Get Updates
Get notified of breaking news, exclusive insights, and must-see stories!

कर्जमाफी, सन्मान योजनेचे 15 हजार, एमएसपीवरही अनुदान, महायुतीचा मास्ट्ररस्ट्रोक

Maharashtra Assembly Election 2024 : महायुती सरकार सत्तेत आल्यापासून शेतकऱ्यांसाठी विविध योजना राबविण्यात आल्या. आता कोल्हापूरात झालेल्या एका कार्यक्रमात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शेतकऱ्यांसाठी नव्या योजनांची घोषणा केली. त्यात शेतकरी सन्मान योजनेचे मानधन वर्षाला 12 हजारांऐवजी आता 15 हजार रुपये करण्यात येईल, असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.

शिवाय शेतीपिकाच्या एमएसपीवर 20 टक्के अनुदान देण्याचे वचनही दिले. शेतकऱ्यांसाठीच्या या दोन्ही घोषणा आगामी विधानसभा निवडणुकीसाठी महायुतीच्या मास्टरस्ट्रोक योजना ठरणार असल्याची चर्चा होत आहे.

mahayuti manifesto

12 हजारांवरुन आता थेट 15 हजार मिळणार

शेतकऱ्यांना केंद्र व राज्य सरकारकडून शेतकरी सन्मान योजनेअंतर्गत वर्षाला प्रत्येकी सहा असे 12 हजार रुपये दिले जातात. शेतकऱ्यांचा बँक खात्यात ते थेट जमा होतात. मात्र आता हेच अनुदान 12 वरुन 15 हजार रुपये करण्यात येणार आहे. निसर्गामुळे शेतीचे चुकलेले गणित त्यामुळे बरोबर येण्यास मदत होणार आहे. यापूर्वी शेतकऱ्याला एक रुपया मंजूर झाला तर त्याच्यापर्यंत फक्त 15 पैसेच पोहोचत होते आता मात्र सरकारने थेट शेतकऱ्यांच्या खात्यावर पैसे जमा करण्याचे धोरण आखल्याने या 15 हजार रुपयांत शेतकऱ्यांना पेरणी, कोळपणी, बियाणे खरेदी, खते खरेदी यासारख्या शेतीच्या कामांना आर्थिक हातभार लागणार आहे.

शेतकऱ्यांना विक्रमी मदत

अवकाळी, गारपीट अशा संकटात सापडलेल्या शेतकऱ्याला महायुती सरकारने गेल्या दोन वर्षांत सुमारे 15 हजार 212 कोटींची मदत केली. शेतकऱ्यांच्या समृद्धीसाठी आवश्यक असलेल्या 30 हजार कोटींच्या खर्चास चालना दिली. महाविकास आघाडी सरकारच्या काळात बंद पडलेले सिंचन प्रकल्प महायुती सरकारने परत सुरु केले. सुधारित 121 प्रकल्पांना मान्यता दिली. सिंचन योजनेवर सरकारने सुमारे 99 हजार 103 कोटी रुपये खर्च करुन 15 लाख हेक्टर जमिन सिंचनाखाली आणली.

सिंचनाचीही केली महायुतीने सोय

वशिष्ठ नदीतून समुद्राला वाहून जाणारे 65 टीएमसी पाणी सरकारने शेतीसाठी वळवले. कोकणातील पाण्याचा बँकलाँग भरुन काढला. छोटे-मोठे बंधारे, मध्यम प्रकल्पांना गती दिली. मराठवाडा वाँटर ग्रीड योजना सुरु करुन मराठवाड्याला पाणी देण्याचे नियोजन केले. शिवाय देशात कोणतेही राज्य देत नाही ती एक रुपयांत पिक विमा योजना महायुती सरकारने सुरु केली.

शेतकऱ्यांना 16 हजार कोटींचा बोनस

सरकारने हेक्टरी नुकसान भरपाई देत सुमारे 16 हजार कोटींचा बोनस लाभार्थी शेतकऱ्याच्या खात्यावर जमा केला आहे. महात्मा फुले कर्जमुक्ती योजनेतून 5हजार 190 कोटींचे वितरण करण्यात आले आहे. दूध उत्पादक शेतकऱ्यांना पाच रुपये अनुदान देण्याचा निर्णय झालेला आहे. शिवाय गारपीट, वादळ यांचे तत्काळ पंचनामे करुन तत्काळ नुकसान भरपाईही देण्यात येत आहे.

एमएसपीवर 20 टक्के अनुदान

शेतकऱ्यांना त्यांच्या पिकांची आधारभूत किंमत अगोदरच कळाल्यामुळे त्याला शेतीचे गणित जुळवता येते. कोणती पिके घ्यायची व कोणती टाळायची याची माहिती मिळते. आता सरकारने एमएसपीवर 20 टक्के अनुदान देण्याची घोषणा केल्यामुळे शेतकऱ्यांना त्याचा चांगाला लाभ होणार आहे. अडचणीत आलेला शेती व्यवसायाला त्यामुळे नवसंजिवनी मिळणार आहे. राज्यातील लाखो शेतकऱ्यांना याचा फायदा होणार असल्याने शेतकऱ्यांनी या घोषणेचे स्वागत केले आहे.

Notifications
Settings
Clear Notifications
Notifications
Use the toggle to switch notifications
  • Block for 8 hours
  • Block for 12 hours
  • Block for 24 hours
  • Don't block
Gender
Select your Gender
  • Male
  • Female
  • Others
Age
Select your Age Range
  • Under 18
  • 18 to 25
  • 26 to 35
  • 36 to 45
  • 45 to 55
  • 55+