मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या कार्यकाळात अंतर्गत सुरक्षेला प्राधान्य

मुंबई हे राज्याच्या आणि देशाच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचे शहर आहे. मुंबई ही राज्याची राजधानी असून देशाच्या आर्थिक राजधानीचे शहर म्हणून मुंबईची ओळख आहे. अनेक बड्या कंपन्यांची मुख्यालय तसेच उद्योगपतींची निवासस्थाने मुंबईतच येतात. त्यामुळे मुंबई हे शत्रूराष्ट्रांचे आणि दहशतवाद्यांचे लक्ष असते.

गेल्या अनेक वर्षापासून मुंबई शहराला टार्गेट करण्याचे प्रयत्न अनेक वेळा करण्यात आले. 1993 साली झालेले बॉम्बस्फोट, रेल्वे बॉम्बस्फोट, बेस्टमध्ये झालेले बॉम्बस्फोट, 2008 साली झालेला मुंबईवरील दहशतवादी हल्ला, रजा अकादमीने मुंबईत घातलेला धुमाकूळ, स्लीपर सेलचा वावर अशा अनेक घटना मुंबईत घडल्या. या घटनांमध्ये शेकडो मुंबईकरांना आपला जीव गमवावा लागला तर कित्येक जण जखमी झाले.

Cm Eknath Shinde

2014 पासून अशा घटना घडलेल्या नाहीत. एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील महायुती सरकारने देखील अंतर्गत सुरक्षेकडे विशेष लक्ष दिले असून शहरात किंवा राज्यात कोणतेही दहशतवादी कृत्य होणार नाही याची वेळीच खबरदारी घेतली आहे.

अप्रवृत्तीना वेळीच पायबंद

महाराष्ट्रातील काही भाग संवेदनशील म्हणून ओळखले जातात. या दहशतवादी संघटनेशी या भागातील तरुणांचा संपर्क असल्याचा संशय वेळोवेळी आला आहे. राज्याचे पोलीस खाते आणि केंद्रीय तपास यंत्रणांनी अशा अप्रवृत्तींना वेळीच जेरबंद केले आहे. राष्ट्रीय तपासणी करण्याच्या अधिकाऱ्यांची वेळोवेळी समन्वय ठेवून अनेक तरुणांना उचलण्यात आले आहे.

नक्षलवादाचा प्रभावी सामना

गडचिरोली चंद्रपूर असे जिल्हे नक्षल प्रभावी जिल्हे म्हणून ओळखले जातात. नक्षलींचा मुकाबला करताना सुरक्षा दलांचे अनेक जवान शहीद झाले. या भागाच्या सुरक्षे कडे एकनाथ शिंदे यांनी विशेष लक्ष दिले. उद्धव ठाकरे सरकारच्या काळात एकनाथ शिंदे यांनी गडचिरोली जिल्ह्याचे पालकमंत्रीपद मागून घेतले होते. या परिसरातील नक्षलवादाचा पूर्ण बिमोड करण्यात एकनाथ शिंदे सरकारला यश आले असून नक्षली चळवळींशी संबंधित असलेल्या अनेक तरुणांनी शरणागती पत्करून मुख्य प्रवाहात येणे पसंत केले आहे.

नक्षलवादाचा धोका कमी झाल्यामुळे उद्योजक देखील पूर्व विदर्भातील नक्षल प्रभावी जिल्ह्यात गुंतवणूक करण्यासाठी तयार झाले आहेत. त्यामुळेच रोजगाराच्या संधी निर्माण होत असून राज्य प्रगतीच्या दिशेने अग्रेसर पुण्याच्या दृष्टीने पावले उचलण्यात आली आहेत.

पोलीस दलाचे सक्षमीकरण

पोलीस दलाच्या सक्षमीकरणाकडे एकनाथ शिंदे सरकारने विशेष लक्ष दिले असून विविध पोलीस ठाण्यांची निर्मिती पोलीस ठाण्यामध्ये अत्याधुनिक सुविधा देण्यात येत आहेत तसेच राज्यात आठ हजाराहून अधिक पोलीस भरती शिंदे सरकारच्या कार्यकाळात पूर्ण करण्यात आली आहे. पोलीस दलाला अधिकाधिक मनुष्यबळ उपलब्ध करून देण्यासाठी आवश्यक त्या सर्व उपाययोजना आधी घेतल्या गेल्या.

सायबर गुन्हेगारीचा मुकाबला

सध्या गुन्हेगारी जगताचे स्वरूप बदलले असून सशस्त्र गुन्हेगारीपेक्षा आर्थिक आणि ऑनलाइन गुन्हेगारी अधिक बोकाळली आहे. त्यामुळेच पोलीस दलाने तंत्रज्ञानाच्या बाबतीत अधिक सक्षम होण्याची नितांत आवश्यकता आहे. काळाची गरज ओळखून पोलीस दलात अत्याधुनिक तंत्रज्ञान अंतर्भूत करण्यास एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली सरकारने प्राधान्य दिले. त्या दृष्टीने महापे येथे महाराष्ट्र सायबर सुरक्षा प्रकल्पाचे उद्घाटन उपमुख्यमंत्री तथागृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नुकतेच केले. सर्वोत्तम तंत्रज्ञानाने सज्ज असा हा महाराष्ट्र सायबर सुरक्षा प्रकल्प जनतेमधील सायबर हल्ल्याची भीती निश्चितच कमी करेल. हा प्रकल्प जनतेचे डिजिटल माध्यमातून होणाऱ्या फसवणूकीचे प्रमाण कमी करण्यात, त्यांना दिलासा देण्यात नक्कीच यशस्वी होईल

दरवर्षी पाच हजार पोलिसांना प्रशिक्षण

सायबर सिक्युरिटी प्रोजेक्ट हा सर्वांचा ड्रीम प्रोजेक्ट तसेच राज्यासाठी एक आयकॉनिक प्रोजेक्ट आहे. डिजिटल युगातील सायबर अटॅकचा सामना करण्यासाठी आपण सुसज्ज व्हावे, ही काळाची गरज होती. ही गरज या सेंटरच्या माध्यमातून पूर्ण झाली आहे. हे सेंटर देशातील सर्वात आधुनिक सायबर सिक्युरिटी सेंटर झाले आहे.

व्हॉट्सअप, फेसबुकच्या माध्यमातून खोट्या मेसेजच्या आधारे लोकांची फसवणूक होत असल्याचे निदर्शनास येत आहे. यावर शासनाने गांभीर्याने विचार करून आधुनिक सायबर सिक्युरिटी सेंटर सुरू करण्यासाठी हे पाऊल उचलले आहे. या सायबर सिक्युरिटी सेंटरच्या माध्यमातून दरवर्षी पाच हजार पोलिसांना प्रशिक्षण दिले जाऊ शकते. महाराष्ट्र हे भारतातील तंत्रज्ञान क्षेत्राचे नेतृत्व करीत आहे. हा केवळ प्रकल्प न राहता कॉर्पोरेशन व्हावे, इतर राज्यांनाही या माध्यमातून सायबर सिक्युरिटी बाबतचे मार्गदर्शन केले जावे, खासगी क्षेत्रातील आधुनिक तंत्रज्ञान तज्ज्ञांशीही आपला समन्वय वाढवावा, अशी अपेक्षा देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केली.

चेहऱ्यावरून ओळख पटवणारी अत्याधुनिक यंत्रणा

महाराष्ट्रात गुन्हे करून अन्य राज्यात पळून जाणाऱ्या गुन्हेगारांची संख्या मोठी आहे. असे गुन्हेगार काही कालावधीनंतर महाराष्ट्रात परत येतात आणि पुन्हा गुन्हा करून निघून जातात. अशा गुन्हेगारांचा छडा लावण्यासाठी चेहऱ्यावरून ओळख पटवणारी अत्याधुनिक यंत्रणा कार्यान्वित करण्यात आली आहे. राज्यातील महत्त्वाच्या शहरात या यंत्रणासाठी आवश्यक असणारी साधनसामग्री पोलीस दलाला उपलब्ध करून देण्यात आली आहे. दहशतवाद, संघटित गुन्हेगारी, टोळी उद्धे, नक्षलवाद अशा प्रकारच्या गुन्हेगारीला एकनाथ शिंदे यांच्या कार्यकाळात मोठा लगाम लागला आहे.

Notifications
Settings
Clear Notifications
Notifications
Use the toggle to switch notifications
  • Block for 8 hours
  • Block for 12 hours
  • Block for 24 hours
  • Don't block
Gender
Select your Gender
  • Male
  • Female
  • Others
Age
Select your Age Range
  • Under 18
  • 18 to 25
  • 26 to 35
  • 36 to 45
  • 45 to 55
  • 55+