दगाफटका करणार नाही! उमेदवारांकडून निकालापूर्वी उद्धव ठाकरे, शरद पवारांनी घेतले प्रतिज्ञापत्र
Maharashtra Assembly Election Result 2024 : महाराष्ट्रात 23 नोव्हेंबरला म्हणजेच आज विधानसभा निवडणुकीचे निकाल हाती येत आहेत. एक टप्प्यात निवडणूक झाली असून मविआ आणि महायुतीत जोरदार चुरस दिसत आहे. निकालापुर्वीच राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाकडून महत्त्वपूर्व पाऊल उचलण्यात आले आहे. पक्षात याआधी पडलेली फूट लक्षात घेता आगामी काळात पुन्हा दगाफटका होऊ नये यासाठी दोन्ही पक्षांकडून आधीच काळजी घेण्यात येत आहे.
महाराष्ट्रातील कल हाती येत आहेत.दोन गटांमध्ये कोणाची सरशी होणार हे काही तासांत कळणार आहे, याकडे अनेकांच्या नजरा लागल्या आहेत. या पार्श्वभूमीवर ठाकरे गट आणि शरद पवार यांचे पक्ष अलर्ट मोडवर आहेत. निवडून आल्यानंतर आपण पक्षासोबतच राहू असं प्रतिज्ञापत्र पक्षातील सर्व उमेदवारांकडून घेण्यात आले आहे. पक्षात याआधी पडलेली फूट लक्षात घेता आगामी काळात पुन्हा दगाफटका होऊ नये यासाठी आधीच काळजी दोन्ही पक्षाकडून घेण्यात येत आहे.

उमेदवारांकडून घेतले प्रतिज्ञापत्र
राज्यात हाॅटेल पाॅलिटीक्स रंगण्याची चिन्हे आहेत, अशा स्थितीत निकालानंतर जर कोणी उमेदवाराने दगाफटका केला तर याचा पक्षाला मोठा फटका बसू शकतो. यामुळेच निकाल लागल्यानंतर फोडाफोडी टाळण्यासाठी आणि दगाफटका टाळण्यासाठी तसेच निवडणूक झाल्यानंतर पक्षासोबतच राहणार आहोत अशा आशयाची प्रतिज्ञापत्र विद्यमान आमदारांसह उमेदवारांकडून लिहून घेण्यात आली आहेत. पक्षफुटीचा पूर्वीचा अनुभव पाहता हे पाऊल उचलण्यात येत आहे.
त्रिशंकु विधानसभा म्हणजे काय?
कोणत्याही राजकीय पक्षाला किंवा आघाडीला पूर्ण बहुमत न मिळाल्यास त्रिशंकू विधानसभा घोषित केली जाते. या प्रकरणात इतर राजकीय पक्षांच्या पाठिंब्याशिवाय कोणताही पक्ष सरकार स्थापन करू शकत नाही. अशा परिस्थितीत, राज्यपाल सर्वात मोठ्या पक्षाच्या नेत्याला सरकार स्थापन करण्यासाठी आमंत्रित करतात आणि पूर्ण बहुमत दाखवण्यासाठी 10 दिवसांचा कालावधी देऊ शकतात. या कालावधीत पूर्ण बहुमत दाखवता आले नाही, तर राज्यपाल विधानसभा विसर्जित करतात आणि पुन्हा निवडणुका घेण्याची मागणी करु शकता.
सरकार स्थापन करण्यासाठी बाहेरून पाठिंबा
जर पक्ष आणि युती पूर्ण बहुमत व्यवस्थापित करू शकत नाहीत, तर ते सरकार स्थापन करण्यासाठी राजकीय पक्षाकडून बाह्य समर्थन घेऊ शकतात. सहसा, बाह्य समर्थन देणारा पक्ष सरकारचा भाग नसतो आणि त्यांच्या राजकारण्यांना मंत्रीपद नसते. बाह्य समर्थन वापरून स्थापन केलेली सरकारे कधीही कोसळु शकतात. ते असुरक्षित असतात कारण बाह्य समर्थन देणाऱ्या पक्ष कधीही पाठिंबा काढून घेऊ शकतात.












Click it and Unblock the Notifications