भाजप नेत्याची कन्या शिवसेनेच्या चिन्हावर रिंगणात! कन्नडमध्ये रंगतोय पती विरुद्ध पत्नी असा सामना
Kannada Assembly Election 2024 : छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील कन्नड विधानसभा मतदारसंघाकडे संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागले आहे. या निवडणुकीत भाजपचे नेते आणि माजी केंद्रीय मंत्री तसेच जालना जिल्ह्यातील बलाढ्य नेते रावसाहेब दानवे यांच्या कन्या संजना जाधव या शिवसेनेतून, त्यांचे पती हर्षवर्धन जाधव अपक्ष आणि उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाकडून विद्यमान आमदार उदयसिंग राजपूत विधानसभेच्या निमित्त रिंगणात उतरत आहेत. पतीविरुद्ध पत्नीची ही राज्याच्या इतिहासातील पहिली लढत आहे. त्यामुळे ही लढत रंगतदार होणार आहे.
विधानसभा मतदारसंघांची पुनर्रचना झाल्यानंतर 2009 साली हर्षवर्धन जाधव यांनी हा मतदारसंघ मनसेतून निवडणूक लढवून जिंकला होता. 2014 साली त्यांनी शिवसेनेचे तिकिटावर या विधानसभा मतदारसंघातून विजय मिळवला. मात्र 2019 साली त्यांनी अपक्ष निवडणूक लढवली. तत्कालीन अखंड शिवसेनेने उदयसिंह राजपूत यांना उमेदवारी दिली आणि उदयसिंग राजपूत निवडून आले. 2022 साली शिवसेनेत जी गडबड झाली त्यात उदयसिंह राजपूत हे उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या सोबतच राहिले. युतीतील जागावाटपात ही जागा शिवसेनेकडे जाणार हे स्पष्ट होते. एकनाथ शिंदे आपल्याकडून कोणाला संधी देतात याबद्दल राज्यभरात उत्सुकता होती.

संजना जाधव यांच्या खांद्यावर शिवसेनेचा झेंडा
रावसाहेब दानवे यांच्या कन्या संजना जाधव शिवसेना प्रवेशासाठी इच्छुक होत्या. त्यांनी गेल्या काही दिवसांपासून मुंबईतच ठाण मांडले होते. रावसाहेब दानवे यांनीही एकनाथ शिंदे यांची भेट घेतली आणि शिंदे यांच्या उपस्थितीतच संजना जाधव यांनी शिवसेनेचा झेंडा खांद्यावर घेतला. आता येथे तिरंगी लढत होणार असून तिघांचीही प्रतिष्ठा पणाला लागली आहे.
'माझी लाडकी बहीण'चे 60 हजार लाभार्थी
राज्य सरकारच्या विविध लोककल्याणकारी योजना राबवताना एकनाथ शिंदे आणि सर्वच मतदारसंघांकडे बारकाईने लक्ष दिले आहे. विशेषतः माझी लाडकी बहीण योजना ही महत्त्वाकांक्षी योजना अत्यंत कार्यक्षमतेने राबवण्यात आली. कन्नड विधानसभा मतदारसंघात एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचा आमदार नसूनही या मतदारसंघात तब्बल साठ हजार महिलांना लाडकी म्हणून योजनेचा लाभ देण्यात आला आहे. 60000 ही मोठी संख्या आहे.
कन्नड सत्र न्यायालय इमारत
देवगाव रंगारी ते चंपानेर या रस्त्याची मागणी गेल्या अनेक वर्षांपासून करण्यात येत होती नाबार्डचा निधी आणि 30 कोटी रुपये अन्य निधी देऊन या रस्त्याचे काम करण्यात येत आहे. या रस्त्याचा फायदा हजारो नागरिकांना होणार आहे. राज्य सरकारने विविध सत्र न्यायालय आणि जिल्हा न्यायालय यांच्या सुसज्ज इमारती उभारण्याकडे विशेष लक्ष दिले आहे. न्यायपालिकेला सर्व त्या सुविधा उपलब्ध करून देण्याकडे सरकारचा कल आहे.
बार असोसिएशनचे अध्यक्षांनी सरकारच्या या भूमिकेचे विशेष कौतुक केले आहे. न्यायालयांना इमारती उपलब्ध करून देण्याच्या कार्यक्रमांतर्गत कन्नड सत्र न्यायालयाची सुसज्ज इमारत उभारण्यात येत आहे यासाठी 50 कोटी रुपयांचा निधी देण्यात आला आहे. सहा महिन्यांपूर्वी या कामाला सुरुवात करण्यात आली असून लवकरच ते पूर्णत्वाकडे जाईल अशी शक्यता आहे.
चिखलठाण ते कन्नड रस्ता
चिखलठाण ते कन्नड या रस्त्याची मागणी स्थानिकांकडून गेल्या अनेक वर्षांपासून करण्यात येत होती. सुमारे 12 कोटी रुपये खर्च करून या रस्त्याचे काम पूर्ण करण्यात आले आहे आणि मार्गावरील नागरिक त्याचा लाभ घेत आहेत. कालीमाता मंदिर ते कालीमाता गाव हा कन्नड तालुक्यातील रस्ता तीन कोटी रुपये खर्च करून बांधण्यात येत आहे. यामुळे नागरिकांची चांगली सोय होणार आहे.
कन्नड विधानसभा मतदारसंघात मराठा समाजाच्या लोकांची संख्या अधिक आहे. रावसाहेब दानवे यांचेही या भागात बऱ्यापैकी वजन आहे. शिवसेना आणि भाजप युती म्हणून एक मोठा वर्ग या युतीच्या पाठीशी आहे. त्यातच संजना जाधव या नवीन उमेदवार आहेत. त्या महिला आहेत. भाजपने आगामी विधानसभा निवडणूक अत्यंत प्रतिष्ठेची केली असून एक जागाही हातची जाऊ द्यायची नाही, असा निर्धारच युतीच्या नेत्यांनी केला आहे. महायुतीत सूक्ष्म पातळीवर नियोजन केले जात असून लोकसभा निवडणुकीत झालेल्या चुका महायुतीकडून सुधारण्यात येत आहेत.
दुसरीकडे लोकसभा निवडणुकीत मिळालेल्या अनपेक्षित यशामुळे महाविकास आघाडीच्या नेत्यांचा आत्मविश्वास काहीसा अधिकच वाढला आहे. त्यातूनच महाविकास आघाडीतील तिन्ही पक्षांच्या नेत्यांमध्ये परस्पर विसंवादाची भूमिका स्पष्ट झाली आहे. उदयसिंह राजपूत हे शिवसेनेच्या उद्धव ठाकरे गटाचे उमेदवार असले तरी भाजपला मानणारी युतीतील मते आता त्यांच्या पाठीशी नाहीत. काँग्रेस आणि राष्ट्रवादीचे मतदार उदयसिंह राजपूत यांना कितपत मतदान करतात, याबाबत साशंकता आहे. तसेच सतत बदलत्या भूमिका मुळे हर्षवर्धन जाधव यांनी आपल्या विश्वासार्हतेवर प्रश्नचिन्ह निर्माण केले आहे त्यामुळे ही लढत संजना जाधव यांना तुलनेने सोपी जाईल असा राजकीय पंडितांचा अंदाज आहे.












Click it and Unblock the Notifications