फुटक्या मतांसाठी घरच्या लक्ष्मीला लाच देता? राणांचे ते वक्तव्य अन् शिंदे सरकारवर आव्हाडांची टीका
मुंबई - रवी राणा यांनी लाडकी बहिण योजनेवरुन केलेल्या वक्तव्यावर आता राजकारण चांगलेच तापले आहे. राष्ट्रवादी शरदचंद्र पक्षाचे नेते आणि आमदार जितेंद्र आव्हाड यांनी यावरुनच राज्य सरकारवर टीका केली आहे. तुमच्या फुटक्या मतांसाठी घरच्या लक्ष्मीला लाच देता का? असा सवाल त्यांनी करत राज्य सरकारला जाब विचारला आहे.
राज्यात लाडकी बहिण योजनेवरुन विरोधक राज्यसरकारवर टीकेची झोड उठवत आहे. ऐन निवडणुकीच्या तोंडावर ही योजना आणि अन्य आणलेल्या योजना म्हणजे निवडणूक जिंकण्याचा जुमला आहे असा आरोप विरोधक करत आहेत. त्यावर सत्ताधारीही आपली बाजू मांडत आहेत.

कालच मुख्यमंत्र्यांनी विरोधकांना उत्तर दिलं असतानाच बडनेराचे आमदार रवी राणा यांनी मुख्यमंत्री लाडकी बहिण योजनेच्या प्रमाणपत्र सोहळ्यात रवी राणा यांनी हे वक्तव्य केलं आहे. एक वक्तव्य चर्चेत आले असून त्यावर आता विरोधकांकडून चांगलीच टीका केली जात आहे.
काय म्हणाले होते रवी राणा?
रवी राणा यांनी अमरावतीत लाडकी बहिण योजनेच्या प्रमाणपत्र वितरण कार्यक्रमात एक वादग्रस्त वक्तव्य केलं. यावेळी रवी राणा यांनी म्हटले की, सरकारने पंधराशे रुपये देण्याचं सुरु केलं. पंधराशेऐवजी खात्यात तीन रुपये द्या असं कधी म्हणू शकाल जेव्हा तुम्ही सरकारला भरभरुन आशीर्वाद द्याल तेव्हा. ज्यांनी आशीर्वाद नाही तर मी तुमचा भाऊ आहे ते पंधराशे रुपये खात्यातून काढून घेऊ असे महिलांना उद्देशून वक्तव्य केलं होतं.
जितेंद्र आव्हाड यांचे ट्वीट

जितेंद्र आव्हाड यांनी काल रात्री एक ट्वीट करुन रवी राणांच्या वक्तव्याचा समाचार घेतला आणि राज्य सरकारवर टीका केली. हा राज्याच्या साध्याभोळ्या महिलांच्या भावनांसोबत खेळ आहे..! बाई ही घरची लक्ष्मी असते. मत दिलंत तरच पैसे देऊ, नाहीतर दिलेत तेही काढून घेऊ असं म्हणत घरच्या लक्ष्मीला पैश्यांचं आमिष दाखवता? असा सवाल केला.
हे सरकार घाणेरडा प्रचार करतेय
जितेंद्र आव्हाड म्हणाले, तुमच्या फुटक्या मतांसाठी घरच्या लक्ष्मीला लाच देता? या सरकारला लाज वाटायला हवी. माताभगिनींचा एवढा अपमान राज्यात कधीच झाला नव्हता, तेवढा हे सरकार या घाणेरड्या प्रचारात करतंय.
..ह्यांचं बहिणीवर प्रेम नाही
जितेंद्र आव्हाड म्हणाले, लाडकी लाडकी म्हणत ऊतू चाललेल्या बहिणींवरच्या प्रेमाचा आज भांडाफोड झालाय. ना ह्यांचं बहिणीवर प्रेम आहे, ना ही योजना हे सरकार पुढे सुरू ठेवणार आहे. परक्या भावांचा खरा चेहरा यानिमित्ताने समोर आला.












Click it and Unblock the Notifications