Get Updates
Get notified of breaking news, exclusive insights, and must-see stories!

Oneindia Marathi Analysis: राज्यात 'वंचित'ची ताकद घटली! विधानसभेनंतर या पक्षाचे काय असेल भविष्य वाचा

Vanchit Prakash Ambedkar's Strength Decreased : वंचित बहुजन आघाडी (वंचित) हा प्रकाश आंबेडकर यांच्या नेतृत्वाखालील पक्ष, ज्याने 2019 च्या लोकसभा निवडणुकीत चांगली कामगिरी केली होती. परंतु, 2024 च्या लोकसभा निवडणुकीत पक्षाची कामगिरी अपेक्षेप्रमाणे राहिली नाही. 2019 मध्ये वंचित-एमआयएम आघाडीने 41 लाखांहून अधिक मते घेतली होती. त्यावेळी एमआयएम आणि वंचितचे उमेदवार इम्तियाज जलील हे छत्रपती संभाजीनगर लोकसभा मतदारसंघातून विजयी झाले होते. मात्र, 2024 मधील निवडणुकीत वंचितने स्वतंत्र लढत दिली.

Vanchit Prakash Ambedkar s Strength Decreased

पक्षाला एकूण 15 लाख 66 हजार 949 मते मिळाली. 38 पैकी 36 उमेदवारवारांची अनामत रक्कम जप्त झाली. वंचितला अपेक्षित यश मिळाले नाही, परंतु महाविकास आघाडी (मविआ)ला निवडणुकीत फटका बसेल, अशी भीती होती. परंतु महाविकास आघाडीने राज्यात लोकसभेच्या 30 जागा जिंकत दमदार कामगिरी केली, ज्यामुळे वंचितच्या वाटचालीवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. वंचितच्या कामगिरीमुळे त्याच्या पुढील राजकीय भविष्याबद्दल अनेक शंका उपस्थित झाल्या आहेत.

वंचित आघाडीचे नुकसान

लोकसभा निवडणुकीत वंचितला अकोला आणि हिंगोली या दोन ठिकाणी ठोस मतांचा आधार मिळाला. अकोला आणि हिंगोली या मतदारसंघांमध्ये वंचितला काही प्रमाणात मते मिळाली असली तरी इतर 36 मतदारसंघात वंचितच्या उमेदवारांची अनामत जप्त झाली. अकोला मतदारसंघात स्वतः प्रकाश आंबेडकर यांचा पराभव झाला आणि ते तिसऱ्या क्रमांकावर राहिले. यामुळे वंचितच्या आगामी विधानसभा निवडणुकीतील तयारीवरही मोठा परिणाम होण्याची शक्यता आहे.

वंचित बहुजन आघाडीची धोरणे

वंचित बहुजन आघाडीची लोकसभा निवडणुकीतील कामगिरी लक्षात घेता, महाविकास आघाडीने विधानसभेसाठी या वंचितबाबत फारसा उत्साह दाखवलेला नाही. शिवसेना (ठाकरे गट) आणि वंचित यांच्यात लोकसभा निवडणुकीसाठी चर्चेस सुरूवात झाली होती, परंतु वंचितच्या मोठ्या जागांच्या मागणीमुळे चर्चेतून काहीच निष्पन्न झाले नाही. महाविकासने लोकसभेतील निकाल पाहून वंचितला विधानसभेत गृहित धरलेले नाही. त्यामुळे वंचितने आगामी विधानसभा निवडणूक स्वबळावर लढवण्याची तयारी केली आहे.

तिसरी आघाडी आणि वंचित

विधानसभा निवडणुकीसाठी तिसरी आघाडी म्हणून काही नेत्यांचे प्रयत्न सुरू आहेत. संभाजीराजे छत्रपती, बच्चू कडू, आणि राजू शेट्टी यांनी एकत्र येऊन तिसरी आघाडी तयार करण्याची योजना आखली आहे. परंतु वंचित या आघाडीत सामील होईल का, यावर मोठी शंका आहे. आंबेडकर यांनी स्पष्टपणे सांगितले आहे की, जरांगे-पाटील यांच्यासोबत असलेल्या पक्षांशी ते कोणताही संबंध ठेवणार नाहीत.

काय असेल भविष्य?

सन 2024 लोकसभा निवडणुकीतील वंचित बहुजन आघाडीची कामगिरी आणि मविआने त्यांच्या आघाडीसाठी दाखवलेला कमी उत्साह हे पक्षासाठी धोक्याची घंटा ठरू शकतात. वंचित बहुजन आघाडीला आगामी विधानसभा निवडणुकीत एकत्रित काम करण्याची गरज असून, तीच त्यांच्यासाठी एक आशेचा किरण ठरू शकते.

More From
Prev
Next
Notifications
Settings
Clear Notifications
Notifications
Use the toggle to switch notifications
  • Block for 8 hours
  • Block for 12 hours
  • Block for 24 hours
  • Don't block
Gender
Select your Gender
  • Male
  • Female
  • Others
Age
Select your Age Range
  • Under 18
  • 18 to 25
  • 26 to 35
  • 36 to 45
  • 45 to 55
  • 55+