Get Updates
Get notified of breaking news, exclusive insights, and must-see stories!

विधानपरिषद निवडणूक : महायुतीचे सर्व 9 तर महाविकास आघाडीचे 2 उमेदवार विजयी

मुंबई : महाराष्ट्रात विधानपरिषदेच्या 11 जागांसाठी मतदान प्रक्रिया पुर्ण झाली आहे. सर्वच्या सर्व 274 आमदारांनी या निवडणुकीत मतदानाचा हक्क बजावला. निकाल हाती आले असून भाजपला 5 जागी तर शिंदे गटाला 2 आणि अजित पवारांच्या राष्ट्रवादीला 2 तर महाविकास आघाडीतील उद्धव ठाकरे गटाचा 1 तर काँग्रेसचा 1 उमेदवार विजयी झाला आहे.

काँग्रेसची 8 मतं फुटल्याचे चित्र दिसून आले आहे.

Legislative Council Election

एकनाथ शिंदेंचे 2 उमेदवार विजयी

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वातील शिवसेनेचे भावना गवळी व कृपाल तुमाणे हे दोन्ही उमेदवार विजयी झालेत. भावना गवळी यांना 24, तर तुमाणे यांना 25 अतिरिक्त मते मिळाली. विधानपरिषदेच्या निवडणुकीत काँग्रेसच्या प्रज्ञा सातव यांचा विजय झाला. त्यांना विजयासाठी निश्चित करण्यात आलेल्या 23 मतांचा कोटा पूर्ण करण्यात यश मिळाले.

अजित पवारांचे दोन्ही उमेदवार विजयी

उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नेतृत्वातील राष्ट्रवादी काँग्रेसचे राजेश विटेकर व शिवाजीराव गर्जे हे दोन्ही उमेदवार विजयी झालेत. विशेषतः गर्जे हे 1 अतिरिक्त मत घेऊन विजयी झालेत. त्यांना 24 मते मिळाली आहेत.

पंकजा मुंडे, परिणय फुके यांचा विजय

भाजप उमेदवार पंकजा मुंडे व परिणय फुके, सदाभाऊ खोत यांचाही विधानपरिषद निवडणुकीत विजय झाला आहे. पंकजा मुंडे यांना विजयासाठी आवश्यक असणाऱ्या 23 मतांपेक्षा 3 मते जास्त पडली. त्यांना 26 मते मिळालीत. तर परिणय फुके यांनी 26 मतं पडली. तर भाजपचे अमित गोरखे हे विजयी झाले असून त्यांना 26 मते पडली आहेत.

भाजपचे योगेश टिळेकर विजयी

विधानपरिषदेच्या निवडणुकीत भाजपच्या योगेश टिळेकरांचा पहिला विजय झाला आहे. त्यांना विजयासाठी निश्चित करण्यात आलेली 26 मते मिळाली.

काँग्रेसच्या सर्व आमदारांचे मतदान

प्राप्त माहितीनुसार, काँग्रेसच्या सर्व आमदारांचे मतदान पुर्ण झाले आहे. उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेकडे पुरेसे संख्याबळ नसले तरीही त्यांचे उमेदवार मिलिंद नार्वेकर सुरक्षित असल्याचे मानले जात आहे.

परंतु शिंदे गटाच्या नेत्यावर गोळीबार केल्याप्रकरणी तुरुंगात असलेले भाजप आमदार गणपत गायवाड विधानभवनात दाखल झाले आहेत. पण काँग्रेसने आक्षेप घेतल्याने त्यांचे अद्याप मतदान झालेले नाही. यासंदर्भात मुख्य निवडणूक आयुक्तांसोबत बोलणी सुरु आहे.

छोट्या पक्षांवर भवितव्य अवलंबून

काही वेळापूर्वीच अजित पवार गटाचे आमदार एकाच गाडीतून मतदानासाठी विधानभवनात हजर झाले आहेत. दरम्यान, प्रत्येक पक्षाला आपल्या उमेदवासांसाठी मतांजी जुळवाजुळव करावी लागणार असल्याने प्रहार, समाजवादी पार्टी व एमआयएमच्या या पक्षांना महत्त्व प्राप्त झाले आहे. बच्चू कडू, अबू आझमी व ओवैसी यांच्यावर निवडणुकीची बरीच गणिते अवलंबून असणार आहेत.

ओवैसी, सपा, बच्चू कडू किंगमेकर...

विधानभवनात नाट्यपूर्ण घडामोडींना वेग आला आहे. महाराष्ट्रात सपाचे दोन आमदार आहेत. याशिवाय एआयएमआयएमचे दोन आणि बच्चू कडू यांच्या प्रहार जनशक्ती पक्षाचे दोन आमदार आहेत. सपा इंडिया आघाडीत आहे, परंतु पक्षाचे अध्यक्ष आणि महाराष्ट्रातील आमदार अबू असीम आझमी यांनी अद्याप त्यांचे पत्ते उघड केलेले नाही. त्याचप्रमाणे ओवैसी यांनीही अद्याप कोणतीही स्पष्ट घोषणा केलेली नाही. या चार आमदारांवरच बरीच गणिते अवलंबू आहेत. दुसरीकडे प्रहार जनशक्तीचे उमेदवार बच्चू कडू यांनी आपली रणनीती स्पष्ट केली. त्यांनी आपली दोन्ही मते एकनाथ शिंदे गटाला देणार असल्याचे म्हटले आहे. सपा आणि ओवैसीच्या पक्षांचा पाठिंबा मिळला नाही, तर महाविकास आघाडीला त्यांच्या कोट्यातील तीनही जागा जिंकणे त्यांना अवघड होणार आहे. या परिस्थितीत खरा किंगमेकर पक्ष आता सपा आणि ओवैसी ठरत आहे.

संजय राऊतांचं विधान आलं चर्चेत

प्रत्येक पक्षाने आमचे आमदार फुटणार नसल्याचे भाकीत केलंय. त्यात शिवसेना ठाकरे गटाच्या संजय राऊतांचं विधान मतदान सुरु असतानाच चर्चेत आलंय. काँग्रेसची मतं फुटू शकतात तर मग भाजपा, शिंदे गट, अजित पवार गट यांची मतंही फुटू शकतात. ते काय आकाशातून पडले आहेत का? त्यांच्याकडे सत्ता आहे, पैसा आहे, पण लोकमत आमच्या बाजूने आहे. लोकसभेत तेच लोकमत दिसल्यामुळे त्यांचेही आमदार वेगळी भूमिका घेऊ शकतात ना..? काँग्रेसचे आमदार फुटू शकतात या भ्रमात कुणी राहू नये , असं विधान संजय राऊत यांनी केल्याने महायुतीच्या नेत्यांचीही धडधड वाढली आहे.

त्या आमदाराच्या मताला विरोध

भाजपाचे कल्याणमधील आमदार गणपत गायकवाड यांच्या मतदानाला काँग्रेसनं विरोध केला. उल्हासनगरमधील पोलीस स्टेशनमध्ये गोळीबार केल्याप्रकरणी सध्या गणपत गायकवाड तळोजा जेलमध्ये आहेत. त्यांना विधानपरिषद निवडणूक मतदानासाठी विधानभवनात पोलिसांच्या सुरक्षेत आणलं जाणार आहे. मात्र, काँग्रेसनं यासंदर्भात पत्र पाठवून गणपत गायकवाड यांच्या मतदानाला विरोध केला आहे. त्यांना मतदानाचा अधिकार म्हणजे लोकप्रतिनिधी कायद्याचं उल्लंघन असल्याचा दावा काँग्रेसकडून करण्यात आला आहे. एक-एका मताला महत्त्व असल्याने आमदार गायकवाड यांच्या संदर्भात नेमका काय निर्णय होतो, ते पहाणं मनोरंजक ठरणार आहे.

सर्वच पक्षांचे देव पाण्यात...

उद्धव ठाकरे गटाच्या उमेदवारासाठी गेलेली काँग्रेसची मतं वगळून उर्वरीत मतं जरी जयंत पाटलांच्या पाठिशी उभी राहिली, तरीदेखील त्यांना किमान 7 ते 8 मतांची आवश्यकता राहील. अशावेळी सभागृहातील अपक्ष आणि इतर छोट्या पक्षांची भूमिका महत्त्वाची राहील. यामध्ये मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचं 1, एमआयएमची 2, समाजवादी पक्षाची 2 आणि शेतकरी कामगार पक्षाचं 1 अशा 6 मतांचाही समावेश आहे. दुसरीकडे भाजप, अजितदादा गट आणि शिंदेगटाचीही अशीच स्थिती आहे. त्यांनाही आपल्या अपक्ष आमदारांवर अवलंबून रहावे लागत आहे.

More From
Prev
Next
Notifications
Settings
Clear Notifications
Notifications
Use the toggle to switch notifications
  • Block for 8 hours
  • Block for 12 hours
  • Block for 24 hours
  • Don't block
Gender
Select your Gender
  • Male
  • Female
  • Others
Age
Select your Age Range
  • Under 18
  • 18 to 25
  • 26 to 35
  • 36 to 45
  • 45 to 55
  • 55+