Get Updates
Get notified of breaking news, exclusive insights, and must-see stories!

माधुरी मिसाळांनी पुण्याचा ४६ वर्षांचा वनवास दूर केला; कसा..? तर वाचा संपूर्ण कहाणी

पर्वती मतदारसंघातून सलग चौथ्यांदा निवडून आलेल्या माधुरी मिसाळांना यावेळी राज्यमंत्रीपदाची संधी मिळाली. २००९ पासून पर्वती मतदारसंघावर त्यांची घट्ट पकड राहिलेली दिसली आहे. यावेळी चौथ्यांदा त्यांना तिकीट मिळते की नाही, ही शंका होती. मात्र त्यांना तिकीटही मिळाले. त्या निवडूनही आल्या आणि आता थेट मंत्रीही झाल्या. मिसाळांनी पुण्याचा ४६ वर्षांचा वनवास दूर केला.

Madhuri Misal

पुण्याचा ४६ वर्षांचा वनवास

पुण्यातून काँग्रेसच्या लीली मर्चंट या पहिल्या महिला आमदार होत्या. त्यानंतर १९७८ साली पुलोद सरकार आले. त्यावेळी पुण्याच्या शांती नाईक यांना पहिल्यांदा मंत्रीपद मिळाले होते. मात्र तेव्हापासून आत्तापर्यंत पुण्यातील कोणत्याच महिला आमदाराला मंत्रीपदापर्यंत पोहोचता आले नाही. आता थेट ४६ वर्षानंतर माधुरी मिसाळ यांनी महिला मंत्रीपदाचा वनवास दूर केला. पर्वतीमधून चौथ्यांदा निवडून येत त्यांनी मंत्रीपदाला गवसणी घातली.

पुण्यातील पहिल्या महिला मंत्री

माधुरी मिसाळ या पुणे शहरातील पहिल्या महिला मंत्री ठरल्या आहेत. पुणे शहरातून आत्तापर्यंत अनेक महिला मंत्री झाल्या. २०१४ साली विक्रमी तीन महिला आमदार होत्या. मात्र तेव्हाही कोणत्याही महिलेला मंत्रीमंडळात स्थान मिळाले नव्हते. १९७८ साली शांती नाईक वगळता कोणत्याही महिलेला ही संधी मिळाली नव्हती. आता जवळपास चार तपानंतर माधुरी मिसाळ यांना ही संधी मिळाली. राज्यात आत्तापर्यंत ९ महिला कॅबिनेट मंत्री तर १२ महिला राज्यमंत्री झाल्या.

जिल्ह्याला प्रथमच पाच मंत्री

केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ, उपमुख्यमंत्री अजित पवार, कॅबिनेटमंत्री चंद्रकांत पाटील व दत्तात्रेय भरणे आणि राज्यमंत्री माधुरी मिसाळ यांच्या रूपाने पुणे जिल्ह्याला प्रथमच पाच मंत्रिपदे मिळाली आहेत. पुणे जिल्हा हा केंद्रासह राज्याच्या राजकारणात महत्त्वाचा जिल्हा ठरला आहे. महायुतीने मंत्रिमंडळात पुणे शहर व जिल्ह्याला झुकते माप देऊन आगामी महापालिका निवडणुकीची तयारी सुरू केल्याची चर्चा आहे.

Notifications
Settings
Clear Notifications
Notifications
Use the toggle to switch notifications
  • Block for 8 hours
  • Block for 12 hours
  • Block for 24 hours
  • Don't block
Gender
Select your Gender
  • Male
  • Female
  • Others
Age
Select your Age Range
  • Under 18
  • 18 to 25
  • 26 to 35
  • 36 to 45
  • 45 to 55
  • 55+