"आम्हाला गोळ्या घातल्या हा फायदा केलाय का?"- CM शिंदेंच्या वक्तव्यावर मनोज जरांगेंचे प्रत्युत्तर
Maharashtra Assembly Election 2024 : मराठा आरक्षणकर्ते मनोज जरांगे यांनी या विधानसभा निवडणुकीत सत्ताधारी सरकारमधील पक्षांचे उमेदवार पाडणार असल्याचा काल इशारा दिला. त्यावर CM एकनाथ शिंदे यांनी देणारा कोण फसवणारा कोण असे उत्तर दिले. यावर पुन्हा मनोज जरांगेंनी प्रत्युत्तर दिले आहे.
आमच्या समाजाच्या दीड लाख पोरांवर केसेस लावल्या, आमच्या डोक्यात गोळ्या घातल्या हा आमचा फायदा काय? असा सवाल करत देवेंद्र फडणवीस यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत.

काय म्हणाले होते मनोज जरांगे?
मनोज जरांगे यांनी आचारसंहित्या लागल्यानंतर काल अर्थात 15 ऑक्टोबरला पत्रकार परिषद काल घेतली होती. त्यात आचारसंहीता लागल्याने मराठा आरक्षणाची सरकारकडून आशा संपली असे म्हटले होते. मराठ्यांची पोरं मोठी होऊ द्यायची नाही. मराठ्यांची पोरं भिकेला लागावी हा देवेंद्र फडणवीस यांचा हेतू होता मराठा समाजाला आरक्षण द्यायचे नाही ही देवेंद्र फडणवीसांची चाल यशस्वी झाली आहे, पण आता मी आणि मराठा समाज सत्ताधाऱ्यांचा विधानसभा निवडणुकीत सुपडा साफ केल्याशिवाय शांत बसणार नाही असा इशारा दिला होता.
जरांगेंच्या इशाऱ्यावर मुख्यमंत्र्यांचे आज उत्तर
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले की, मनोज जरांगे हे मराठा समाजाला न्याय देण्यासाठी रस्त्यावर उतरले. महायुतीने मराठा समाजाला काय काय दिले याचा विचार मनोज जरांगे यांनी करावा. मराठा समाजाला सारथी दिले. आर्थिक विकास महामंडळ, एक लाख तरुणांना उद्योजक बनवले. ओबीसीसारख्याच सवलती दिल्या. देणारा कोण, फसवणारा कोण याचा विचार मराठा समाजाने करावा.
मुख्यमंत्र्यांच्या वक्तव्यावर मनोज जरांगे यांचे प्रत्युत्तर
दीड लाख पोरांवर केसेस
मनोज जरांगे म्हणाले, मराठा आरक्षण विषयावर आता त्यांनी बोलून फायदा नाही. किती फायदा झाला आणि किती नाही हे मराठा समजालाही कळतेय. आमच्या दीड लाख पोरांवर केसेस केल्या, फडणवीस यांनी चांगला फायदा केला. केसेस जास्त केल्या हा फायदाच आहे. आमच्या हजारो पोरांवर केसेस केल्या त्यांना नोकऱ्यात जाता येईना. देवेंद्र फडणवीस यांनी मराठ्यांवर उपकार केले अशी उपरोधिक टीकाही त्यांनी केली.
आमच्यावर केस केली हा आमचा फायदा आहे काय़?
मनोज जरांगे म्हणाले, केस केली ही आमचा फायदाच आहे का, आमच्या डोक्यात गोळ्या घातल्या हा आमचा फायदाच आहे का? सग्या सोयऱ्यांची अमलबजावणी झाली नाही हा आमचा फायदा आहे का? देवेंद्र फडणवीसांनी हा फायदा होऊ दिला नाही असा आरोपही मनोज जरांगे यांनी यावेळा माध्यमांशी बोलताना केला.
उमेदवार पाडायचे का..? 20 ऑक्टोबरला बैठक
रविवारी 20 ऑक्टोबरला मराठा आरक्षणकर्ते मनोज जरांगे बैठक घेणार आहेत. त्यात उमेदवार पाडायचे का हे ठरवणार आहेत यासंदर्भात त्यांनी वक्तव्य मनोज जरांगे यांनी करत बैठकीसंदर्भात माहिती दिली आहे.












Click it and Unblock the Notifications