Get Updates
Get notified of breaking news, exclusive insights, and must-see stories!

विकास कामाच्या जोरावर रत्नागिरीत सलग पाचव्या विजयासाठी शिवसेना नेते उदय सामंत सज्ज

Maharashtra Assembly Election 2024 : शिवसेना या पक्षाला जशी रांगड्या आणि आक्रमक शिवसैनिकांची परंपरा लाभली आहे तसेच नेमस्त आणि संयमी शिवसैनिकांचीही मोठी परंपरा लागली आहे. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्यासोबत जे शिवसैनिक होते त्यात प्रमोद नवलकर, सुधीर जोशी, दत्ताजी साळवी, मनोहर जोशी अशा नेमस्त शिवसैनिकांचा समावेश होता. सुशिक्षित आणि मध्यमवर्गीय मराठी माणसात या नेमस्त शिवसैनिकांनी शिवसेना भिनवली. सध्याच्या शिवसेनेत ही परंपरा सांभाळणारे नेतृत्व म्हणजे रत्नागिरीचे आमदार तसेच राज्याचे सध्याचे उद्योग मंत्री उदय सामंत.

उदय सामंत हे उद्योजक परिवारातून येतात. त्यांचे वडील रवींद्र सामंत मोठे ठेकेदार आहेत. तरुणपणापासूनच सामाजिक कार्याची आवड असणाऱ्या उदय सामंत यांनी वयाच्या अवघ्या 26 व्या वर्षी विधानसभेत प्रवेश केला. सलग दोन निवडणुका राष्ट्रवादीच्या तिकिटावर जिंकल्यानंतर 2014 साली त्यांनी शिवसेनेत प्रवेश केला. तरुण वर्गात असलेली प्रचंड क्रेझ, रत्नागिरी आणि परिसरातील सामाजिक सांस्कृतिक तसेच धार्मिक कार्यक्रमात सहभाग, सर्वांना सढळ हस्ते केलेली मदत, विविध क्रीडा उपक्रमांना दिलेली मदत त्यांच्या जोरावर उदय सामंत यांनी रत्नागिरी मतदारसंघ व्यवस्थित बांधला.

Shivsena Leader Uday Samant

मतदारसंघावर त्यांची पकड इतकी जबरदस्त आहे की त्यांच्या विरोधात उमेदवार देताना विरोधी पक्षांना खूप विचार करावा लागतो. 2014 साली शिवसेनेतून ते निवडून आले. 2019 साली उद्धव ठाकरे यांच्या मंत्रिमंडळात उच्च आणि तंत्र शिक्षण मंत्री होते. 2022 साली राज्यात मोठा उलटफेर झाला. शिवसेनेतील 40 आमदारांनी आणि आठ मंत्र्यांनी उद्धव ठाकरे यांचे नेतृत्व झुगारून दिले आणि एकनाथ शिंदे यांची पक्षाचे नेतेपदी निवड केली. एकनाथ शिंदे यांना सर्वात शेवटी येऊन मिळालेले मंत्री म्हणजे उदय सामंत होत.

महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणावर गुंतवणूक

एकनाथ शिंदे यांच्या मंत्रिमंडळात त्यांना उद्योग खात्याची जबाबदारी देण्यात आली. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजितदादा पवार यांच्या नेतृत्वाखाली उदय सामंत यांनी उद्योग खात्याची धुरा समर्थपणे सांभाळली आणि मोठ्या प्रमाणात गुंतवणूक महाराष्ट्रात आणण्यावर प्रचंड भर दिला. त्यांच्या काळात झालेले विविध करार मदार, महाराष्ट्रात वाढलेली गुंतवणूक त्यांच्या कर्तबगारीची साक्ष देते. सुशिक्षित आणि सुसंस्कृत व्यक्तिमत्व तसेच अत्यंत नेमस्त स्वभाव यामुळे उच्चभ्रू वर्तुळात त्यांना चांगला सन्मान मिळतो. या वर्गात त्यांची स्वीकारार्हता काहीशी अधिक आहे.

रत्नागिरीचा कायापालट

शिवसेनेत प्रवेश केल्यापासून गेल्या दहा वर्षात उदय सामंत यांनी रत्नागिरी शहर आणि परिसराचा अक्षरशः कायापालट करून टाकला. अंतर्गत रस्त्यांच्या सुधारणेवर त्यांनी प्रचंड भर दिला तसेच मतदारसंघाच्या विकासासाठी मोठ्या प्रमाणात निधी खेचून आणला. एक आमदार म्हणून गेली वीस वर्षे त्यांची मतदारसंघावर प्रचंड पकड आहेत पण एक मंत्री म्हणून महाराष्ट्राच्या विकासासाठी त्यांनी दिलेले योगदान जास्त महत्त्वाचे आहे असे म्हणण्यास हरकत नाही.

रत्नागिरीत 29 हजार कोटींची गुंतवणूक

रत्नागिरी हे महाराष्ट्राच्या पश्चिम किनारपट्टीवर वसलेले शहर आहेत. आंबा, मासेमारी आणि पर्यटन या तीन मुख्य बाबींवर जिल्ह्याची अर्थव्यवस्था अवलंबून असली तरी रत्नागिरी, चिपळूण येथे असलेल्या एमआयडीसी देखील स्थानिकांना मोठ्या प्रमाणात रोजगार उपलब्ध करून देतात. उद्योग मंत्री म्हणून उदय सामंत यांनी रत्नागिरी जिल्ह्यात तब्बल 29 हजार कोटी रुपयांची गुंतवणूक खेचून आणली. वाटद एमआयडीसी येथे या गुंतवणुकीतून भव्य प्रकल्प उभारणार असून त्यात 38 हजार तरुणांना प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष रोजगाराच्या संधी प्राप्त होणार आहेत. तळ कोकणाच्या दृष्टीने हा अत्यंत महत्त्वाचा आणि रोजगाराच्या संधी मोठ्या प्रमाणात उपलब्ध करून देणारा भव्य प्रकल्प ठरणार आहे. हा प्रकल्प कार्यान्वित झाल्यानंतर कोकणातून मुंबईकडे होणारे स्थलांतर मोठ्या प्रमाणात कमी होणार आहे.

रत्नागिरीत वैद्यकीय महाविद्यालयाची चाहूल

आरे वारे किनारा, थिबा पॅलेस, भाट्ये समुद्रकिनारा ही रत्नागिरीची वैशिष्ट्ये आहेत. उदय सामंत यांनी आपल्या प्रयत्नातून रत्नागिरीत तारांगण उभारले आहे. श्रीमान हिंदुहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे प्लॅनेटोरियम च्या माध्यमातून रत्नागिरीत वैज्ञानिक दृष्टिकोन वाढीस लागण्यास मोठी मदत होणार आहे. एक जिल्हा एक वैद्यकीय महाविद्यालय हे सरकारचे धोरण आहे. त्या धोरणाचे अंतर्गत रत्नागिरी जिल्ह्यात वैद्यकीय महाविद्यालय व्हावे ही गेल्या अनेक वर्षांपासून ची मागणी आहे. उदय सामंत यांच्या प्रयत्नातून रत्नागिरी त्याची चाहूल लागली आहे. वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालयामुळे रत्नागिरी जिल्ह्यातील तरुणांना वैद्यकीय शिक्षण घेण्याची संधी उपलब्ध होणार असून जिल्ह्यातील आरोग्य सुविधाही अधिक दर्जेदार होणार आहेत.

राज्यातील सर्वात उंच शिवपुतळा

छत्रपती शिवाजी महाराज हे अखंड महाराष्ट्राचे नव्हे तर उभ्या भारताचे दैवत आहे. हिंदवी स्वराज्याची स्थापना करून छत्रपती शिवाजी महाराजांनी संपूर्ण महाराष्ट्राला स्वातंत्र्य आणि स्वाभिमानाची प्रेरणा दिली.. उदय सामंत त्यांच्या प्रयत्नातून रत्नागिरीत महाराष्ट्रातील सर्वात उंच छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा उभारण्यात आला आहे.

गोळप येथे सौर उर्जा प्रकल्प

सौर ऊर्जा ही काळाची गरज आहे. आज राज्याच्या ऊर्जेची वाढती गरज भागवण्यासाठी सरकारकडून सौर ऊर्जेच्या निर्मितीसाठी मोठ्या प्रमाणावर प्रयत्न करण्यात येत आहेत. उदय सामंत यांच्या प्रयत्नातून गोळप येथे एक हजार किलोवॅट सौर ऊर्जा प्रकल्प विकसित करण्यात येत आहे. या प्रकल्पामुळे शेतकऱ्यांच्या वीज बिलात मोठी कपात होणार आहे आणि अखंडित वीज पुरवठ्याच्या दृष्टीने हा प्रकल्प अत्यंत महत्त्वपूर्ण ठरणार आहे.

सावरकर सभागृहाची सुधारणा

स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर हे भारताच्या स्वातंत्र लढ्यातील एक लखलखते पान आहे. अंदमानच्या कारागृहातून मुक्तता झाल्यानंतर सावरकर यांचे रत्नागिरीत वास्तव्य होते. रत्नागिरी आणि सावरकर हे खूप जवळचे नाते आहे. शहरात उभारण्यात आलेल्या सावरकर सभागृहाचे उदय समस्यांच्या प्रयत्नातून आधुनिकीकरण करण्यात आले. रत्नागिरी शहर आणि परिसराच्या सांस्कृतिक जडणघडणीसाठी हे सभागृह अत्यंत महत्त्वाचे आणि मोलाचे ठरणार आहे. या सभागृहाची आसनक्षमता 900 पर्यंत वाढविण्यात आली आहे. रत्नागिरीचे सांस्कृतिक वातावरण लक्षात घेता विविध कलाक्षेत्रात कार्यरत असणाऱ्या स्थानिक कलाकारांसाठी या माध्यमातून एक हक्काचे ठिकाण उपलब्ध करून देण्यात आले आहे.

पाचव्या विजयासाठी सज्ज

उदय सामंत यांनी विविध उपक्रमांच्या माध्यमातून रत्नागिरी आणि परिसरात प्रचंड मोठा जनसंपर्क उभा केला आहे. त्यांचे बंधू किरण सामंत आणि वडील रवींद्र सामंत यांचीही त्यांना चांगली साथ लाभली आहे. एकनाथ शिंदे यांनी रत्नागिरी विधानसभा मतदारसंघातून उदय सामंत यांना पुन्हा एकदा संधी दिली आहे. 2004 साली आणि 2009 साली उदय सामान यांच्याकडूनच पराभूत झालेले माजी आमदार आणि भाजपचे बंडखोर बाळ माने यांना उद्धव ठाकरे यांच्या गटाकडून संधी मिळाली आहे. आपल्या लोकसंपर्काच्या आणि आपल्या विकास कामांच्या जोरावर उदय सामंत सलग पाचवी लढाई जिंकण्यासाठी सज्ज झाले आहेत.

Notifications
Settings
Clear Notifications
Notifications
Use the toggle to switch notifications
  • Block for 8 hours
  • Block for 12 hours
  • Block for 24 hours
  • Don't block
Gender
Select your Gender
  • Male
  • Female
  • Others
Age
Select your Age Range
  • Under 18
  • 18 to 25
  • 26 to 35
  • 36 to 45
  • 45 to 55
  • 55+