राजकारण करु नये मग गोलगप्पे विकावे का? कंगना राणावतचे हे वक्तव्य चर्चेत, वाचा काय आहे प्रकरण
मुंबई - मुंबईत मातोश्री या निवासस्थानी उद्धव ठाकरेंच्या भेटीनंतर शंकराचार्यांनी माध्यमांना दिलेल्या प्रतिक्रियेवर सिने अभिनेत्री आणि खासदार कंगना रानावत हिने तिखट प्रतिक्रीया दिली आहे. राजा प्रजेचे शोषण करू लागला तर देशद्रोह हाच शेवटचा धर्म, राजकारण्यांनी राजकारण करु नये तर मग गोलगप्पे विकावे का? असे म्हणत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची कंगना राणावत हिने पाठराखण केली.
सीएम शिंदेवर झाली होती टीका
शंकराचार्य हे नुकतेच मातोश्रीवर येऊन गेले. त्यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची भेट घेतली. त्यानंतर त्यांनी माध्यमाला दिलेल्या मुलाखतीत ते म्हणाले होते की, कुणाचे हिंदुत्त्व खरे आणि कुणाचे खोटे हे जाणून घ्यावे लागेल. विश्वासघात करणारा हिंदू असू शकत नाही.

जो सहनशील आहे, विश्वासघातही सहन करतो तेच खरा हिंदू. ज्यांनी विश्वासघात केला ते हिंदू असू शकत नाहीत. उद्धव ठाकरेंबरोबर विश्वासघात झाला, ही बाब लोकसभा निवडणुकीच्या निकालातूनही स्पष्ट झाली आहे. महाराष्ट्राच्या जनतेनेही मतपेटीचया माध्यमातून तोच संदेश दिला आहे असे म्हणत त्यांनी अप्रत्यक्षपणे शिंदे यांच्यावर टीका केली होती.
राजनीति में गठबंधन , संधि और एक पार्टी का विभाजन होना बहुत सामान्य और संवैधानिक बात है, कांग्रेस पार्टी का विभाजन 1907 में और फिर 1971 में हुआ, अगर राजनीति में राजनीतज्ञ राजनीति नहीं करेगा तो क्या गोलगप्पे बेचेगा?
शंकराचार्य जी ने उनकी शब्दावली और अपने प्रभाव और धार्मिक शिक्षा… https://t.co/UV2KuLwVUz
— Kangana Ranaut (@KanganaTeam) July 17, 2024
राजनीति में गठबंधन , संधि और एक पार्टी का विभाजन होना बहुत सामान्य और संवैधानिक बात है, कांग्रेस पार्टी का विभाजन 1907 में और फिर 1971 में हुआ, अगर राजनीति में राजनीतज्ञ राजनीति नहीं करेगा तो क्या गोलगप्पे बेचेगा?
शंकराचार्य जी ने उनकी शब्दावली और अपने प्रभाव और धार्मिक शिक्षा… https://t.co/UV2KuLwVUz
कंगनाकडून सीएम शिंदेंची पाठराखण
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर केलेल्या टीकेनंतर अभिनेत्री आणि भाजप खासदार कंगना रनोट थेट मुख्यमंत्र्यांसाठी मैदानात उतरल्या. बंड अन् विभाजन सामान्य गोष्ट आहे. राजकारण्यांनी राजकारण करु नये तर मग गोलगप्पे विकावे का? असे एक्सवर पोस्ट करीत कंगना यांनी शंकराचार्यांच्या वक्तव्यावर आपली प्रतिक्रीया दिली.
काय आहे कंगनाची पोस्ट
कंगना राणावत हिने तिच्या एक्सवरील पोस्टमध्ये नमूद केले की, "राजकारणात पक्षाची युती, करार, विभागणी ही अतिशय सामान्य आणि घटनात्मक बाब आहे, काँग्रेस पक्षाची 1907 मध्ये विभागणी झाली आणि पुन्हा 1971 मध्ये झाली, राजकारणी राजकारण करत नसेल तर तो गोलगाप्पा विकणार का? शंकराचार्यजींनी त्यांच्या शब्दावली आणि त्यांचा प्रभाव आणि धार्मिक शिक्षणाचा गैरवापर केला आहे.
सर्वांच्या भावना दुखावल्या
कंगना यांनी आपल्या पोस्टमध्ये हेही नमूद केले की, राजा प्रजेचे शोषण करू लागला तर देशद्रोह हाच शेवटचा धर्म आहे, असेही धर्म सांगतो. शंकराचार्य जी यांनी आपल्या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर गद्दार आणि अपमानास्पद शब्द बोलून आपल्या सर्वांच्या भावना दुखावल्या आहेत.












Click it and Unblock the Notifications