागांसह दुसऱ्या क्रमांकावर राहू शकते. गेल्या निवडणुकीत त्यांना 44 जागा मिळाल्या होत्या. निवडणुकीत शरद पवारांची जादू काम करत असल्याचे दिसते. त्यांचा पक्ष NCP (SP), ज्याने 86 उमेदवार उभे केले आहेत, ते 50-55 जागा जिंकू शकतात.

Maharashtra Exit Poll Result

शिवसेना (शिंदे गट) आणि शिवसेना (उद्धव गट) 30-35 जागा जिंकून बरोबरीत राहू शकतात. अजित पवार यांचा पक्ष राष्ट्रवादी काँग्रेस महाआघाडीसाठी कमकुवत दुवा ठरत आहे. ते केवळ 15-20 जागा जिंकण्याची शक्यता आहे. लहान पक्ष आणि अपक्षांना 20 ते 25 जागा मिळू शकतात. अशा परिस्थितीत ते किंगमेकर बनू शकतात.

भास्कर रिपोर्टर्स पोलनुसार, महाविकास आघाडी, काँग्रेस, राष्ट्रवादी (शरद पवार) आणि शिवसेना (उद्धव) यांच्या आघाडीला महायुतीपेक्षा 10 जागा जास्त मिळू शकतात. या आघाडीला बहुमत मिळण्याचीही शक्यता आहे, असाही अंदाज वर्तविण्यात आला आहे.

maharashtra assembly election 2024

महाविकास आघाडी

2019 च्या निवडणुकीत चौथ्या क्रमांकावर असलेली काँग्रेस यावेळी त्यांच्या मित्रपक्षांपेक्षा वरचढ दिसत आहे. लोकसभा निवडणुकीत काँग्रेसने आश्चर्यकारकपणे सर्वाधिक 13 जागा जिंकल्या. विदर्भातील 62 जागांपैकी काँग्रेस 50च्या आसपास जागा जिंकू शकते. काँग्रेसने आघाडीत सर्वाधिक 101 उमेदवार उभे केले आहेत.

महाविकास आघाडीचा दुसरा सर्वात मोठा पक्ष शिवसेना (उद्धव गट) सर्वात कमकुवत ठरू शकतो. पक्षाने 95 उमेदवार उभे केले आहेत. यापैकी फक्त एक तृतीयांश जिंकण्याची संधी आहे. शरद पवार यांचा पक्ष राष्ट्रवादी काँग्रेस (एसपी) पश्चिम महाराष्ट्र आणि मराठवाड्यात मजबूत दिसत आहे. त्यांना मराठा मतांचा फायदा मिळण्याची शक्यता वर्तविली जात आहे.

महायुती : भाजपचा स्ट्राईक रेट चांगला, अजित पवारांची संख्या कमी

भाजपच्या नेतृत्वाखालील महायुती बहुमताच्या तुलनेत कमी पडू शकते. उत्तर महाराष्ट्र, कोकण आणि मुंबईत भाजप चांगली कामगिरी करू शकतो. मात्र, विदर्भात पक्षाचे नुकसान होताना दिसत आहे. गेल्या निवडणुकीत भाजपने येथे 29 जागा जिंकल्या होत्या.

युतीतील इतर प्रमुख पक्ष शिवसेना (शिंदे गट) मुंबई, कोकण आणि मराठवाड्यात मजबूत आहे. पक्षाने 80 जागांवर उमेदवार उभे केले आहेत. महायुती मागे राहण्यासाठी अजित पवारांची राष्ट्रवादी कारणीभूत ठरू शकते. पश्चिम महाराष्ट्र आणि मराठवाड्यातील ग्रामीण भागात पक्ष शरद पवार यांच्यापेक्षा मागे पडल्याचे दिसत आहे. लोकसभा निवडणुकीतही अजित पवारांच्या पक्षाला रायगडचीच जागा जिंकता आली. विधानसभा निवडणुकीत पक्ष 55 जागांवर निवडणूक लढवत आहे.

Notifications
Settings
Clear Notifications
Notifications
Use the toggle to switch notifications
  • Block for 8 hours
  • Block for 12 hours
  • Block for 24 hours
  • Don't block
Gender
Select your Gender
  • Male
  • Female
  • Others
Age
Select your Age Range
  • Under 18
  • 18 to 25
  • 26 to 35
  • 36 to 45
  • 45 to 55
  • 55+