१ डिसेंबरला नोकरीवर रुजू अन् नऊ डिसेंबरला अपघात; चालक संजय मोरे बद्दल शाँकींग माहिती समोर...
Kurla Best Bus Accident- काल रात्री मुंबईतील कुर्ला येथे बसचा भीषण अपघाताचा घटना घडली. या अपघातात सात जणांचा मृत्यू झाला असून सुमारे पन्नास प्रवासी जखमी झाले आहेत. बृहन्मुंबई महापालिकेच्या बेस्ट बसने नियंत्रण गमावल्यावर, या बसने थेट लाल बहादुर शास्त्री मार्गावरील गर्दीत लोकांना चिरडले. आता या अपघातात अनेक धक्कादायक बाबी समोर येऊ लागल्या आहेत.

चालकाची होती पहिलीच ट्रिप
या बेस्ट बसचा चालक संजय मोरे याच्याबाबत अनेक बाबी आता समोर येऊ लागल्या आहेत. संजय मोरे हा घाटकोपर पश्चिमला असणाऱ्या असल्फा परिसरात राहतो. तो एक डिसेंबरला बेस्टमध्ये कंत्राटी चालक म्हणून नोकरीस लागला होता. ९ डिसेंबरला त्याने आयुष्यातील पहिलीच ट्रिप केली आणि त्यातच घात झाला. संजय मोरे याने मद्यपान केले होते असा काहींचा आरोप आहे, मात्र पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार त्याने मद्यपान केलेले नव्हते हे आता समोर येत आहे. बसमध्ये तांत्रिक बिघाडही नव्हता, तर मग बस गर्दीत शिरलीच कशी, हा प्रश्न आता समोर येत आहे.
नेमका कसा झाला अपघात
सोमवारी रात्री साडेआठच्या सुमारास कुर्ला परिसरातील गजबलेल्या लालबहादुर शास्त्री मार्गावर लोकांच्या गर्दीत भरधाव बस शिरल्यानंतर अपघात झाला. सुरुवातीला बेस्टच्या इलेक्ट्रिक बसचा ब्रेक फेल झाल्यामुळे हा अपघात घडला, असे समोर आले आहे. मात्र आता या बसमध्ये तांत्रिक बिघाड ही नव्हता अशी माहिती पोलिसांकडून देण्यात आली. मात्र या अपघातात सात जणांचा मृत्यू झाला असून सुमारे ५० लोक जखमी झाले आहेत.
ब्रेकऐवजी एक्सिलेटर दाबले?
चालक संजय मोरे याची ही पहिलीच ट्रिप होती, अशी माहिती काहींनी दिली. त्यामुळेच त्याने ब्रेकऐवजी एक्सलेटर दाबल्याने हा अपघात झाला, असेही काहींचे म्हणणे आहे. बसवरील नियंत्रण सुटले अन् कुर्लातील हा भीषण अपघात झाल्याची माहिती पोलीस तपासातून समोर आली. संजय मोरे याच्यावर पोलिसांनी सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल केला आहे. कुर्ला बेस्ट बस अपघात प्रकरणातील मृतांचा आकडा वाढला आहे. या घटनेत आतापर्यंत सात जणांचा मृत्यू झाला असून, काही जणांची प्रकृती अजूनही गंभीर आहे.
कुर्ला येथे बेस्ट बसच्या अपघातात काही लोकांचे मृत्यू झाले, त्याबद्दल तीव्र दुःख व्यक्त करत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली आहे. त्यांच्या कुटुंबियांच्या दुःखात आम्ही सहभागी आहोत. तसेच जखमींच्या प्रकृतीत लवकर सुधारणा व्हावी, यासाठी मी प्रार्थना…
— @OfficeOfDevendra (@Devendra_Office) December 10, 2024
मृतांच्या वारसांना पाच लाखांची मदत
अपघातानंतर सरकारनेही तातडीने पावले उचलली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घटनेची माहिती घेतली. ते म्हणाले, "या घटनेतील मृतांच्या वारसांना मुख्यमंत्री सहायता निधीतून 5 लाख रुपये आर्थिक मदत देण्यात येईल. या घटनेत जे जखमी झाले, त्यांच्या उपचाराचा खर्च मुंबई महापालिका आणि बेस्टच्या वतीने करण्यासाठी आदेश देण्यात आले आहेत."












Click it and Unblock the Notifications