मनसे ठरणार सर्वात जास्त जागा लढवणारा पक्ष! राज ठाकरेंनी स्पष्टच सांगितलं वाचा काय म्हणाले?
Maharashtra Assembly Election 2024 Raj Thackeray : "महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने 2009 ला आणि 2014 ला ही जागा लढवल्या आहेत, महाराष्ट्रातील सर्व राजकीय पक्षांपेक्षा जास्त जागा आम्ही यावेळी लढवणार आहोत." अशी माहिती मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी स्पष्ट केले.
..तर आम्ही ते चालू देणार नाही
राज ठाकरे म्हणाले, या विधानसभा निवडणुकीनंतर मनसे सत्तेत असेल. पक्षाचा जाहीरनामा येईल. टोलमाफी ही आमचीच मागणी होती. आपली फसवणूक होतेय हे आम्ही लोकांसमोर मांडले. त्यानंतर सरकारला जाग आली. उशीरा का होईना पण सरकारला या गोष्टी समजल्या. मला काळजी याच गोष्टींची आहे की, निवडणुकीच्या तोंडावर टोलनाके बंद करायचे आणि नंतर सुरु करायचे असे चालणार नाही आणि होऊ देणारही नाही.

..तेव्हा सर्वच नेते गप्प होते
राज ठाकरे म्हणाले, मला असे वाटते की, हा निर्णय सरकारने घेतला तर लोकांनाही समाधान आहे. शेवटी कुठून पैसा येतो आणि कुठे जातोय हे कळायला मार्गच नाही. हा सगळा व्यवहार आतापर्यंत कॅशमध्ये होता किती गाड्या गेल्या कुणाच्या खिशात किती पैसे जात होते यावर सर्वच राजकीय पक्ष गप्प बसत होते. आता श्रेय घ्यायला सर्वचजण पुढे येतील. ज्यांचा कधीच काही संबंध आला नाही.
राज्य कंगाल होईल
राज ठाकरे म्हणाले, फुकट वाटून होणार नाही. आज पाच पाच आणि सात सात हजार वाटत आहात, ते सरकारी पैसे आहेत नेत्यांच्या घरचे पैसे नाहीत. सरकारकडे पैसेच नाही आणि ते वाटावाटी करत आहे. यापुढे ते पैसे वाटू शकणार नाही. राज्य कंगाल होईल.
जाहीरनामाही लवकरच येणार
राज ठाकरे म्हणाले, सर्व राजकीय पक्षातील सर्वात जास्त जागा महाराष्ट्र नवनिर्माण सेना आता जास्ती किती काय हे सर्वांपेक्षा जास्त असतील. 2009 ला आणि 2014 ला ही जागा लढवल्या पण लढवायच्या म्हणून लढवतो असे मी करत नाही. महाराष्ट्रातील दौरे लवकरच होतील जाहीर झाले की, सांगतो. राज ठाकरे यांनी आपल्या पक्षाचा जाहीरनामा आम्ही जाहीर करु पण आत्ताच सर्व सांगून उपयोग काय..योग्य वेळी योग्य गोष्टी होतील.












Click it and Unblock the Notifications