आम्ही विकासासाठी भाजपासोबत गेलो, छगन भूजबळ यांनी सर्व आरोप फेटाळून लावले
मुंबई : महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जेष्ठ पत्रकार राजदीप सरदेसाई यांच्या पुस्तकातून केलेल्या दाव्यामूळे राजकीय वर्तूळात एकच खळबळ उडाली आहे. 'द इलेक्शन दॅट सरप्राइज्ड इंडिया' या पुस्तकात भाजपासोबत गेल्याने ईडीपासून सुटका झाली, असं राष्ट्रवादीचे नेते छगन भूजबळ यांनी म्हटलं असल्याचा दावा करण्यात आला आहे. त्यानंतर छगन भूजबळ यांनी पत्रकार परिषद घेऊन सर्व दावे फेटाळून लावले आहेत.
'आपण हे पुस्तक वाचलं नाही, ते आपण वाचणार आहोत, तसेच आपल्या वकिलास हे पुस्तक वाचण्यास देणार आहे, त्यानंतर आठ दिवसांनी आक्षेपार्ह वाटलेल्या दाव्यांवर कायदेशीर कारवाई करणार असल्याचं भुजबळ यांनी सांगितलं आहे. तसेच विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पुस्तकात असं काय छापण्यात आलं आहे, याबाबत आपल्या माहीत नाही', असं भूजबळ यांनी म्हटलं आहे.

पुढे बोलताना भुजबळ म्हणाले की 'आपण कोणत्याही वृत्तपत्राला अशी मुलाखत दिली नाही. तसेच ईडीपासून सुटका व्हावी यासाठी आम्ही सर्व भाजपसोबत गेले हा आरोप अनेक दिवसांपासून होत आहे. तसेत महाराष्ट्र सदन प्रकरणात मला कोर्टाने क्लिन चीट दिली आहे. ही क्लिन चीट महाविकास आघाडीचे सरकार असताना दिली आहे. त्यावेळी मी शरद पवारांना भेटून पेढेही दिले होते' असं भूजबळ यांनी म्हटलं आहे.
भाजपासोबत मी विकासकामासाठी गेलो आहोत,आमच्या मतदार संघाचा विकास व्हावा हा त्याचा उद्देश आहे. माझ्या मतदार संघात आतापर्यंत दोन हजार कोटीचे कामे करण्यात आली असल्याचं भूजबळ यांनी सांगितले. या पुस्तकातून केलेले सर्व आरोप भूजबळ यांनी फेटाळून लावले आहेत.
काय आहे प्रकरण ?
ईडीपासून सुटका व्हावी म्हणूनच भाजपासोबत गेलो असल्याचा दावा राजदीप सरदेसाई यांच्या '2024 : द इलेक्शन दॅट सरप्राइज्ड इंडिया' या पुस्तकात करण्यात आला आहे. त्यामुळे राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे.
दरम्यान 'मी ओबीसी असल्यानं केंद्रीय यंत्रणा माझ्या मागे लावण्यात आली, असं छगन भुजबळ यांनी मुलाखतीत म्हटल्याचं पुस्तकात दावा करण्यात आला आहे. ईडीच्या तावडीतून सुटका झाल्यानंतर मला पुर्नजन्म झाल्यासारखं वाटतं, असं या पुस्तकात भूजबळ यांनी म्हटलं असल्याचं सांगण्यात येत आहे. तसेच ईडीपासून सुटका हवी असेल तर आपल्या सगळ्यांना भाजपासोबत जावं लागेलं, अशी भावना राष्ट्रवादीच्या नेत्यांच्या मनात होती.
नवाब मलिक, अनिल देशमुख यांना तुरुंगात जावं लागलं. या सोबतच सुनेत्रा पवार, सुनील तटकरे, हसन मुश्रीफ, अशा विविध नेत्यांना ईडीच्या चौकशांना सामोरे जावे लागले होते. मला, अनिल देशमुख व मलिकांना ईडीने अटक केली होती. अशा वेळी भाजपसोबत गेल्याशिवाय सुटका नाही, अशी भावना राष्ट्रवादीच्या काही नेत्याची झाली होती. हा विषय आम्ही पक्षाध्यक्ष शरद पवार यांच्याकडे मांडला. पवारांना हे सारे समजत होते. पण त्यांना भाजपबरोबर जाणं मान्य नव्हतं. तेव्हा अखेर अजित पवार यांच्या नेतृत्वाखाली पक्षाच्या आमदारांनी भाजपसोबत जाण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे ईडीपासुन सुटका झाली', अशी भावना भुजबळांनी व्यक्त केली असल्याचं, या पुस्तकात म्हटलं आहे.












Click it and Unblock the Notifications