'या' नागरिकांना नगरपालिका, मनपा निवडणुकीत मतदान करता येणार नाही..! कुणाला मतदान करता येणार? वाचा
Local body elections : राज्यात स्थानिक निवडणुका घेण्यास सर्वोच्च न्यायालयाने हिरवा कंदील दाखवल्यानंतर आता या निवडणुकीचे पडघम वाजू लागले आहेत, एकीकडे मतदार याद्या अद्ययावत करण्याचे काम पुर्ण झाले असतानाच दुसरीकडे जिल्हाधिकाऱ्यांची बैठक राज्य निवडणूक आयुक्तांनी घेतली. त्यामुळे स्थानिक निवडणुकीचे राज्यात वारे वाहत असल्याचे स्पष्ट आहे.
स्थानिक निवडणुकीच्या धर्तीवर आता राज्यातील राजकीय पक्षही जोरदार तयारीला लागले आहेत. एकीकडे उद्धव
ठाकरेंची शिवसेना आणि दुसरीकडे मनसे यांच्यात युतीचे होण्याचे संकेत मिळत आहेत. तर काल १० जुलैलाच राज्यातील विधीमंडळात अधिवेशन सुरु असतानाही उपमुख्यमंत्री आणि शिवसेनेचे प्रमुख नेते एकनाथ शिंदे हे दिल्ली दरबारी गेले होते. अमित शहांची त्यांनी भेट घेतली असून आगामी रणनितीवर चर्चा झाली असे मिडिया रिपोर्ट् सांगतात.

निवडणूक आयोगातर्फे मतदार याद्यांची पडताळणी केली जात आहे. त्या धर्तीवर काल झालेल्या बैठकीत राज्य निवडणूक आयोगाने सूचनाही दिल्या आहेत.
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या आगामी निवडणुकांसाठी एक जुलै 2025 पर्यंत विधानसभा मतदार यादीत नाव नोंदवलेल्या मतदारांना मतदान करता येईल जिल्हा परिषदा पंचायत समिती नगरपरिषदा आणि नगरपंचायतींच्या निवडणुकांच्या प्राथमिक तयारी संदर्भात काल जिल्हाधिकाऱ्यांची बैठक घेण्यात आली त्यावेळी राज्य निवडणूक आयुक्त दिनेश वाघमारे यांनी ही माहिती दिली.
मग कुणाला मिळणार मतदानाची संधी?
स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीसाठी १ जुलै २०२५ पर्यंतची मतदार यादी ग्राह्य धरली जाणार आहे. त्यामुळे आता ज्या नागरिकाने आपली मतदार यादीत आपली नाव नोंदणी १ जुलैपर्यंत केली आहे अशा मतदार यादीत नाव असलेल्यांनाच मतदान करता येणार आहे.
स्थानिक स्वराज्य संस्था म्हणजे काय?
नागरिकांच्या जवळची त्यांच्या दैनंदिन गरजा, त्यांच्या समस्या आणि प्रश्नांची सोडवणूक करणारी शासकीय व्यवस्था म्हणजे स्थानिक स्वराज्य संस्था आहे. स्थानिक स्वराज्य संस्थेत ग्रामस्तर ते तालुका आणि शहराचा समावेश होतो. गाव तालुका आणि शहरानुसार त्या त्या ठिकाणी संबंधित स्थानिक स्वराज्य संस्थेची घटक संस्था असतात. ग्रामपंचायत, पंचायत समिती, जिल्हा परिषद, नगरपालिका, महानगर पालिका, कटक मंडळे, नगरपंचायती, विशेष क्षेत्र विकास प्राधिकरणांचा स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये समावेश होतो.
स्थानिक स्वराज्य संस्थेचा उद्देश काय आहे?
भारतातील लोकशाही प्रणाली भक्कम करण्यासाठी आणि शासन दिल्लीपासून गल्लीपर्यंत समान पातळीवर सेवा देण्यासाठी तसेच खंडप्राय देशातील प्रत्येक गाव ते शह सुदृढ आणि सक्षम करण्यासाठी सरकारने लोककल्याणकारी शासन व्यवस्थेचा स्वीकार केला आहे. नागरिकांच्या जवळची त्यांच्या दैनंदिन गरजा, त्यांच्या समस्या आणि प्रश्नांची सोडवणूक करणारी शासकीय व्यवस्था म्हणजे स्थानिक स्वराज्य संस्था आहे.
हेही वाचा : स्थानिक स्वराज्य संस्था म्हणजे काय? 4 मुद्द्यात जाणून घ्या इतिहास, स्थापना, उद्देश अन् कोण होते जनक?
-
सुनेत्रा पवारांनी चाकणकरांना राजीनामा देण्यास भाग पाडलेचं; सुनेत्रा पवारांची दमदार भूमिका -
महिला आयोगानंतर आता प्रदेशाध्यक्षपदही धोक्यात? रुपाली चाकणकरांवर मोठी कारवाई होणार? -
तटकरेंचा हात डोक्यावर होता म्हणून चाकणकरांना अहंकार, आता थेट मकोका लावण्याची मागणी -
SRH च्या गोटात राडा! ईशानची विकेट घेताच अन्सारीचा संयम सुटला; भर मैदानात नेमकं काय घडलं? -
दिलासा की धक्का? गॅस सिलिंडरबाबत सरकारने घेतला असा निर्णय, जो कुणीही अपेक्षित धरला नव्हता!







Click it and Unblock the Notifications