महाविकास आघाडीचं ठरलं!कॉंग्रेस,ठाकरे गट तर शरद पवार गटाला मिळणार इतक्या जागा!
महाराष्ट्र विधानसभेच्या नोव्हेंबर महिन्यात होणाऱ्या निवडणुकीचं वातावरण चांगलंच तापलेलं आहे. सर्वच पक्षांनी कामाला सुरुवात केलीय. जागा वाटपाची चर्चा सुरू आहे. दरम्यान, महाविकास आघाडीचे जागावाटप झाले असून, बंडखोरी टाळण्यासाठी याबाबत अजून अधिकृत घोषणा केली जात नसल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. यात कुणाला किती जागा मिळणार हे देखील ठरलेलं आहे. चला तर जाणून घेऊया, याविषयी सविस्तर.
महाविकास आघाडीमध्ये सध्या सर्वांत जास्त चर्चा आहे ती म्हणजे जागावाटपाची. काँग्रेस, उद्धव ठाकरे यांची शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष या तिघांमध्ये कुणाला किती जागा मिळतील, हे सध्या ठरवलं जात आहे. हाती आलेल्या माहितीनुसार, काँग्रेस सर्वाधिक 105 जागांवर, उद्धव ठाकरे गट 95 जागांवर, आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष 85 जागांवर निवडणूक लढवणार असल्याचं दिसतंय.

विदर्भातील तिढा आणि मुंबईतील चर्चा
आता विदर्भात काँग्रेसला ४० जागा मिळणार असल्याची माहिती आहे. पण अजूनही विदर्भातील काही जागांवर तिढा सुटलेला नाही. सलग तीन दिवस महत्त्वाच्या बैठका घेतल्या जाणार असून या जागांचा तिढा लवकरच सोडवला जाईल. त्यानंतर मुंबईतील जागांवर चर्चा होईल. मुंबईमध्ये विशेषत: शिवसेना उद्धव ठाकरे गटाला काही प्रमुख जागा मिळण्याची शक्यता आहे.
मुख्यमंत्रीपदाचा मुद्दा
एक मोठा मुद्दा म्हणजे मुख्यमंत्रीपदाचा! माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी निवडणुकीपूर्वीच मुख्यमंत्रीपदाचा उमेदवार घोषित करावा, अशी मागणी केली होती. मात्र, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसने ही मागणी फेटाळली. त्यामुळे आता निवडणुकीनंतर, ज्या पक्षाला सर्वाधिक जागा मिळतील, त्या पक्षाचा मुख्यमंत्रीपदावर दावा असेल. त्यामुळे या जागावाटपाला खूप महत्त्व प्राप्त झालं आहे.
निवडणुकीची रणनीती आणि आघाडीचे आव्हान
महाविकास आघाडीने या निवडणुकीत काँग्रेसच्या नेतृत्वाखाली जागांवर लक्ष केंद्रित केलंय. त्यांनी लोकसभा निवडणुकीत मिळवलेलं यश विधानसभेतही कायम ठेवण्याचा प्रयत्न सुरू केलाय. मात्र, यावेळी विदर्भ, मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्रातील जागांवर तगडी लढत होणार आहे. काँग्रेसला अधिकाधिक जागा मिळाल्या तरी शिवसेना उद्धव गट आणि राष्ट्रवादी काँग्रेस आपले दावे जोरात मांडणार आहेत.
महायुतीचा सामना आणि मतदारांच्या अपेक्षा
तर दुसरीकडे, महायुतीमध्ये भाजप, शिवसेना (शिंदे गट), आणि राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) यांच्यात जोरदार रणनीती आखली जात आहे. महाविकास आघाडीला सत्तेत यायचं असेल, तर त्यांना महायुतीशी तगडी लढत द्यावी लागेल. तसेच मतदारांच्या अपेक्षा लक्षात घेऊन पक्षांनी विकासकामं, समाजातील समस्या, आणि आगामी आव्हानं यांचा विचार करावा लागणार आहे.












Click it and Unblock the Notifications