Get Updates
Get notified of breaking news, exclusive insights, and must-see stories!

एकनाथ शिंदे ; शब्दाला जागणारा नेता

मुंबई : महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आणि शिवसेना पक्षाचे मुख्य नेते एकनाथ शिंदे हे दिलेला "शब्द पाळणारे नेते" म्हणून ओळखले जातात. "माणसं जोडणारा माणूस" अशी त्यांची ओळख आहे. राज्यात महाविकास आघाडीचे सरकार असताना मूळ शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे राज्याचे मुख्यमंत्री होते आणि उद्धव ठाकरे यांचे पुत्र आदित्य ठाकरे हे महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळात कॅबिनेट मंत्री होते. पण दोघांनीही स्वतःच्या पक्षाच्या आमदारांकडेच अक्षम्य दुर्लक्ष केले आणि आमदारांचा ओढा एकनाथ शिंदे यांच्याकडे वळला.

नगर विकास मंत्री या नात्याने एकनाथ शिंदे यांनी प्रत्येक आमदाराला मदत केली.कोविडचा काळ असो किंवा वादळ, पूर अशा नैसर्गिक आपत्ती. एकनाथ शिंदे यांनी आमदाराला ठाण्यातून मदत पाठवली नाही,असे कधीही घडले नाही. त्यामुळेच शिवसेनेचे आमदार आणि एकनाथ शिंदे यांचे नाते अधिकाधिक घट्ट होत गेले.

Cm Eknath Shinde

शिवसेना पक्षात एकनाथ शिंदे यांचे वजन वाढते आहे हे लक्षात येतात ठाकरे परिवाराने त्यांचे पंख छाटण्यास सुरुवात केली.. नगर विकास मंत्रालयात "परिवाराचा" हस्तक्षेप वाढला. एम एम आर डी ए च्या बैठका एकनाथ शिंदे यांना टाळून आदित्य ठाकरे घेऊ लागले. विधान परिषद निवडणुकीची रणनीती आखतानाही एकनाथ शिंदे यांना बाजूला ठेवण्यात आले. त्यामुळे अस्सल शिवसैनिक असलेल्या एकनाथ शिंदे यांचा संताप होणे साहजिक होते.

जून 2022 मध्ये झालेली विधान परिषदेची निवडणूक ही उंटाच्या पाठीवरची शेवटची काडी ठरली आणि एकनाथ शिंदे सुरत मार्गे गुवाहाटीला निघून गेले. त्यांच्यासोबत नेमके किती आमदार आहेत, याचा अंदाज सुद्धा पक्षाच्या नेतृत्वाला येऊ शकला नाही. आणि हा हा म्हणता म्हणता चाळीस आमदार आठ मंत्री यांनी एकनाथ शिंदे यांना साथ दिली. उद्धव ठाकरे यांना पाठिंबा देणाऱ्या अपक्ष आमदारांचाही त्यात समाज होता. आपली आमदारकी आणि आपले मंत्री पणाला लावून एकनाथ शिंदे यांना साथ देणे ही सोपी गोष्ट नव्हती. पण तरीही ती जोखीम आमदारांनी पत्करली याचे कारण होते एकनाथ शिंदे यांनी दिलेला शब्द.

विधानसभेतील गाजलेले भाषण

मुख्यमंत्री झाल्यानंतर एकनाथ शिंदे यांचे विधानसभेतील भाषण प्रचंड गाजले. "माझ्यासोबत आलेल्या एकाही आमदाराचे नुकसान होणार नाही, हा माझा शब्द आहे" असे त्यांनी विधिमंडळात ठणकावून सांगितले. शिंदे यांच्या सोबत गेलेल्या आमदारांना धमक्या देणाऱ्या उद्धव ठाकरे गटाच्या नेते आणि कार्यकर्त्यांचा अक्षरशः नाईलाज झाला इतकी ताकद एकनाथ शिंदे यांनी आपल्या आमदारांच्या पाठीशी उभी केली. "विधान भवनला जाताना आधी वरळी लागते" असा इशारा उद्धव ठाकरे यांचे पुत्र आदित्य ठाकरे यांनी दिला होता. मात्र आदित्य ठाकरे त्या चाळीस आमदारांचे काहीही करू शकले नाहीत. एकनाथ शिंदे यांची ती ताकद होती.

खासदारांनीही उभारले बंडाचे निशाण

40 आमदार एकनाथ शिंदे यांच्या सोबत जाताचं खासदारांनीही बंडाचे निशाण उभारले.18 पैकी तब्बल 13 खासदार एकनाथ शिंदे यांच्यासोबत गेले. विधान परिषदेचे आमदार देखील शिंदे यांच्या सोबत आले.गावोगावचे शाखाप्रमुख, तालुकाप्रमुख, जिल्हाप्रमुख, सरपंच, पंचायत समिती सदस्य, जिल्हा परिषद सदस्य, माजी नगरसेवक यांचीही एकनाथ शिंदे यांच्याकडे रीघ लागली. उद्धव ठाकरे यांना डावलून एकनाथ शिंदे यांच्यासोबत जाण्याचे एकमेव कारण म्हणजे एकनाथ शिंदे दिलेला शब्द पूर्ण करतात हा शिवसैनिकांना वाटत असलेला ठाम विश्वास.

पहिल्या परीक्षेत उत्तीर्ण

लोकसभेची निवडणूक ही एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाची पहिली कसोटी होती.त्यात एकनाथ शिंदे जबरदस्त यशस्वी झाले आणि त्यांनी उद्धव ठाकरे यांच्या तोडीस तोड यश मिळविले. आपल्या प्रत्येक उमेदवाराला आवश्यक ती सगळी रसद शिंदे यांनी पुरवली. काही मतदारसंघात तर एकनाथ शिंदे शेवटच्या क्षणापर्यंत ठाण मांडून बसले होते. लोकसभा निवडणुकीत एकनाथ शिंदे यांच्या अंगात असलेल्या शिवसैनिक खऱ्या अर्थाने दिसून आला. कुणाचेही नुकसान होऊ देणार नाही, प्रत्येकाच्या पाठीशी ठाण पणे उभा राहणार हा शब्द त्यांनी पूर्ण केला.

लोकसभा निवडणुकीत भावना गवळी,कृपाल तुमाने,हेमंत पाटील असा उमेदवारांची तिकिटे कापण्यात आली होती. पण त्यांनाही विधान परिषदेवर संधी देऊ एकनाथ शिंदे यांनी त्यांचे संपूर्ण पुनर्वसन केले.

आता खरी कसोटी

आता विधानसभा निवडणुका ही एकनाथ शिंदे यांचा नेतृत्वाची खरी कसोटी आहे. आपल्या मुख्यमंत्रीपदाच्या कार्यकाळात त्यांनी आणलेल्या विविध योजना, त्या योजनेची केलेली यशस्वी अंमलबजावणी, मुख्यमंत्री म्हणून महाराष्ट्राच्या जनमानसात निर्माण केलेली स्वतःची प्रतिमा, विकासाच्या प्रकल्पांना चालना देऊन महाराष्ट्राच्या प्रगतीसाठी झटणारा मुख्यमंत्री अशी निर्माण केलेली ओळख, यांचा कस या निवडणुकीत लागणार आहे. उद्धव ठाकरे, शरद पवार, आणि काँग्रेस असे विहिरी आव्हान घेऊन एकनाथ शिंदे आपल्या शिवसेनेची नौका वादळात नेत आहेत.

सहकारी आमदारांना दिलेला शब्द पूर्ण केला

शिवसेनेचे उमेदवारांची पहिली यादी काल जाहीर झाली आहे.या यादीवर नजर टाकली असता एकनाथ शिंदे यांनी आपल्या सोबत आलेल्या आमदारांना दिलेला शब्द पूर्ण केल्याचे दिसून येत आहे.सोबत आलेल्या सर्वच आमदारांना त्यांनी पुन्हा उमेदवारी दिली असून, ज्यांची तिकिटे कापली त्यांच्या पत्नीला किंवा मुलाला विधानसभा निवडणुकीत संधी देण्यात येत आहे.शिवसेना लढवीत असलेल्या जवळपास प्रत्येक मतदारसंघात शिंदे यांची एक फेरी पूर्ण झाली आहे. विविध योजनांचा लाभ त्यांनी आपल्या दौऱ्यात स्थानिक नागरिकांना यापूर्वीच दिला आहे.

लोकसभा निवडणुकीत रत्नागिरी मतदार संघातून उदय सामंत यांचे बंधू किरण सामंत इच्छुक होते. मात्र भाजपने तो मतदार संघ स्वतःकडे घेतला आणि किरण सामंत यांना माघार घ्यावी लागली. आता किरण सामंत यांना राजापूर विधानसभा मतदारसंघातून उमेदवारी देऊन त्यांनी किरण सामंत आणि उदय सामंत या दोघांचेही समाधान केले आहेच, शिवाय मुत्सद्येगिरीतही एकनाथ शिंदे कमी नाही ते दाखवून दिले आहे.

शब्दाला जगणारा नेता ही ओळख कायम

विविध योजना एकनाथ शिंदे यांनी घोषित केल्या आणि त्यांची यशस्वी अंमलबजावणी केली.त्याबाबतीत त्यांनी आपला शब्द पूर्ण केला. ज्या खासदारांची तिकिटे कापण्यात आली त्यांना विधान परिषदेवर संधी देऊन त्यांचे नुकसान होणार नाही हा शब्दही पूर्ण केला. आणि आपल्या सोबत आलेल्या सर्वच आमदारांना पुन्हा संधी देऊन शिंदे यांनी आणखी एकदा शब्दाला जाणारा नेता ही ओळख कायम केली आहे.

More From
Prev
Next
Notifications
Settings
Clear Notifications
Notifications
Use the toggle to switch notifications
  • Block for 8 hours
  • Block for 12 hours
  • Block for 24 hours
  • Don't block
Gender
Select your Gender
  • Male
  • Female
  • Others
Age
Select your Age Range
  • Under 18
  • 18 to 25
  • 26 to 35
  • 36 to 45
  • 45 to 55
  • 55+