Get Updates
Get notified of breaking news, exclusive insights, and must-see stories!

Latur Crime News सुटकेसमधील महिलेच्या मृतदेहाचे गूढ उकलले! पतीकडून पत्नीचा खून, 'हे' धक्कादायक कारण

Latur Crime News Mystery of body found in suitcase solved : लातूर जिल्ह्यात एका सुटकेसमध्ये एका अज्ञात महिलेचा मृतदेह सापडल्यानंतर आता या खुनाचा उलगडा झाला आहे. वाढवणा पोलिस ठाण्याच्या हद्दीत चाकूर-शेळगाव फाटा मार्गावरील तिरू नदीच्या पुलाखाली २४ ऑगस्ट रोजी एका सुटकेसमध्ये एका अज्ञात महिलेचा मृतदेह कुजलेल्या अवस्थेत आढळला होता.

परिसरातून येणाऱ्या दुर्गंधीमुळे ही घटना उघडकीस आली. आता या 'मिस्ट्री बॅग'चं रहस्य अखेर उलगडलं असून, या हत्येमागे पत्नीच्या चारित्र्यावर संशय घेणारा तिचाच पती आणि त्याचे साथीदार असल्याचं समोर आलं आहे. प्रेम आणि विश्वासाचा खून करून, एका निर्जीव बॅगेत भरलेल्या या क्रूर कथेचा थरारक शेवट पोलिसांनी समोर आणला आहे.

Latur Crime News

लातूर जिल्ह्यातील गुढ मृत्यूने अनेक जण हादरले होते. आता या घटनेचा उलगडा झाला असून पोलिसांचा आणखी तपास सुरु आहे. या घटनेतील संशयितांना पोलिसांनी अटक केली आहे.

गुन्ह्याचा तपास आणि उलगडा

मृतदेह पूर्णपणे कुजलेला असल्याने महिलेची ओळख पटवणे पोलिसांसाठी एक आव्हान होते. मात्र, लातूर पोलिसांनी आणि स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाने केलेल्या सखोल तपासामुळे या गुन्ह्याचा छडा लागला. मृत महिला उत्तर प्रदेशातील कुशीनगर जिल्ह्याची रहिवासी असलेली २३ वर्षीय फरीदा खातून असल्याचे निष्पन्न झाले. तिचा ३४ वर्षीय पती जिया उल हक आणि ती दोघे उदगीर जवळील विलास साखर कारखान्यात कामगार म्हणून काम करत होते.

23 वर्षीय फरीदा खातुन आणि तिचा 34 वर्षीय पती जिया ऊल हक सोबत दोघे पती पत्नी हे दोघे उदगीर जवळील विलास साखर कारखाना परिसरात ते कामगार म्हणून काम करीत होते. उत्तर प्रदेशातील कुशीनगर जिल्ह्यातील हे दोघे आपल्या दोन मुलांसह राहत होते. मात्र पत्नीच्या चारित्र्याच्या पतीला संशय होता.

असा केला खून?

चारित्र्याच्या संशयावरून आरोपी पती जिया उल हक ने आपल्या चार साथीदाराच्या मदतीने फरीदाच्या छातीवर बसून उशी तोंडावर दाबून तिचा खून केला. त्यानंतर फरीदाचा मृतदेह ट्रॉली बॅगेत ठेवून उदगीर तालुक्यातील तिरु नदीच्या पुलाजवळ नेला. यानंतर फरिदाचा मृतदेह असलेली ट्रॉली बॅग नदीत फेकून दिली होती. पत्नी फरीदा हिचे परपुरुषाशी अनैतिक संबंध असल्याचा संशय असल्याने त्यांच्यात नेहमी भांडण होत होते.

सुट्टीच्या दिवशी खून!

मृत फरीदा ही काही दिवसापूर्वीच मुलांसह जीया उल हक याच्याकडे राहण्यास आली होती. साखर कारखान्याने दिलेल्या एका खोलीत ते राहत होते. फरीदा हीच्या चारित्र्यावर संशया वरून पती जिया उल हकने साथीदारासोबत मिळून कट रचला. 15 ऑगस्ट रोजी साखर कारखान्यातील कामगारांची सुट्टी असल्याने जिया उल हक याने दुपारी दोन वाजण्याच्या सुमारास घरी असताना आपले उत्तर प्रदेशातील साथीदार सज्जाद जरूल अन्सारी (वय 19 वर्ष), अरबाज जमलू अन्सारी (वय 19 वर्ष), साकीर इब्राहिम अन्सारी (वय 24 वर्ष), आजम अली सजवाल अली उर्फ गुड्डू (वय 19 वर्ष) यांना सोबत घेऊन गुन्हा केला.

हत्येचे कारण काय?

पती जिया उल हक याला पत्नी फरीदाच्या चारित्र्यावर संशय होता, ज्यामुळे त्यांच्यात नेहमी भांडणे होत असत. फरीदा काही दिवसांपूर्वीच दोन मुलांसह जिया उल हकसोबत राहण्यासाठी आली होती. १५ ऑगस्ट रोजी, साखर कारखान्याच्या सुट्टीचा फायदा घेऊन जिया उल हकने आपल्या चार साथीदारांसोबत मिळून फरीदाचा खून करण्याचा कट रचला.

संशयितांना पोलिस कोठडी

खून प्रकरणी लातूर पोलिस, स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने कसून तपास करून या गुन्ह्याचा उलगडा केला. याप्रकरणी आरोपींना न्यायालयाने 05 दिवसांची पोलीस कोठडी सुनावली असून पुढील तपास पोलीस करीत आहेत.

Notifications
Settings
Clear Notifications
Notifications
Use the toggle to switch notifications
  • Block for 8 hours
  • Block for 12 hours
  • Block for 24 hours
  • Don't block
Gender
Select your Gender
  • Male
  • Female
  • Others
Age
Select your Age Range
  • Under 18
  • 18 to 25
  • 26 to 35
  • 36 to 45
  • 45 to 55
  • 55+