देवेंद्र फडणवीस यांचे "चाणक्यपण" पुन्हा एकदा सिद्ध!!
Devendra Fadnavis successful politics : महाराष्ट्राचा राजकारणात टीकेचे सर्वाधिक घाव सोसलेला एकमेव नेता म्हणजे देवेंद्र फडणवीस. 2019 ते 2024 या काळात फडणवीस यांचे राजकारण संपवण्याचे हर्तरेचे प्रयत्न विरोधकांनी केले. पण अकेला देवेंद्र सर्वांना पुरून उरला. त्यांच्या नेतृत्वाखाली 132 जागा भाजपने जिंकल्या. शरद पवार, उद्धव ठाकरे, नाना पटोले, बाळासाहेब थोरात, अशा सर्व विरोधकांना एकाच वेळी धोबीपछाड देत देवेंद्र फडणवीस यांनी आपले राजकीय कौशल्य सिद्ध केले.

2019 साली महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुका देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली झाल्या. राज्यात राज्यातील जनतेने महायुतीला स्पष्ट कौल दिला होता. देवेंद्र फडणवीस हेच मुख्यमंत्री होतील असे चित्र राज्यभरात होते. पण आयत्या वेळी उद्धव ठाकरे यांनी काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेसची मैत्री केली आणि मुख्यमंत्रीपद पटकावले. त्यावेळी या डावपेचना उत्तर देण्यासाठी अजित पवार यांच्याशी संगनमत करून देवेंद्र फडणवीस यांनी सरकार स्थापन केले. पण ते अवघ्या 80 तासात कोसळले. त्यावरून देवेंद्र फडणवीस यांची प्रचंड खिल्ली उडवण्यात आली.
महाविकास आघाडीचे सरकार स्थापन झाले तेव्हाही " अकेला देवेंद्र क्या करेगा?" अशा शब्दात सुप्रिया सुळे यांनी देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका केली होती. पुढील दोन वर्षे भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांना त्रास देण्याचा एक कलमी कार्यक्रम महाविकास आघाडीने राबवला. महाविकास आघाडीचे सरकार त्यांच्या भाराने कोसळेल, असा इशारा देवेंद्र फडणवीस यांनी दिला होता. सभागृहात महाविकास आघाडीचे बहुमत असूनही देवेंद्र फडणवीस यांनी सरकारची विलक्षण कोंडी केली.
प्रचंड बहुमत पाठीशी असतानाही महाविकास आघाडी राज्यसभा आणि विधान परिषद निवडणुकीत विजय मिळवू शकली नाही. शिवसेनेचे 40 आमदार एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली अलगद बाजूला काढून देवेंद्र फडणवीस यांनी महाविकास आघाडीवर डाव उलटवला. पुन्हा पुढची दोन वर्षे देवेंद्र फडणवीस यांच्यावर सातत्याने टीका सुरू झाली. घरफोड्या हे विशेषण फडणवीसना लावण्यात आले. अनाजीपंत अशा शब्दात त्यांची जाहीर निर्भत्सना होऊ लागली. पण फडणवीस यांनी नेटाने सरकार चालवले. एकनाथ शिंदे यांना सांभाळून घेतले. वर्षभरात अजित पवार देखील आपल्या आमदारांसह युतीत सहभागी झाले आणि देवेंद्र फडणवीस यांच्यावरील टीका आणखी वाढली.
2024 च्या लोकसभा निवडणुकीत महायुतीचा दारुण पराभव झाला आणि त्याचे खापर देवेंद्र फडणवीस यांच्याच माथ्यावर फुटले. महायुतीचा नेता म्हणून या पराभवाची जबाबदारी फडणवीस यांनी जाहीरपणे स्वीकारली आणि सरकार मधून मुक्त करण्याची विनंती पक्ष नेतृत्वाला केली. पण नेतृत्वाने त्यांना अभय दिले.
विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर फडणवीस यांनी विविध योजना जाहीर केल्या. मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजना, मोफत कृषी वीज बिल, मुलींना मोफत शिक्षण अशा अनेक लोकोपयोगी योजनांची खैरात करण्यात आली. देवेंद्र फडणवीस स्वतः पायाला भिंगरी लावून फिरले.त्यांनी केलेले सूक्ष्म नियोजन अत्यंत महत्त्वपूर्ण ठरले. या निवडणुकीसाठी त्यांनी प्रचंड मेहनत घेतली, महाराष्ट्रभर दौरे केले.
राज्याच्या विकासासाठी महायुतीची भूमिका सामान्य जनतेला पटवून दिली. तसेच महाविकास आघाडीच्या फेक नेरेटिव्हचा पर्दाफाश केला.महायुतीच्या घटक पक्षांची उत्तम समन्वय ठेवला. निवडून येऊ शकणाऱ्या जागी भाजपच्या कार्यकर्त्यांना एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश मिळवून दिला आणि त्यातील बहुसंख्य जागा निवडून आणल्या.
आज भाजपला न भूतो न भविष्यती असे यश राज्यात मिळाले आहे. महायुती म्हणून विक्रमी बहुमत प्राप्त झाले आहे. शरद पवार यांचा बालेकिल्ला असलेला पुणे जिल्हा फडणवीस यांच्या रणनीतीने उद्ध्वस्त झाला. उद्धव ठाकरे यांचे परंपरागत गड महायुतीने उद्ध्वस्त केले आहेत. गेल्या पाच वर्षात महाविकास आघाडीने दिलेल्या त्रासाचा हिशोब फडणवीस यांनी चुकता केला आहे.












Click it and Unblock the Notifications