धनंजय मुंडेंचा राजीनामा घ्या;संतोष देशमुख हत्या प्रकरणी सर्वपक्षीय नेत्यांनी घेतली राज्यपालांची भेट
बीड जिल्ह्यातील मस्साजोग येथील सरपंच संतोष देशमुख हत्याकांड आणि परभणी येथील पोलिस कोठडीत झालेली युवकाची हत्या या प्रकरणात आज सर्वपक्षीय नेत्यांनी राज्यपालांची भेट घेतली. यावेळी राज्यपालांनी त्यांच्या मागणीचे निवेदन स्वीकारले. या निवेदनात प्रामुख्याने धनंजय मुंडे यांचा मंत्रिपदाचा राजीनामा घ्यावा, संतोष देशमुख हत्या प्रकरणातील सर्व आरोपींना अटक करून कठोर शिक्षा द्यावी, अशी प्रमुख मागणी करण्यात आली.
भेटीप्रसंगी कोणाकोणाची होती उपस्थिती?
या भेटीमध्ये प्रामुख्याने विरोधी पक्षातील नेतेमंडळी होते. भाजपचे सुरेश धस, स्वराज्य संघटनेचे अध्यक्ष संभाजीराजे भोसले, काँग्रेसचे नेते विजय वडेट्टीवार, शिवसेना ठाकरे गटाचे नेते अंबादास दानवे, राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे आमदार जितेंद्र आव्हाड,शिवसंग्रामच्या नेत्या ज्योती मेटे यांची उपस्थिती होती.

संभाजीराजे देशमुख काय म्हणाले?
धनंजय मुंडे यांनी मंत्रीपदाचा राजीनामा द्यावा, अशी मागणी संभाजीराजे छत्रपती यांनी केली आहे. या संदर्भात आपण आज राज्यपालांची भेट घेतली असल्याचे त्यांनी सांगितले. या संदर्भात पंकजा मुंडे यांनी देखील बोलायला हवे. हा एका जातीचा विषय नाही तर हा महाराष्ट्राचा विषय असल्याचे संभाजीराजे यांनी म्हटले आहे.
बीड जिल्ह्यातील मस्साजोग येथील सरपंच संतोष देशमुख यांची हत्या करण्यात आली होती. हा प्रकार खंडणीतून घडला असल्याचा आरोपही करण्यात येत आहे. या प्रकरणाच्या विरोधात राज्यभरातून आंदोलन करण्यात येत आहे. बीड, लातूर, परभणी आणि पुणे येथे मोठे मोर्चे देखील काढण्यात आले. या प्रकरणात मंत्री धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याची मागणी देखील करण्यात येत आहे. याचसाठी आज सर्वपक्षीय नेते राज्यपालांना भेटले आहेत.
याप्रकरणी वाल्मीक कराड याच्यावर केवळ खंडणीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मात्र मुख्यमंत्र्यांनी विधानसभेच्या पटलावर संपूर्ण प्रकरणात कडक कारवाईचा आश्वासन दिले आहे. त्यामुळे वाल्मीक कराड वर देखील कडक कलम लावण्याची मागणी संभाजीराजे यांनी केली आहे. वाल्मीक कराड आणि जेलमध्ये गेलेली माणसे कोणाची? असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला. या सर्वांचा बॉस हे धनंजय मुंडे असल्याचे संभाजीराजे यांनी म्हटले आहे.
VIDEO | Maharashtra: Opposition delegation arrives at Raj Bhawan to meet state Governor C P Radhakrishnan over Beed’s sarpanch Santosh Deshmukh’s murder case.
— Press Trust of India (@PTI_News) January 6, 2025
(Full video available on PTI Videos - https://t.co/n147TvrpG7) pic.twitter.com/H9SLmSBvZQ
वाल्मीक कराड कोणाचा माणूस ? हे मुंडेंनी सांगावे
वाल्मीक कराड कोणाचा माणूस आहे? हे मुंडेंनी सांगावे, असे देखील संभाजीराजे छत्रपती यांनी म्हटले आहे. बीड मधील सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणात सर्व पक्षीय नेत्यांच्या वतीने आता राज्यपालांची भेट घेण्यात आली आहे. या माध्यमातून धनंजय मुंडे यांच्या राजीनामाची मागणी देखील राज्यपालांकडे करण्यात आली आहे.
वाल्मीक कराडवर302 कलम लावावे
वाल्मीक कराडवर जी कलम लावली आहे, त्या कलमाच्या माध्यमातून तो पुन्हा बाहेर येईल. त्यामुळे वाल्मीक करायला देखील 302 कलम लावावे, अशी मागणी संभाजीराजे छत्रपती यांनी केली आहे. या सर्वांचा बॉस हे धनंजय मुंडे आहेत. या संदर्भात निष्पक्षपातीपणे चौकशी व्हावी यासाठी धनंजय मुंडे यांनी राजीनामा द्यायला हवा, असे देखील ते म्हणाले. याआधी देखील अंतुले, आर आर आबा, अशोक चव्हाण, मनोहर जोशी या सर्वांनी राजीनामा दिले आहेत. तसेच क्लीन चीट मिळाल्यानंतर ते नेते पुन्हा प्रमुख पदावर बसले आहेत. असे असताना आताचे सरकार धनंजय मुंडेला का संरक्षण दिले जात आहे? असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला.
या प्रकरणाला जातीचे वळण देण्याचा प्रयत्न
यासंदर्भात राज्यपाल महोदयांनी सर्व विषय समजून घेतले आहे. या प्रकरणी निश्चित हस्तक्षेप करेल असे ग्वाही देखील त्यांनी आम्हाला दिली असल्याचे संभाजीराजे छत्रपती यांनी म्हटले आहे. सर्व पक्ष आणि सर्व जाती धर्मातील नागरिकांनी राज्यपालाची भेट घेऊन या संदर्भात मागणी केली आहे. या प्रकरणाला जातीचे वळण देण्याचा प्रयत्न केला जात असल्याचा आरोप त्यांनी केला. हा वंजारी विरुद्ध मराठा असा विषय नाही. तर माणुसकीच हत्या झाली असल्याचे संभाजीराजे छत्रपती यांनी म्हटले आहे.












Click it and Unblock the Notifications