अजित गट म्हणजे पाकिटमारांची टोळी; जितेंद्र आव्हाडांचे वादग्रस्त विधान, भुजबळांनीही घेतला समाचार
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीचे बिगुल वाजले आहे. सत्ताधारी व विरोधकांकडून एकमेकांवर जोरदार चिखलफेक केली जात आहे. अशातच शरद पवार गटाचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी अजित पवार गटाबाबत बोलताना वादग्रस्त विधान केले.
अजित पवारांचा गट हा पाकिटमारांची टोळी आहे. अजित पवार मर्दाची औलाद असते तर असे म्हणत त्यांनी जोरदार निशाणा साधला. त्यांच्या या विधानानंतर राज्यात वादाची ठिणगी पेटली आहे. तर अजित पवार गटाकडून देखील प्रत्युत्तर दिले जात आहे.

आमदार जितेंद्र आव्हाड काय म्हणाले?
अजित पवार गट म्हणजे ही पाकिटमारांची टोळी आहे, तुमच्यात हिंमत होती, अजित पवार मर्दाची औलाद असते तर बोलले असते शरद पवार यांनी तुतारी निशाणी घेतली आणि म्हटलं असतं की मी पण दुसरं कोणतं चिन्ह घेऊन निवडणूक लढवतो तर त्यांना मर्द म्हटलं तर असतं. काकाने देशात वाढवलेला पक्ष माझा पक्ष असल्याचं म्हणून फिरत आहात. पण जनतेला वास्तव माहित आहे. असे वादग्रस्त विधान जितेंद्र आव्हाड यांनी केले.
आपण कोणाला काय बोलतो, याचं भान ठेवावं
आव्हाडांनी याआधीसुद्धा अनेकदा चुकीच्या शब्दांचा वापर केलाय, ज्यामुळे ते अनेकदा अडचणीत सापडले होते हे त्यांनी लक्षात ठेवावं. आपण कोणाला चोर, पाकिटमार म्हणतो याचा विचार केला पाहिजे, कारण तुमच्यासोबत जे 20-25 वर्षे सोबत राहिले त्यांनाही हे वक्तव्य लागू होत असल्याचं छगन भुजबळ यांनी म्हटलं आहे.












Click it and Unblock the Notifications