Get Updates
Get notified of breaking news, exclusive insights, and must-see stories!

रेल्वे दुर्घटनेचे जळ'गाव'! मृत प्रवाशांच्या वारसांना 5 लाखांची मदत! CM देवेंद्र फडणवीस यांची घोषणा

Jalgaon train accident : जळगावच्या पाचोरानजीक पुष्पक एक्स्प्रेसमध्ये आग लागल्याच्या अफवा पसरली. प्रवाशांनी चैन ओढून पटापट रेल्वेतून उड्या मारल्या अन् समोरुन येणाऱ्या कर्नाटक एक्स्प्रेसने उडवल्याने तब्बल 11 प्रवाशांचा मृत्यू झाला. ही दुर्घटना अत्यंत भीषण असून या घटनेत जवळपास 40 प्रवासी जखमी झाले आहेत. दरम्यान, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मृतांच्या वारसांना प्रत्येकी 5 लाख रुपयांची मदत सरकारतर्फे घोषित केली आहे.

Jalgaon train accident

काय म्हणाले देवेंद्र फडणवीस?

Devendra Fadnavis यांनी एक्सवर एक व्हिडिओ पोस्ट केला आहे. या व्हिडिओतून त्यांनी जळगाव रेल्वे दुर्घटनेविषयी भाष्य केले असून मदतही जाहीर केली आहे. ते म्हणाले, "जळगाव जिल्ह्यातील दुर्दैवी अपघातातील मृतांच्या वारसांना 5 लाख रुपये आर्थिक सहाय्य राज्य सरकारतर्फे करण्यात येईल आणि जखमींचा संपूर्ण खर्च सुद्धा राज्य सरकार करेल. जखमींच्या प्रकृतीत लवकर सुधारणा व्हावी, अशी मी ईश्वरचरणी प्रार्थना करतो."

घटनास्थळी गिरीश महाजन

देवेंद्र फडणवीस म्हणाले, "जळगाव जिल्ह्यातील पाचोरानजीक एका अत्यंत दुर्दैवी घटनेत काही लोकांचा मृत्यू झाल्याची घटना अतिशय वेदनादायी आहे. मी त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो. माझे सहकारी मंत्री गिरीश महाजन तसेच पोलिस अधीक्षक हे घटनास्थळी पोहोचले असून, जिल्हाधिकारी काही वेळात तेथे पोहोचत आहेत. संपूर्ण जिल्हा प्रशासन रेल्वे प्रशासनाशी समन्वयाने काम करीत असून, जखमींच्या उपचारासाठी तातडीने व्यवस्था करण्यात येत आहेत."

CM फडणवीस संपूर्ण स्थितीवर लक्ष ठेवून

देवेंद्र फडणवीस म्हणाले, "घटनास्थळी 8 रुग्णवाहिका रवाना करण्यात आल्या आहेत. सामान्य रुग्णालय तसेच नजीकच्या इतर खाजगी रुग्णालयांना जखमींवर उपचारासाठी सज्ज ठेवण्यात आले आहे. ग्लासकटर, फ्लडलाईट्स इत्यादी आपातकालिन यंत्रणा सुद्धा सज्ज ठेवण्यात आल्या आहेत. संपूर्ण स्थितीवर आम्ही लक्ष ठेऊन असून, आवश्यक ती सर्व मदत तातडीने पुरविण्यात येत आहे. मी जिल्हा प्रशासनाच्या संपर्कात आहे."

जखमींना सर्वोतोपरी मदत - अमित शहा

अमित शहा म्हणाले, "महाराष्ट्रातील जळगाव येथे झालेला रेल्वे अपघात अत्यंत दुःखद आहे. या संदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी बोलून अपघाताची माहिती घेतली. स्थानिक प्रशासन जखमींना सर्वतोपरी मदत करत आहे. या दुर्घटनेत मृत्युमुखी पडलेल्यांच्या कुटुंबियांप्रती मी मनापासून संवेदना व्यक्त करतो आणि जखमींच्या लवकरात लवकर बरे होण्यासाठी प्रार्थना करतो."

अमित शहांनी घेतली घटनेची माहिती

अमित शहा म्हणाले, " महाराष्ट्रातील जळगाव येथे झालेला रेल्वे अपघात अत्यंत दुःखद आहे. किंवा मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी चर्चा करून घटनेची माहिती घेतली. स्थानिक प्रशासन जखमींना सर्वतोपरी मदत करत आहे. या दुर्घटनेत मृत्युमुखी पडलेल्या नागरिकांप्रती मी शोक व्यक्त करतो आणि जखमी लवकर बरे व्हावेत अशी मी प्रार्थना करतो."

Notifications
Settings
Clear Notifications
Notifications
Use the toggle to switch notifications
  • Block for 8 hours
  • Block for 12 hours
  • Block for 24 hours
  • Don't block
Gender
Select your Gender
  • Male
  • Female
  • Others
Age
Select your Age Range
  • Under 18
  • 18 to 25
  • 26 to 35
  • 36 to 45
  • 45 to 55
  • 55+