अर्थसंकल्पात शेतकऱ्यांसाठी मोठी घोषणा! 'एवढ्या' लाखांचे कर्ज माफ होणार! काय स्वस्त काय महाग यादी पहा
Maharashtra Budget 2026 : मुख्यमंत्री आणि अर्थमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज विधानसभेत राज्याचा २०२६-२७ चा अर्थसंकल्प सादर केला. महाराष्ट्राच्या इतिहासात प्रथमच मुख्यमंत्र्यांनी हा अर्थसंकल्प मांडला असून, त्यांनी अत्यंत जड अंतःकरणाने हा अर्थसंकल्प दिवंगत नेते अजित पवार यांना समर्पित केला. या अर्थसंकल्पात शेतकऱ्यांसाठी 'पुण्यश्लोक अहिल्यादेवी कर्जमाफी योजना' जाहीर करत फडणवीसांनी सर्वात मोठी घोषणा केली आहे.

शेतकऱ्यांना २ लाखांपर्यंत कर्जमाफी
'लोकसत्ता'च्या वृ्त्तानुसार, राज्यातील बळीराजाला मोठा दिलासा देताना मुख्यमंत्र्यांनी कर्जमाफीची घोषणा केली. ३० सप्टेंबर २०२५ पर्यंत ज्या पात्र शेतकऱ्यांचे पीक कर्ज थकीत आहे, त्यांना दोन लाख रुपयांपर्यंत कर्जमाफी दिली जाणार आहे. यासाठी एका विशेष समितीची स्थापना करण्यात आली होती, ज्यांच्या शिफारसीनुसार ही ऐतिहासिक 'पुण्यश्लोक अहिल्यादेवी कर्जमाफी योजना' राबवण्यात येणार आहे.
अजितदादांना वाहिली भावपूर्ण श्रद्धांजली
अर्थसंकल्प मांडताना मुख्यमंत्री फडणवीस भावूक झाले होते. "अजितदादांनी ११ वेळा अर्थसंकल्प मांडला, त्यांच्या कडक स्वभावामुळे प्रशासनात शिस्त राहिली," अशा शब्दांत त्यांनी दादांच्या आठवणींना उजाळा दिला. त्यांच्या स्मरणार्थ भव्य स्मारक उभारण्याची आणि नागरी पुरस्कार त्यांच्या नावाने सुरू करण्याची घोषणाही त्यांनी यावेळी केली.
इतर महत्त्वाच्या घोषणा
- सामाजिक समरसता वर्ष: २०२६-२७ हे वर्ष सामाजिक समरसता वर्ष म्हणून साजरे केले जाईल.
- महात्मा फुले जयंती: महात्मा फुले यांच्या २०० व्या जयंतीनिमित्त विशेष समिती आणि निधीची तरतूद.
- पायाभूत सुविधा: भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या शताब्दी निमित्त रायगड येथे पायाभूत सुविधांचा विकास केला जाईल.
- बाळासाहेब ठाकरे स्मारक: स्मारकाचे काम पूर्ण झाल्याची घोषणा.
काय स्वस्त आणि काय महाग? (Budget 2026 List)
(टीप : अर्थसंकल्पातील तरतुदींमुळे सर्वसामान्यांच्या खिशावर काहीसा परिणाम होऊ शकतो. यासंदर्भात माहिती जशी येईल तशी यादी अपडेट होईल.)












Click it and Unblock the Notifications