जितेंद्र आव्हाड म्हणतात, "एकनाथ शिंदे पैसे ....."

मुंबई : विधानसभा निवडणूक जसजशी जवळ येत चालली आहे तसतशी राजकीय नेत्यांची लगबग सुरु झाली आहे. पत्रकार परिषदा, अनौपचारिक गप्पा, भेटीगाठी यांना वेग येऊ लागला आहे. राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी नुकतेच एका अनौपचारिक चर्चेचे आयोजन केले होते. त्यावेळी बोलण्याच्या ओघात त्यांनी अनेक विषयांवर भाष्य केले. आता त्यातीलच एका विषयावरून शरद पवार गटाचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी अजित पवार यांना लक्ष्य केलंय. मात्र अजितदादांना लक्ष्य करताना आव्हाड यांनी एकनाथ शिंदे यांच्यावर कौतुकाचा वर्षाव केला आहे.

Jitendra Awhad

जितेंद्र आव्हाड म्हणतात, परवा महायुतीतील एका मोठ्या नेत्याने पत्रकारांना जेवण दिले. यावेळी झालेल्या अनौपचारिक चर्चेमध्ये, मुख्यमंत्री पैसे खर्च करून निवडणुका जिंकत आहेत, असा आरोप करीत सरकारच्या माध्यमातून विविध योजना जाहीर करायला लावतात. मात्र, त्यासाठी पैशांची उपलब्धता होत नाही. दिल्लीतील एक दिवसाच्या वास्तव्यात आपण भाजपच्या सर्वोच्च नेत्यांना हे सांगिल्याचे समजते तसेच अनेक विवादस्पद मुद्दे त्यांनी पत्रकारांशी अनौपचारीक रित्या शेयर केले

पैसे वाटायला एकनाथ शिंदे मागेपुढे पाहत नाहीत

आव्हाड पुढे म्हणतात, मी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याबाबत एक सांगू शकतो की, हा माणूस जेवढे पैसे कमवत असेल - नसेल, याबद्दल मला काही बोलायचे नाही. पण, जे पैसे त्यांच्या हातात येतात; ते पैसे मोकळेपणाने वाटायला एकनाथ शिंदे कधीच मागेपुढे पहात नाहीत, हे ! 1997 -98 पासून पहातोय. जेव्हा त्यांचा राजकीय प्रवास सुरू झाला. आजही ते तसेच करतात, हे त्यांच्या मित्रपरिवाराशी चर्चा केल्यावर दिसते.

यांना पैशातून जमिनी आणि कारखाने घ्यायचे असतात

अजित पवार यांच्यावर अप्रत्यक्ष टीका करताना आव्हाड म्हणतात, दुसरीकडे मात्र नेत्यांना आलेला पैसा लाॅकरमध्ये ठेवायचा असतो किंवा त्यातून नवीन जमिनी आणि कारखाने यातच घालवायचा असतो; निवडणुकांसाठी खर्च करायचा नसतो. एकनाथ शिंदे निवडणुकांसाठी खर्च करतात आणि जिंकतात. तुम्ही खर्च करीत नाही अन् हरता. मग, दोष एकनाथ शिंदेंना कशाला द्यायचा, दोष स्वतःच्या स्वभावाला द्या. पण, हा त्या नेत्याचा स्वभावच आहे. कारण, त्या नेत्याला युती - आघाडीत रहायची सवयच नसते. मी म्हणेन, तेच खरे ! अशीच त्यांची भूमिका असते.

कुठल्याही आघाडीत किंवा युतीमध्ये असे चालत नाही. मिळून- जुळवून घ्यायचे असते. पण, हे त्यांच्या स्वभावात नाही मुख्यमंत्र्यांबद्दल एवढाच राग असेल तर बाजूला बसू नका, असा सल्ला आव्हाड यांनी अजित पवार यांना दिला आहे. जितेंद्र आव्हाड यांनी एकनाथ शिंदे यांची अशी स्तुती केल्याने चर्चेला उधाण आले आहे.

Notifications
Settings
Clear Notifications
Notifications
Use the toggle to switch notifications
  • Block for 8 hours
  • Block for 12 hours
  • Block for 24 hours
  • Don't block
Gender
Select your Gender
  • Male
  • Female
  • Others
Age
Select your Age Range
  • Under 18
  • 18 to 25
  • 26 to 35
  • 36 to 45
  • 45 to 55
  • 55+