Get Updates
Get notified of breaking news, exclusive insights, and must-see stories!

महाराष्ट्रात आज निवडणूक झाली तर 'मविआ' अन् महायुतीला किती मिळतील जागा, कोण बाजी मारेल?

Opinion Poll Maharashtra : आगामी दीड ते दोन महिन्यावर महाराष्ट्र विधानसभा निवडणूक लागण्याची शक्यता आहे. वेळप्रसंगी सप्टेंबर महिन्याच्या शेवटी निवडणूक आयोग महाराष्ट्र निवडणुकीची घोषणा करण्याची शक्यता आहे. त्यामुळे राज्यातील सर्वच पक्ष निवडणुकीच्या तयारीला लागलेले आहे. मागील पाच वर्षात महाराष्ट्राने अनेक राजकीय चढउतार पाहिलेत, अनेक राजकीय भूकंप राज्यात घडून आलेत.

त्यामुळे यदाची निवडणूक ही केवळ महाराष्ट्रासाठीच नव्हे तर देशभरातील लोकांना उत्सुकतेचा विषय ठरणार आहे. जर निवडणूक आयोगाने आजच राज्यात निवडणूक घेतली तर कोणत्या पक्षाला किती जागांवर विजय मिळू शकतो, याचा सर्व्हे टाइम्स नाऊ नवभारत- मॅट्रीस सर्व्हे यांनी केला. त्यात दिलेली आकडेवारी ही धक्कादायक आहे.

MVA- MAHAYUTI

राज्यात सध्या काय परिस्थिती आहे?

टाईम्स नाऊ नवभारत-मॅट्रिक्सने याबाबत सर्व्हे केला. यातून अनेक धक्कादायखक निष्कर्ष त्यांनी मांडले आहे. या मतदानाच्या निकालात महाविकास आघाडी आणि महायुती यांच्या अत्यंत निकराची स्पर्धा पाहायला मिळणार आहे. सर्वेक्षणात महायुती (भाजप, राष्ट्रवादी, शिवसेना) आघाडीवर असली तरी महाविकास आघाडी त्यापेक्षा खूप फरकाने खाली दिसत नाही. त्यामुळे ही निवडणूक कोणत्याही पक्षासाठी सोपी नाही.

महाराष्ट्र विधानसभेत एकूण 288 जागा आहेत आणि सरकार स्थापन करण्यासाठी आवश्यक जादूई आकडा हा 145चा लागतो. त्यामुळे नेमका हा मॅजिक फिगर कोणाला मिळेल, याकडे सर्वांचेच लक्ष लागून आहे. सर्वेक्षणात विचारण्यात आलेल्या प्रश्नामधून दोन्ही आघाडीला चांगलेच आकडे मिळाल्याचे पाहायला मिळत आहेत

आज निवडणुका झाल्या तर महाराष्ट्रात कोणाचे सरकार स्थापन होणार?

  • एकूण जागा: 288
  • मॅजिक आकडा: 145
  • महायुती: 137-152
  • MVA: 129-144
  • इतर: 03-08

या सर्व्हेक्षणावरून पक्षनिहाय अशा जागा मिळू शकतात

  • भाजपला 83-93 जागा म्हणजे 26.2% मते मिळतात.
  • SHS (SS) ला 42-52 जागा म्हणजेच 6.8% मते मिळतात.
  • NCP (AP) ला 07-12 जागा मिळाल्या आहेत. म्हणजे 2.8% मते.
  • काँग्रेसला 58-68 जागा म्हणजेच 16.2% मते मिळाली आहेत.
  • NCP (SP) ला 13.7% मते म्हणजेच 35-45 जागा मिळतील असे दिसते.
  • तर इतरांना 10.1 टक्के मते म्हणजेच 03-08 जागा मिळतील असे दिसते.


2019 च्या महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीची स्थिती काय होती?

  • एकूण जागा: 288
  • भारतीय जनता पक्ष 105
  • शिवसेना 56
  • भारतीय राष्ट्रीय काँग्रेस 44
  • राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष 54
  • ऑल इंडिया मजलिस-ए-इत्तेहादुल मुसलमीन 2
  • मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष 1
  • महाराष्ट्र नवनिर्माण सेना 1
  • समाजवादी पक्ष 2
  • अपक्ष 23


महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत हे मुद्दे प्रबळ असतील

शेतकरी आणि कृषी संकट: कृषी संकट आणि शेतकऱ्यांच्या समस्या हा महाराष्ट्रातील निवडणुकीच्या चर्चेचा मुख्य केंद्रबिंदू आहे. दुष्काळ, कर्जमाफी, पीक विमा या मुद्द्यांवर राजकीय पक्ष आपापला अजेंडा घेऊन बाहेर पडतील.

विकास आणि पायाभूत सुविधा : मुंबई, पुणे, नागपूर यांसारख्या शहरांमध्ये विकास प्रकल्प आणि पायाभूत सुविधांवर भर दिला जाईल.

सांस्कृतिक ओळख : शिवसेना आणि भाजप सारखे पक्ष यावेळीही मराठी अस्मिता आणि संस्कृती हा मुख्य मुद्दा बनवू शकतात.

Notifications
Settings
Clear Notifications
Notifications
Use the toggle to switch notifications
  • Block for 8 hours
  • Block for 12 hours
  • Block for 24 hours
  • Don't block
Gender
Select your Gender
  • Male
  • Female
  • Others
Age
Select your Age Range
  • Under 18
  • 18 to 25
  • 26 to 35
  • 36 to 45
  • 45 to 55
  • 55+