काय सांगता! पोस्टातील 'या' योजनत व्याज बंद; सरकारचे निर्देश, म्हणाले- पैसे काढून घ्या!

National Bachan Yojana, Indian Post : केंद्रसरकारच्या वतीने नागरिकांसाठी अनेक योजना राबवल्या आहेत. यातील काही योजना या पोस्ट ऑफिसच्या आहेत. पोस्ट ऑफिसच्या राष्ट्रीय बचत योजनेअंतर्गत आता व्याज देणे बंद झालेय. या योजनेअंतर्गत ठेवींवर व्याज न देण्याचा निर्णय घेण्यात आलाय. केंद्र सरकारने राष्ट्रीय बचत योजनेच्या संदर्भात सूचना जारी केलीय. त्यामुळे आता गुंतवणूकदारांना चांगलाच फटका बसणार आहे.

काय आहे सूचना

राष्ट्रीय बचन योजनेसंदर्भात ठेवीदारांना ३० सप्टेंबरपर्यंत पैसे काढण्यास सांगण्यात आलेय. १ ऑक्टोबर २०२४ पासून या योजनेत व्याज मिळणार नाही. सरकारने जारी केलेल्या मार्गदर्शक तत्वांनुसार, ज्या ठेवीदारांना आपले आर्थिक भविष्य सुरक्षित करण्यासाठी गुंतवणूक केली जाते.या योजनेतील पैसे तुम्ही ३० सप्टेंबरपूर्वी काढू शकतात.

National Bachan Yojana

योजना 1992 मध्येच झाली बंद

राष्ट्रीय बचत योजना ही 1992 मध्ये गुंतवणूकीसाठी पूर्ण बंद करण्यात आली होती. या योजनेत 1992 नंतर कोणीही गुंतवणूक करु शकत नाही. मात्र, या योजनेअंतर्गत सरकार चक्रवाढ व्याज देत होते. हे व्याजदेखील आता दिले जाणार नाही. या योजनेत 7.5 टक्के व्याजदर दिले जात होते.

राष्ट्रीय बचत योजना 1987 रोजी सुरु करण्यात आली होती. ती 1992 मध्ये बंद झाली होती. काही काळानंतर ही योजना पुन्हा सुरु करण्यात आली होती. सरकार या योजनेत व्याजदर देत होते. ज्यांनी या योजनेत गुंतवणूक केली त्यांना या योजनेअंतर्गत चांगले व्याजदर मिळत होते.

राष्ट्रीय बचत योजनेत तुम्हाला वार्षिक 40,000 रुपये गुंतवणूक करावी लागायची. या गुंतवणूकीवर कलम 80C अंतर्गत सूट मिळायची. या योजनेत लॉक इन कालावधीनंतर मूळ रक्कम आणि व्याज काढायची परवानगी होती. या योजनेत पूर्वी ११ टक्के व्याज मिळायचे. त्यानंतर हे व्याज 7.5 टक्के करण्यात आले. आता या ठेवींवर व्याज दिले जाणार नाही.

Notifications
Settings
Clear Notifications
Notifications
Use the toggle to switch notifications
  • Block for 8 hours
  • Block for 12 hours
  • Block for 24 hours
  • Don't block
Gender
Select your Gender
  • Male
  • Female
  • Others
Age
Select your Age Range
  • Under 18
  • 18 to 25
  • 26 to 35
  • 36 to 45
  • 45 to 55
  • 55+