ठरलं..? महायुतीत मुख्यमंत्री कुणाचा..? महाराष्ट्रात 'हे' दोन फाँर्म्यूले निश्चित
महाराष्ट्रातील जनतेने महायुतीच्या पारड्यात भरभरून मतदान टाकले. त्यामुळे आता महायुतीत सत्तेवर येणार हे निश्चित झाले आहे. आता फक्त मुख्यमंत्री कोण, याबाबत उत्सुकता आहे. महायुतीत भाजपने 132 जागा, शिवसेना शिंदे गटाने 57 जागा आणि राष्ट्रवादी अजित पवार गटाने 41 जागांवर विजय मिळवला आहे. त्यामुळे भाजपचाच मुख्यमंत्री होणार, अशा चर्चा सुरु झाल्या आहेत. मात्र महायुती म्हणून तिन्ही पक्षांनी एकत्र निवडणूक लढवली असल्याने भाजपचे दिल्लीतील वरिष्ठ काही धक्कातंत्र अवलंबतात का, हेही औत्युक्याचे झाले आहे.

कसे आहे महाराष्ट्रातील बलाबल
महाराष्ट्रात झालेल्या विधानसभा निवडणुकीत भाजपने 132 जागा, शिवसेना शिंदे गटाने 57 जागा आणि राष्ट्रवादी अजित पवार गटाने 41 जागांवर विजय मिळवला आहे. तर महाविकास आघाडीला फक्त 46 जागांवर समाधान मानावे लागले आहे. त्यात काँग्रेसने 16 जागा, ठाकरे गटाने 20 जागा आणि राष्ट्रवादी शरद पवार गटाने 10 जागा जिंकल्या. अपक्षांनीही 12 जागा मिळवल्. यामुळे राज्यात महायुतीची सत्ता येणार हे निश्चित झाले आहे. आता सत्तास्थापनेच्या हालचालींना वेग आला आहे. त्यातच आता नुकताच मुख्यमंत्रिपदाचा फॉर्म्युला समोर आल्याच्या चर्चा आहेत. मुख्यमंत्रीपदासाठी दोन फाँर्म्यूले निश्चित करण्यात आल्याची माहिती मिळत आहे.
अडीच- अडीच वर्षाचा फॉर्म्युला
सत्तास्थापनेपूर्वी महायुतीच्या तिन्ही प्रमुख नेत्यांची बैठक झाली. मुख्यमंत्रिपदाच्या दोन फॉर्मुल्यावर महायुतीच्या बैठकीत चर्चा करण्यात आली. या चर्चेत मुख्यमंत्रिपदासाठी अडीच- अडीच वर्षाचा फॉर्म्युलासाठी शिंदे गट आग्रही असल्याचे पाहायला मिळले. यातील पहिला फॉर्म्युलामध्ये अडीच वर्ष मुख्यमंत्रीपद भाजपकडे असेल. आणि त्यानंतरचे अडीच वर्ष मुख्यमंत्रीपद हे शिंदे गटाकडे असेल.
2-2-1 या फॉर्म्युलावरही चर्चा
मुख्यमंत्रिपदासाठी 2-2-1 अशा फॉर्म्युलावरही चर्चा सुरु आहे. या फॉर्म्युलानुसार भाजपकडे दोन वर्षे, शिंदे गटाकडे दोन वर्षे आणि अजित पवारांकडे एक वर्ष मुख्यमंत्रिपद दिले जाईल. या फॉर्म्युलासाठी अजित पवार गट हा प्रचंड आग्रही आहे. आता या फॉर्म्युलावर चर्चा करण्यासाठी महायुतीतील तिन्ही नेते दिल्लीला जाण्याची शक्यता आहे. मात्र या दोन्ही फाँर्म्यूल्याला भाजपचे नेते सुधीर मुनगंटीवार यांनी नकार दिला. ते म्हणाले, मुख्यमंत्रीपद हे अडीच-अडीच वर्षे किंवा 2-2-1 अशा फॉर्म्युल्यामध्ये वाटणार नाही. सध्या महाराष्ट्राला स्थिर सरकार हवे आहे. महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रिपदाचा निर्णय पंतप्रधान नरेंद्र मोदी, अमित शाह आणि पक्षाचे वरिष्ठ नेते घेतील.












Click it and Unblock the Notifications