Maharashtra Day: महाराष्ट्र हे राज्याला नाव देणारे आचार्य अत्रे कोण होते? त्यांच्याबद्दल जाणून घ्या
Maharashtra Day 2025 Who was Acharya Atre : प्रल्हाद केशव अत्रे हे नाव महाराष्ट्रातील एक मोठे नाव ज्यांची भाषण ऐकताच अंगावर शहारे येतात. संयुक्त महाराष्ट्र चळवळीतील सर्वात अग्रणी असे नाव. जोपर्यंत इतिहास आहे तोपर्यंत प्रल्हाद केशव अत्रे हे नाव कुणीही विसरणार नाही.
एक लढा जो महाराष्ट्राच्या निर्मितीचा, भविष्याचा आणि मराठी जनांच्या अस्तित्वाचा होता तो लढला प्रल्हाद केशव अत्रे आणि त्या काळच्या समस्त मराठी जनांनी प्र. के. अत्रे यांना आचार्य अत्रे म्हणूनही उभा महाराष्ट्र ओळखतो. आज या कर्तृत्ववान नेत्याबद्दल आपण जाणून घेऊया.

कोण होते प्रल्हाद केशव अत्रे?
- प्रल्हाद केशव अत्रे हे आचार्य अत्रे या नावाने महाराष्ट्रभर ओळखले जातात.
- 13 ऑगस्ट 1898 रोजी आचार्य अत्रे यांचा जन्म झाला.
- आचार्य अत्रे हे मराठीतील नावाजलेले लेखक, कवी, नाटककार, संपादक, चित्रपट निर्माते, शिक्षणतज्ज्ञ, राजकारणी व वक्ते होते. एवढे अष्टपैलू व्यक्तिमत्व क्वचितच महाराष्ट्राच्या इतिहासात झाले असेल.
- आचार्य अत्रे महाराष्ट्राच्या निर्मितीसाठी उभ्या राहिलेल्या संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीतील प्रमुख नेते होते.
- आचार्य अत्र्यांच्या घणाघाती भाषणांमुळेच संयुक्त महाराष्ट्र मिळाला असे मानले जाते. अत्रे यांचे बाळासाहेब ठाकरे यांच्याशी जाहीर वाद होते, असे म्हटले जाते.
आचार्य अत्रे यांचा जन्म व बालपण कुठे गेले
- आचार्य अत्रे यांचा जन्म 13 ऑगस्ट, 1898 रोजी पुणे जिल्ह्यातील सासवड जवळील कोडित खुर्द या गावी झाला. त्यांचे वडील लिपिक होते आणि काही काळासाठी सासवड नगरपालिकेचे सचिव होते.
- सासवडच्या एमईएस वाघिरे हायस्कूलमधून आचार्य अत्रे यांनी प्राथमिक व उच्च माध्यमिक शिक्षण पूर्ण केले.
- 1919 मध्ये फर्ग्युसन महाविद्यालयातून त्यांनी मॅट्रिक पूर्ण केले. पुणे विद्यापीठातून त्यांनी कला शाखेची पदवी पूर्ण केली.
- पदवीनंतर अत्रे यांनी शाळेत शिक्षक म्हणून काम केले. अत्रे यांनी 1928 मध्ये लंडन विद्यापीठातून टी.डी. (शिक्षक पदविका) केले.
चित्रपट, पत्रकारिता क्षेत्रात योगदान, लेख, भाषणं प्रसिद्ध
आचार्य अत्रे परखड वक्ते होते, त्यांची संयुक्त महाराष्ट्रासंदर्भातील भाषणं गाजली. या भाषणांनी मराठीजनांत जागृती उत्पन्न केली. त्यासह त्यांनी अनेक लिखाण केले. त्यांची नाटकं आणि लेखही गाजली आहेत. चित्रपट क्षेत्रातही त्यांचे मोठे योगदान आहे. 1923 साली अत्र्यांनी 'अध्यापन' मासिक सुरू केले. 1926 मध्ये 'रत्नाकर' 1929 साली 'मनोरमा', आणि पुढे 1935 साली 'नवे अध्यापन' व 1939 साली 'इलाखा शिक्षक' ही मासिके काढली.












Click it and Unblock the Notifications