शरद पवार, सभा आणि पाऊस..! समिकरण दुसऱ्यांदा जुळलं; साहेब म्हणाले...
Maharashtra Assembly Election 2024 : शरद पवार, सभा आणि पाऊस हे समिकरण यापूर्वी २०१९ मध्ये जुळलं होतं. आता तसंच समिकरण पुन्हा २०२४ मध्ये जुळलं. यावेळी मैदान होतं इचलकरंजीच... विशेष म्हणजे साहेबांनी असा पाऊस आल्यावर निवडणुकीचा निकाल चांगला लागतो, असं म्हणताच टाळ्या अन् शिट्यांचा एकच जल्लोष झाला.
इचलकरंजीत काय घडलं
इचलकरंजीमध्ये महाविकास आघाडीचे उमेदवार मदन कारंडे यांच्यासाठी आज शरद पवारांची सभा झाली. शरद पवार या सभेसाठी आले त्यावेळी अचानक पावसाने जोरदार हजेरी लावली. त्यामुळे पुन्हा एकदा पाऊस आणि शरद पवार असे समीकरण जुळून आले. नेमका हाच धागा पकडत शरद पवार यांनी जोरदार फटकेबाजी केली. कारण २०१९ मध्येही कोल्हापूरमध्ये असंच समिकरण जुळलं होतं आणि मविआचा उमेदवार निवडून आला होता.

काय म्हणाले शरद पवार
या सभेच मार्गदर्शन करताना शरद पवार म्हणाले, की मी बोलायला उभा राहिलो की पावसाची सुरुवात होते, असं अनेकदा घडतं. आणि असा पाऊस आला की, निवडणुकीचा निकाल चांगला लागतो. शरद पवारांनी असं म्हणताच समोरुन एकच जल्लोष झाला. शिट्ट्या आणि टाळ्यांमध्ये जोरदार प्रतिसाद देत शरद पवारांनीही अफलातून फटकेबाजी केली.
आता बदलाशिवाय पर्याय नाही
शरद पवार म्हणाले की, कारभार कोणाच्या हातात द्यायचा हे आता ठरवायचे आहे. सत्तेत बदल केल्याशिवाय आता पर्याय नाही. महाविकास आघाडीचे उमेदवार विजयी करा, यापेक्षा इथे अधिक बोलावसं वाटत नाही. महाराष्ट्राचा पाळणा कोणाच्या हातात द्यायचा याचा निर्णय घ्यायचा आहे. ज्यांच्याकडे सत्ता आहे त्यांच्याकडे अनुभव काही चांगला नाही. महाराष्ट्रात महाविकास आघाडी सत्ता आल्याशिवाय राहणार नाही, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.












Click it and Unblock the Notifications