महायुतीने तरुणांना दाखवला आशेचा किरण, 25 लाख रोजगार तयार करणार
Maharashtra Assembly Election 2024 : कोल्हापूरातून प्रचाराचा शुभारंभ करताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी महायुतीचा जाहिरनामा प्रसिद्ध केला. या जाहीरनाम्यात त्यांनी तरुणांसाठी महत्वाची घोषणा केली. त्या घोषणेनुसार युवा बेरोजगारी दूर करण्यासाठी 25 लाख नोकऱ्या निर्माण करण्याचे आश्वासन त्यांनी दिले.
शिवाय 10 लाख विद्यार्थ्यांना कौशल्य प्रशिक्षणासाठी मासिक 10,000 रुपये मानधन दिले जाईल, असे आश्वासन दिले. एकीकडे सरकारी नोकरभरतीत पारदर्शकता आणण्यासाठी सरकार प्रयत्नशिल असतानाच आता नवे रोजगार देण्यासाठीही सरकार प्रयत्न करत असल्याचे सुखद चित्र महायुतीच्य जाहिरनाम्यातून दिसले.

राज्यातील दहा लाख तरुणांना विद्यावेतन
राज्यातील दहा लाख तरुणांना दरवर्षी विद्यावेतनासह कामावरच प्रशिक्षण देण्याची घोषणा महायुती सरकारने गेल्या अर्थसंकल्पात मांडली होती. ती यापुढेही अशीच सुरु राहिल,असे महायुतीने त्यांच्या घोषणापत्रात पुन्हा स्पष्ट केले.या योजनेसाठी 10 हजार कोटींचा खर्च सरकारने यापूर्वीच राखून ठेवला आहे.याशिवाय मानवी विकास उपयोजित ज्ञान व कौशल्य विकास प्रकल्पातून राज्यातील 500 औद्योगिक प्रशिक्षण संस्थांची दर्जा वाढ करण्याचा निर्णयही सरकारने घेतला आहे. त्यासाठी जागतीक बँकेकडून 2 हजार 307 कोटींचे अर्थसहाय्य घेण्याचाही सरकारचा विचार आहे.
युवकांसाठी सरकारच्या विविध योजना
शासनाच्या योजनांची माहिती जनतेपर्यंत पोहोचविण्यासाठी दरवर्षी 50 हजार युवकांना सरकारकडून प्रशिक्षण देण्याचा कार्यक्रम यापूर्वीच सुरु करण्यात आला आहे.पंडित दीनदयाळ उपाध्याय रोजगार मेळावा व नमो रोजगार मेळाव्यात यावर्षी सुमारे 95 हजार 478 युवकांना रोजगार देण्यात आला.याशिवाय स्वामी विवेकानंद आंतरराष्ट्रीय कौशल्य विकास प्रबोधिनीत ग्रामीण भागातील 18 हजार 980 विद्यार्थ्यांना कौशल्य प्रशिक्षण देण्यात आले.टीआरटीआय,बार्टी,सारथी,महाज्योती,अमृत आदी संस्थांतर्फे 2 लाख 51 हजार 393 विद्यार्थअयांना रोजगार देऊन त्यापैकी 52 हजार 405 विद्यार्थ्यांना नोकरीच्या संधीही देण्यात आल्या आहेत.
राज्यातील 25 लाख रोजगार निर्मिती
महायुती सरकारने सत्तेत आल्यापासून महाराष्ट्राचं नवं व्हिजन आमलात आणलं आहे. औद्योगिकरणावर भर देतानाच प्रशिक्षित कामगार तयार करण्यासाठी सरकारने विविध आभ्यासक्रमांवरही जोर दिला आहे. किमान कौशल्यसारखे कार्यक्रम राबवत सरकारने औद्योगिक क्षेत्रातील मनुष्यबळही तयार केले आहे. येत्या पाच वर्षांत महाराष्ट्रात 25 लाख रोजगार निर्मितीचे सरकारे उद्दीष्ट आहे. त्यातून किमान 25 लाख तरुणांना नोकऱ्या मिळणार आहेत. सरकारचा जाहीरनामा हा तरुणांच्या स्वप्नांना उभारी देणारा ठरणार आहे.
केंद्र सरकारनेही दिला रोजगारावर भर
जुलैमध्ये केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सितारामन यांनी अर्थसंकल्प सादर केला. या अर्थसंकल्पातही युवकांचे कौशल्य व रोजगारावर भर देण्यात आला होता. देशातील दोन तृतीआंश लोकसंख्या ही तरुण आहे. त्याच लोकसंख्येला ध्यानात ठेवत यंदा भाजपने 4.1 कोटी रोजगार तयार करण्याचे उद्दीष्ट ठेवले आहे. त्यासाठी केंद्राने दोन लाख कोटींची तरतूदही केली आहे. शिक्षण, रोजगार व कौशल्यासाठीही 1.48 लाख कोटींची तरतूद करण्यात आली आहे. राज्यात पुन्हा महायुतीचे सरकार आले तर केंद्राच्या याच योजनांचा समन्वय साधून 25 लाख रोजगार सहज पूर्ण करता येणार आहेत.












Click it and Unblock the Notifications