मराठा आरक्षण आंदोलनाचे केंद्र राहिलेल्या जालना जिल्ह्यात हवा कुणाची, वाचा सविस्तर!
Maharashtra Assembly Election 2024 : मागील दीड वर्षांपासून संपूर्ण महाराष्ट्राचे जालन्याकडे कायम लक्ष राहिले. मनोज जरांगे पाटील यांनी जिल्ह्यातील मराठा आरक्षणासाठी अंतरवाली सराटी येथे आंदोलन केले. त्यामुळे लोकसभा निवडणुकीत महायुतीला फटका बसला. विशेष म्हणजे भाजपचे ज्येष्ठ नेते रावसाहेब दानवे यांना जालना मतदारसंघात पराभव स्वीकारावा लागला. आता पक्षाने दानवे यांच्याकडे प्रचार समन्वय समितीची जबाबदारी दिली आहे. त्यामुळे आता दानवे यांच्यावर जालन्यासह महाराष्ट्राचीही जबाबदारी आहे. दुसरीकडे महाविकास आघाडीतील महत्त्वाचे नेते राजेश टोपे यांचा हा गृह जिल्हा आहे. त्यांच्यासाठीसुद्धा ही अस्तित्वाची लढाई आहे. त्यामुळे जालन्यात सद्यस्थिती काय आहे, हवा कुणाची याचा हा घेतलेला आढावा...
महाविकास आघाडीत जागा वाटपाची कसरत
मागील पाच वर्षांत राज्यातील राजकारण मोठा बदल झाला. शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस या दोन प्रमुख पक्षांमध्ये फूट पडून दोन आणखी पक्षांची राज्याच्या राजकारणात भर पडली. त्याचा परिणाम जालन्याच्या राजकारणातही झाला आहे. जालना जिल्ह्यात पाच विधानसभा मतदारसंघ आहेत. यामध्ये बदनापूर, भोकरदन आणि परतूर या तीन मतदारसंघांमध्ये भाजपचे आमदार आहेत, तर जालना मतदारसंघात काँग्रेसचा आणि घनसावंगीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचा आमदार आहे. महाविकास आघाडीत काँग्रेस, शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष या तीन प्रमुख पक्षांमध्ये जागा वाटपावरून ताण निर्माण झाला आहे. शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसकडून बदनापूर, भोकरदन, परतूर आणि घनसावंगी या जागांची मागणी आहे. दुसरीकडे शिवसेना (उबाठा) जालना, बदनापूर आणि घनसावंगी या जागांवर दावा करत आहे, तर काँग्रेसने जालना, परतूर आणि भोकरदन या जागा स्वत:साठी मागितल्या आहेत. त्यामुळे या तीन पक्षांमधील अंतर्गत संघर्ष मोठा मुद्दा ठरण्याची शक्यता आहे.

महायुतीसमोरही मोठा पेच
महायुतीमध्येही वेगळी परिस्थिती नाही. शिवसेना (शिंदे गट), भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) या घटक पक्षांमध्ये देखील जागा वाटपावरून वाद निर्माण झाला आहे. भाजपने बदनापूर, भोकरदन, परतूर, जालना आणि घनसावंगी या पाच मतदारसंघात तयारी सुरू केली आहे, तर शिवसेनेने (शिंदे गट) जालना, घनसावंगी आणि बदनापूरसाठी दावा केला आहे. राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटानेही जालना आणि घनसावंगी मतदारसंघांवर दावा करीत तयारी सुरू केली आहे.
मनोज जरांगे यांच्या भूमिकेकडे लक्ष
मराठा आरक्षणासाठी लढा देणारे मनोज जरांगे पाटील हे निवडणुकीच्या काळात एक महत्त्वाचा घटक बनले आहेत. ते निवडणुकीत कोणती भूमिका घेणार, हे सर्व पक्षांसाठी महत्त्वाचे ठरणार आहे. जरांगे यांच्या राजकीय भूमिकेवर जालना जिल्ह्यातील पाच विधानसभा मतदारसंघांतील निवडणूक परिणाम होण्याची शक्यता आहे. जरांगे भाजपच्या विरोधात उमेदवार उभे करतील का, किंवा ते स्वतःच निवडणुकीच्या रिंगणात उतरणार का, यावर सर्वांचे लक्ष केंद्रित आहे.
पक्षश्रेष्ठींना पेच
महायुती आणि महाविकास आघाडी या दोन्ही आघाड्यांमध्ये अंतर्गत कलहामुळे बंडाळी होण्याची शक्यता नाकारता येत नाही. जागा वाटपाच्या तिढ्यामुळे स्थानिक नेते आपल्या शक्तिप्रदर्शनात उतरले आहेत, ज्याचा प्रभाव उमेदवारी जाहीर होण्यावर होऊ शकतो.जालना जिल्ह्यातील विधानसभा निवडणूक अत्यंत तणावपूर्ण आणि महत्त्वपूर्ण ठरणार आहे. प्रत्येक पक्ष आपापली ताकद सिद्ध करण्याचा प्रयत्न करत आहे. मात्र, महाविकास आघाडी आणि महायुतीमध्ये अंतर्गत तणाव असतानाच मनोज जरांगे यांचा प्रभाव निवडणुकीच्या निकालांवर कसा पडतो, हे पाहणे महत्त्वाचे ठरेल.
अशी आहे महाविकास आघाडीत चुरस
महाविकास आघाडीमध्ये जालना विधासभेतून काँग्रेसकडून आमदार कैलास गोरंट्याल, भोकरदनमधून काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष राजाभाऊ देशमुख, परतूरमधून माजी आमदार सुरेशकुमार जेथलिया, कल्याण बोराडे, अविनाश चव्हाण यांनी तयारी सुरू केली आहे. ठाकरेंच्या शिवसेनेकडून जालना विधानसभेतून जिल्हाप्रमुख भास्कर अंबेकर, बदनापूरमधून माजी आमदार संतोष सांबरे, परतूरमधून ए. जे. बोराडे तयारी करीत आहेत. तर, घनसावंगी विधानसभेचे गत निवडणुकीचे उबाठा शिवसेनेचे उमेदवार हिकमत उढाणही तयारीत आहेत. मात्र, येथे शरदचंद्र पवार राष्ट्रवादीचे काँग्रेसचे आमदार राजेश टोपे, भोकरदनमधून माजी आमदार चंद्रकांत दानवे, जाफराबादच्या नगराध्यक्षा सुरेखा लहाने, बदनापूरमधून बबलू चौधरी आणि परतूर विधानसभेतून कपिल आकात यांची तयारी सुरू आहे.
महायुतीमधील चुरस
महायुतीमध्ये भाजपकडून भोकरदनमधून आमदार संतोष दानवे, बदनापूरमधून आमदार नारायण कुचे, परतूरमधून आमदार बबनराव लोणीकर, घनसावंगीमधून सतीश घाडगे यांनी तयारी सुरू केली आहे. याशिवाय जालना विधानसभेसाठी भाजपचे पदाधिकारी आग्रही आहेत. तर, मुख्यमंत्र्यांच्या शिवसेनेकडून जालना विधासनभेतून माजी राज्यमंत्री अर्जुन खोतकर, घनसावंगीमधून पंडित भुतेकर, परतूरमधून मोहन अग्रवाल यांनी तयारी सुरू केली आहे. तर, अजित पवार राष्ट्रवादी काँग्रेसकडून जालना विधासनभेसाठी माजी आमदार अरविंद चव्हाण, घनसावंगीमधून रवींद्र तौर यांनीही तयारी सुरू केली आहे. शिवाय माजी विभागीय आयुक्त मधुकर अर्दड यांनी शिवसेनेत प्रवेश केला नाही. मात्र, तयारी सुरू केली आहे. त्यामुळे महायुतीमध्ये जागा वाटपावरून तिढा निर्माण होणार आहे.
-
Eid mubarak 2026 wishes marathi : आपल्या जोडीदाराला पाठवा 'हे' रोमँटिक ईद शुभेच्छा संदेश आणि शायरी! -
KVS Admission पालकांनो, केंद्रीय विद्यालयांचा प्रवेश अर्ज भरण्यापूर्वी 'ही' कागदपत्रे ठेवा तयार ठेवा -
जगातील आनंदी देशांची यादी जाहीर! भारत कितव्या स्थानावर? वाचा भारत की पाकीस्तान कोण जास्त सुखी? -
आजचे राशीभविष्य: मेष ते मीन, कोणाला मिळणार धनलाभ आणि कोणाला राहावे लागेल सावध? -
महिला आयोगानंतर आता प्रदेशाध्यक्षपदही धोक्यात? रुपाली चाकणकरांवर मोठी कारवाई होणार? -
जपानचे PM अमेरिकेशी मैत्री वाढवासाठी आले अन् ट्रम्प यांनी खोचक उत्तर देऊन जुन्या जखमांवर मीठ चोळले! -
सुनेत्रा पवारांनी चाकणकरांना राजीनामा देण्यास भाग पाडलेचं; सुनेत्रा पवारांची दमदार भूमिका -
सोनं झालं स्वस्त! युद्धाच्या काळातही दरात 'एवढ्या' हजारांची ऐतिहासिक घसरण; खरेदी करावं की थांबावं? -
Dhurandhar 2 : धुरंधर-2 चा बॉक्स ऑफिस धमाका! दुसऱ्याच दिवशी 'एवढा' गल्ला, मोडला जवान, ॲनिमलचा विक्रम -
तटकरेंचा हात डोक्यावर होता म्हणून चाकणकरांना अहंकार, आता थेट मकोका लावण्याची मागणी






Click it and Unblock the Notifications