Get Updates
Get notified of breaking news, exclusive insights, and must-see stories!

जरांगे पाटलांच्या उपोषणावर सदावर्तेंची खमखमीत टीका; म्हणाले, माया आणि प्रसिद्धीसाठी...

मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी आज पुन्हा एकदा आंतरवलीत उपोषण सुरु केले. मराठा समाजाला ओबीसीतूनच आरक्षण हवे, अशी मागणी त्यांनी लावून धरली आहे. जरांगे यांच्या याच उपोषणावर ज्येष्ठ वकील गुणरत्न सदावर्ते यांनी खमखमीत टीका केली. स्वतःची इमेज तयार करण्यासाठी व माया जमविण्यासाठी हे सगळं सुरु आहे, असा टोला त्यांनी लगावला.

Gunaratna Sadavarte

काय म्हणाले सदावर्ते?

जरांगे पाटील यांच्या आंदोलनावर प्रतिक्रिया देताना सदावर्ते म्हणाले की, काही विशिष्ट हेतूने हे सर्व सुरु आहे. जरांगे पाटील हे स्टंटबाज आहेत. त्यांचे आंदोलनही बिनबुडाचे आहे. आरक्षण हे कोणत्याही परिस्थितीत ५० टक्क्यांच्या वर देता येत नाही हे मराठा बांधवांना माहित आहे. तरीही ते आंदोलन करत आहेत. स्वतःची इमेज तयार करणे व माया जमविणे हे दोन उद्देषांसाठी हे सर्व सुरु आहे. ते लोकांची दिशाभूल करत आहेत, असा आरोप सदावर्ते यांनी केला.

जरांगे-धस यांच्यात स्पर्धा

सदावर्ते पुढे म्हणाले की, मनोज जरांगे व सुरेश धस यांच्या मराठा समाजाचा नेता कोण, याबाबत स्पर्धा सुरु आहे. समाजाचा नेता कोण, हे दाखविण्यासाठी आता जरांगे यांनी आंदोलन सुरु केलं आहे. धस आणि जरांगे हे दोघेही पाँलिटिकली मोटिव्हेटेड माणसं आहेत. खरे जातीयवादी कोण, हे जरांगे व धस यांच्या कार्यपद्धतीतून मराठा समाजाला समजलं आहे, असा टोलाही सदावर्ते यांनी मारला.

आंदोलनावर टिका

सदावर्ते यांनी जरांगेंच्या आंदोलनावर प्रतिक्रिया देताना जोरदार टिका केली. जरांगे व धस या दोघांकडून फक्त लोकांची दिशाभूल सुरु आहे. मराठा समाजाचा नेता कोण, या एकाच प्रश्नावर हे सर्व सुरु आहे, असा आरोप त्यांनी केला. हे आंदोलन केविलवाणे आहे, असंही सदावर्ते म्हणाले. गुणरत्न सदावर्ते यांनी मनोज जरांगे पाटील यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला आहे. आता मनोज जरांगे पाटील या टीकेला काय प्रत्युत्तर देणार हे पाहाणं महत्त्वाचं ठरणार आहे.

Notifications
Settings
Clear Notifications
Notifications
Use the toggle to switch notifications
  • Block for 8 hours
  • Block for 12 hours
  • Block for 24 hours
  • Don't block
Gender
Select your Gender
  • Male
  • Female
  • Others
Age
Select your Age Range
  • Under 18
  • 18 to 25
  • 26 to 35
  • 36 to 45
  • 45 to 55
  • 55+