Maharashtra Election 2024 :कधी होते उमेदवाराचे डिपॉझिप्ट जप्त, कमीत कमीत किती असतात मतं आवश्यक, वाचा
Maharashtra Election 2024 : आपण अनेकदा पाहतो की, निवडणुकीत या उमेदवाराचे डिपाॅझिट जप्त, त्या उमेदवाराची अनामत रक्कम जप्त...पण अनामत रक्कम का जप्त होते आणि केव्हा अनामत रक्कम जप्त होत नाही, हे आज आपण जाणून घेऊया.
निवडणुकीत जर उमेदवार निवडून आला असेल, परंतु सर्व उमेदवारांना मिळून पडलेल्या एकूण वैध मतांच्या एक षष्ठांशापेक्षा कमी मते मिळाली असल्यास विजयी उमेदवाराचीही अनामत रक्कम जप्त होऊ शकते. ही एक षष्ठांश मते म्हणजे किती हे जाणून घेऊया.

अपक्ष उमेदवारांची संख्या अधिक
विधानसभा निवडणुकीत गुडघ्याला बाशिंग बांधून उभे राहत हजारो उमेदवारांनी अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत. उमेदवारी अर्जाच्या छाननीमध्ये वैध ठरलेल्या उमेदवारांना आता निवडणूक चिन्हांची प्रतीक्षा आहे. मनासारखं चिन्ह मिळाल्यावर अपक्ष उमेदवारांपुढे निवडणुकीत विजयी होण्यापेक्षा मोठ आव्हान हे अनामत रक्कम वाचवण्याच राहणार आहे.
किती असते अनामत रक्कम
विधानसभेच्या निवडणुकीत उभ्या राहणाऱ्या सर्वसाधारण गटातील उमेदवारास रक्कम 10 हजार रुपये तर अनुसूचित जाती अथवा अनुसूचित जमाती वर्गातील उमेदवारो 5 हजार रुपये अनामत रक्कम भरावी लागते. ही अनामत रक्कम वाचवण्यासाठी एकूण वैध मतांच्या एक षष्ठांश म्हणजेच 16.67 टक्के मते मिळवण गरजेचं आहे, नाही तर अनामत रक्कम जप्त होते.
..तर मिळते अनामत रक्कम
उमेदवाराचे नामनिर्देशनपत्र अवैध ठरवून नाकारले गेले तर अनामत रक्कम परत मिळते. उमेदवाराने विहित कालावधीत उमेदवारी मागे घेतली असल्यास अनामत रक्कम परत मिळते. मतदानाच्या आधी उमेदवार मृत्यू पावला तर अनामत रक्कम त्यांच्या कायदेशीर प्रतिनिधीस परत केली जाते. जे उमेदवार निवडून आलेले नाहीत, मात्र निवडणुकीत सर्व उमेदवारांना पडलेल्या एकूण वैध मतांच्या एक षष्ठांशापेक्षा म्हणजे 16.67 टक्क्यांपेक्षा जास्त मते मिळाली असतील, तरीदेखील अनामत रक्कम परत मिळेल.
महाराष्ट्रात इतके उमेदवार रिंगणात
महाराष्ट्र विधानसभा सार्वत्रिक निवडणूक 2024 नामनिर्देशन पत्र मागे घेण्याच्या शेवटच्या दिवसापर्यंत अंतिमतः राज्यात एकूण 4 हजार 140 उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत. नामनिर्देशन पत्र वैध ठरलेल्या एकूण 7 हजार 78 उमेदवारांपैकी उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवसापर्यंत 2 हजार 938 उमेदवारांनी माघार घेतली आहे.
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत 2024 मध्ये महायुती आणि महाविकास आघाडी यांच्यात निकराची लढत होणार आहे. 20 नोव्हेंबर रोजी एकाच टप्प्यात महाराष्ट्रातील सर्व 288 जागांवर मतदान होणार असून 23 ऑक्टोबर रोजी मतमोजणी होणार आहे.
महाराष्ट्र विधानसभेचा कार्यकाळ 26 नोव्हेंबरला संपणार आहे. या निवडणुकीत महाविकास आघाडीत काँग्रेस, शिवसेना (यूबीटी) आणि राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) या तीन प्रमुख पक्षांसमोर लोकसभा निवडणुकीच्या निकालांची पुनरावृत्ती करण्याचे आव्हान आहे. महाआघाडीत भाजप, राष्ट्रवादी आणि शिवसेना (शिंदे) यांना आपले सरकार वाचवण्यासाठी किमान 145 जागा मिळवाव्या लागतील. महाविकासमध्ये काँग्रेस सर्वाधिक जागांवर तर महायुतीमध्ये भाजप सर्वाधिक जागांवर लढत आहे.












Click it and Unblock the Notifications