Get Updates
Get notified of breaking news, exclusive insights, and must-see stories!

Ladki Bahin Yojana मोठी बातमी! लाडकी बहिण योजनेतील 27 हजार 317 महिलांचे अर्ज बाद!,'हे' आहे मोठे कारण

Ladki Bahin Yojana : मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजनेसंदर्भात एक मोठी आणि महत्वाची अपडेट आली आहे. लाडकी बहिण योजनेत यापुर्वी सरकारी कर्मचाऱ्यांनी शिरकाव केल्यानंतर राज्य सरकारने ठोस पडताळणी प्रक्रीया आणखी तीव्र केली, त्यानंतर आता जवळपास २७ हजार ३१७ महिलांचे अर्ज बाद करण्यात आले आहेत, आता राज्यातील या महिलांना लाडकी बहिण योजनेचा लाभ मिळणार नाही.

राज्यात महायुती सरकारने मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजना आणली. सर्वप्रथम ही योजना देशात मध्यप्रदेशात भाजपप्रणित शिवराजसिंह सरकारने आणली होती. त्याचाच कित्ता गिरवत महाराष्ट्रात महायुती सरकारने ही योजना आणली पाहता - पाहता या योजनेचे जवळपास पावने दोन कोटी लाभार्थी झाले आहेत. अशातच ही योजना फारच लोकप्रिय झाली. या योजनेअंतर्गत राज्य सरकार प्रत्येक लाभार्थी महिलांना १५०० रुपये मानधन स्वरुपात देते. आता हे मानधन राज्यातील सुमारे २७ हजार महिलांना मिळणार नाही हे निश्चित झाले आहे.

Ladki Bahin Yojana

साम टीव्हीने यासंदर्भात वृत्त दिले. त्यानुसार, लाडकीबहिण योजनेत जे निकषात बसत नाहीत त्यांना लाभ मिळणार नाही. ज्या महिला निकषात बसतील त्यांनाच या योजनेचा लाभ मिळणार आहे. काही महिलांनी एका योजनेचा लाभ मिळत असताना दुसऱ्या योजनेचाही लाभ घेणे सुरु केले आहे. ही बाब सरकारच्या निदर्शनास आली आहे. ही बाब लक्षात घेता आणि कर्मचाऱ्यांचा लाडकी बहिण योजनेत शिरकाव पाहता राज्य सरकारने कडक पडताळणी सुरु केली आहे.

का मिळणार नाही लाभ?

ज्या महिला पात्रतेत बसत नाहीत अशांना योजनेतून अपात्र ठरवले जात आहे आणि त्यांना लाभ मिळत नाही. साम टीव्हीने वृत्त दिले की, जे लाभार्थी आयकराच्या कक्षेत आहेत, नमो शेतकरी सन्मान योजनेचे लाभार्थी, संजय गांधी निराधार योजनेचे लाभार्थ्यांमध्ये एकाच कुटुंबातील लाभार्थी अर्जदारांची संख्या जास्त असल्याने अर्ज बाद करण्यात येत आहेत. आतापर्यंत यवतमाळ जिल्ह्यात २७ हजार ३१७ लाभार्थ्यांना अपात्र करण्यात आले आहे.

Take a Poll

कोणत्या महिला ठरतील अपात्र? समजून घ्या

  • २१ वर्षांखालील महिला किंवा ज्या महिलांचे ६५ वर्षापेक्षा अधिक वय झाले आहे अशा महिला पात्र ठरणार नाहीत.
  • वार्षिक कौटुंबिक उत्पन्न अडीच लाखांपेक्षा जास्त असलेले अर्जदार महिलांना आणि सरकारी कर्मचारी असलेल्यांच्या कुटुंबातील सदस्यांना लाभ मिळणार नाही या अपात्र ठरवलेल्या आहेत.
  • ट्रॅक्टर वगळता ज्या महिलांच्या घरात चारचाकी वाहने आहेत, ज्यांना आधीच इतर सरकारी योजनांचा लाभ मिळत आहे अशा महिलांना या योजनेचा लाभ मिळणार नाही.
  • महाराष्ट्रातील अनिवासी असलेल्या महिला आणि वरील कोणत्याही नियमांचे उल्लंघन करणाऱ्या महिलांचे अर्ज रद्द करण्यात आले आहेत.
Notifications
Settings
Clear Notifications
Notifications
Use the toggle to switch notifications
  • Block for 8 hours
  • Block for 12 hours
  • Block for 24 hours
  • Don't block
Gender
Select your Gender
  • Male
  • Female
  • Others
Age
Select your Age Range
  • Under 18
  • 18 to 25
  • 26 to 35
  • 36 to 45
  • 45 to 55
  • 55+