Get Updates
Get notified of breaking news, exclusive insights, and must-see stories!

शेतकऱ्यांसाठी झटणारे शिवसैनिक अर्जुन खोतकर, पुन्हा जालन्यातून निवडणुकीच्या रिंगणात विजयाची अधिक संधी

Jalna Assembly Election 2024 : शिवसेना आणि बाळासाहेब ठाकरे यांना मुंबई, ठाणे, आणि कोकणापाठोपाठ सर्वाधिक जनाधार मिळाला तो मराठवाड्यात. बाळासाहेबांच्या झंझावाती भाषणांनी हजारो तरुण शिवसेना या चार अक्षरांभोवती एकवटले. प्रस्थापित विरुद्ध विस्थापित अशा संघर्षात राजकारणाच्या परिघाबाहेरील हजारो विस्थापित तरुण शिवसैनिक झाले. संघटना वाढीसाठी लागणाऱ्या आणि प्रत्येक आंदोलनात सहभाग घेणाऱ्या अनेकांना राजकीय क्षेत्रात संधी निर्माण झाली. ऐन तारुण्यात राजकीय क्षितिजावर उगवलेला तारा म्हणजे जालन्याचे अर्जुन खोतकर होत.

जालना शहरात शिवसेना वाढविण्यासाठी प्रयत्न

मराठवाड्यात शिवसेनेने पाय रोवण्यास सुरुवात केली तेव्हा जालना शहरात शिवसेना वाढीसाठी ज्यांनी प्रयत्न केले त्यामध्ये अर्जुन खोतकर यांचा समावेश आहे. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा निष्ठावंत सैनिक आणि आक्रमक नेता अशी आमदार अर्जुन खोतकर यांची सुरुवातीपासूनची ओळख आहे. त्यामुळेच 1990 ला ऐन पंचवीशीतच त्यांची जालना विधानसभा मतदारसंघातून विधानसभा सदस्य म्हणून निवड झाली. त्यानंतर 1995 आणि 2004 मध्ये ते पुन्हा आमदार झाले.

Jalna Assembly Election 2024

2009 च्या विधानसभा निवडणुकीत त्यांनी जालना मतदारसंघाऐवजी घनसावंगी मतदारसंघातून निवडणूक लढविली; मात्र तेथे त्यांचा पराभव झाला. परंतु 2014 च्या निवडणुकीत त्यांनी पुन्हा जालना मतदारसंघातून निवडणूक लढवली आणि ते येथून विजयी झाले. 1999 च्या नारायण राणे मंत्रिमंडळात अर्जुन खोतकर यांना मंत्रीपदी संधी देण्यात आली. तसेच 2014 च्या देवेंद्र फडणवीस मंत्रिमंडळात देखील अर्जुन खोतकर हे मंत्री होते. 2019 साली मात्र जालना विधानसभा मतदारसंघात त्यांचा पराभव झाला.

बाळासाहेब ठाकरे यांचा कडवट शिवसैनिक

बाळासाहेब ठाकरे यांच्या कडवट शिवसैनिक अशी अर्जुन खोतकर यांची ओळख आहे. बाळासाहेबांच्या निधनानंतर पहिली जाहीर सभा जालना येथेच घेण्यात आली होती. जिल्ह्यातील दुष्काळी परिस्थितीवर आवाज उठवण्यासाठी या सभेला आक्रोश मेळावा, असे नाव देण्यात आले होते. या सभेनंतरच मराठवाड्यातील दुष्काळग्रस्तांचा अावाज राज्य आणि देशपातळीवर पोहोचला. त्यानंतरच मराठवाड्यात केंद्रीय पथकाने दुष्काळ पाहणी व मदतीचही घोषणा केली. या सभेला संपूर्ण मराठवाड्यातून शेतकरी आणि शिवसैनिकांची गर्दी झाली होती.

2014 च्या लोकसभा निवडणुकीसाठी पक्षाने त्यांना परभणी मतदारसंघातून तयारी करण्याचे संकेत दिले होते. तेव्हा त्यांनी संपूर्ण परभणी मतदारसंघ पिंजून काढला, तेथील समस्यांना वाचा फोडली. मात्र, ऐनवेळी त्यांना परभणीतून उमेदवारी मिळाली नाही. त्यांनी निराश न होता जाेमाने काम करीत ही जागा शिवसेनेला मिळवून देण्यात महत्त्वाची भूमिका बजावली.जालना जिल्ह्यात शिवसेनेचा विस्तारात अर्जुन खोतकर यांचा खूप मोठा वाटा आहे.

शेतकऱ्यांच्या प्रश्नावर आक्रमक भूमिका

सत्तेत शिवसेना सहभागी असतानाही शेतकरी प्रश्नावर आक्रमक भूमिका घेतानाच राज्य सरकारच्या जलयुक्त शिवार योजनेला शिवजलक्रांती योजनेच्या माध्यमातून तोडीस तोड काम केल्याचे फळ म्हणून खोतकर यांना 2014 साली दुसऱ्यांदा मंत्रिपदाची संधी मिळाली.अधिवेशनातील त्यांच्या भाषणांची सरकारला वेळोवेळी दखल घ्यावी लागली. शिवसेना सत्तेत असतानाही आमदार खोतकर यांनी अनेक वेळा सरकारला धारवेर धरले. त्यामुळे शेतकऱ्यांच्या प्रश्नावर लढणारा नेता अशी त्यांची ओळख आहे.

एकनाथ शिंदे यांना पाठींबा

2022 मध्ये शिवसेनेत मोठ्या घडामोडी घडल्या. एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरे यांच्या विरोधात बंड केले आणि त्यांना बहुसंख्य आमदारांनी पाठिंबा दिला. राज्यभरातून शिवसैनिक, पदाधिकारी आणि लोकप्रतिनिधी यांनी एकनाथ शिंदे यांचे नेतृत्व मान्य केले. पक्ष आणि पक्षाचे चिन्ह देखील एकनाथ शिंदे यांना देण्याचा निर्णय घेण्यात आला. सुरुवातीच्या काळात उद्धव ठाकरे यांच्याबरोबर असणारे अर्जुन खोतकर कालांतराने एकनाथ शिंदे यांच्या सोबत गेले. 2024 च्या विधानसभा निवडणुकीसाठी एकनाथ शिंदे यांनी जालना विधानसभा मतदारसंघातून अर्जुन खोतकर यांना संधी दिली आहे.

जालना जिल्ह्यात मोठ्या प्रमाणावर विकासकामे

अलीकडच्या काळात जालना विधानसभा मतदारसंघात प्रचंड विकासकामे राबवण्यात आली आहेत. नांदेड ते मनमाड या रेल्वे मार्गाचे सुधारिकरण करण्यात येत असून त्यामुळे त्या मार्गावरील प्रवाशांच्या वेळेत बचत होत आहे. जालना जळगाव नव्या रेल्वे मार्गाला मंजुरी देण्यात आली आहे ज्यामुळे या दोन्ही शहरांचा संपर्क वाढणार असून आर्थिक विकासाला मोठी चालना मिळणार आहे. जालना ते मुंबई अशी नवी जनशताब्दी एक्सप्रेस सुरू करण्यात आली असून दोन्ही शहरात दरम्यान लागणारा प्रवासाचा वेळ खूपच कमी झाला आहे.

जालना शहराच्या जवळून जाणारा समृद्धी महामार्ग जिल्ह्यासाठी भाग्यरेषा ठरला आहे. मराठवाडा पट्ट्यातील अनेक मोठी शहरे समृद्धी महामार्गामुळे जोडली गेली आहेत. या परिसरातील आर्थिक विकासाला समृद्धी महामार्गामुळे मोठी चालना मिळाली आहे. पालघर येथे होऊ घातलेल्या वाढवण बंदराला समृद्धी महामार्ग जोडण्याच्या हालचाली देखील सुरू झाल्या आहेत. यामुळे मराठवाड्यातील शेतीमाल आणि औद्योगिक उत्पादने जलद गतीने विदेशात पाठवण्याचा मार्ग मोकळा होणार आहे.

वॉटर ग्रीड प्रकल्पाला चालना

देवेंद्र फडणवीस सरकारच्या काळात वॉटर ग्रीड प्रकल्पाचे सूतोवाच करण्यात आले होते. पश्चिम वाहिनी नद्यांचे समुद्रात वाहून जाणारे पाणी मराठवाड्यात आणणारी ही योजना आहे. उद्धव ठाकरे यांच्या महाविकास आघाडी सरकारच्या काळात या योजनेला ब्रेक देण्यात आला. परंतु महायुती सरकार पुन्हा सत्तेत आल्यानंतर या प्रकल्पाला गती देण्यात येत आहे. हा प्रकल्प पूर्ण झाल्या नंतर जालन्याचा आणि प्रश्न मोठ्या प्रमाणात मिळणार आहे.

एकनाथ शिंदे यांचे नेतृत्वाखाली महायुती सरकारने व्यक्तिगत लाभाच्या अनेक योजना आखून त्यांची प्रभावी अंमलबजावणी सुरू केली आहे. त्याचाही लाभ महायुतीला मिळणार आहे. महाविकास आघाडीत निर्माण झालेला विसंवाद, अर्जुन खोतकर यांनी गेल्या पंचवीस तीस वर्षात केलेले काम आणि जालना जिल्ह्याच्या विकासासाठी राबविण्यात आलेल्या विविध योजना यामुळे 2024 च्या विधानसभा निवडणुकीत अर्जुन खोतकर यांचे पारडे जड आहे.

Notifications
Settings
Clear Notifications
Notifications
Use the toggle to switch notifications
  • Block for 8 hours
  • Block for 12 hours
  • Block for 24 hours
  • Don't block
Gender
Select your Gender
  • Male
  • Female
  • Others
Age
Select your Age Range
  • Under 18
  • 18 to 25
  • 26 to 35
  • 36 to 45
  • 45 to 55
  • 55+