छत्रपती शिवाजी महाराजांचे हे प्रेरणादायी विचार तुमचं आयुष्य बदलवतील; शिवजयंतीनमित्त मानाचा मुजरा
स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराजांनी हिंदवी स्वराज्य स्थापन करताना अनेक अडचणींना तोंड द्यावं लागलं होतं. परकीयांशी, मुघलांशी, आणि स्थानिक संस्थानिकांशी संघर्ष करताना त्यांना जिवाची बाजी लावावी लागली होती. हे सगळं अनपेक्षित होतं मात्र महाराजांनी कधीच हार मानली नाही. ते कधीच निराश झाले नाहीत. उलट जिद्द आणि चातुर्य यांच्या जोरावर त्यांनी प्रतिकूल परिस्थीतीवर मात केली.

आपल्याही आयुष्यात अनेकदा प्रतिकूल परिस्थिती येते. अनेक गोष्टी या आपल्या मनाविरूद्ध घडतात. प्रतिस्पर्धी आपल्या मार्गात अडथळे निर्माण करतात. अशा वेळी तुम्ही शिवाजी महाराजांचे हे विचार वाचा. तुम्हाला यश मिळवण्यापासून कोणीही रोखू शकणार नाही. शिवाजी महाराजांची जयंती निमित्त महाराजांचे हेच अनमोल विचार आपण आत्मसात केले तर, आपल्यालाही यशस्वी होता येईल. महाराजांचे असेच प्रेरणादायी विचार आपण पाहूयात...
१. शत्रू कितीही बलाढ्य असला, तरी आपल्या हेतू आणि उत्साहानेच त्याचा पराभव होऊ शकतो.
२. जेव्हा जिंकणं हेच ध्येय असतं, तेव्हा अविरत मेहनत आणि अगणित किंमत मोजावी लागतेच.
३. प्रत्येक लहान ध्येयाच्या दिशेनं टाकलेलं एक छोटं पाऊल मोठे ध्येय साध्य करतं.
४. जेव्हा ध्येय स्पष्ट असतं तेव्हा डोंगर देखील मातीच्या ढिगारासारखे दिसतात.
५. कोणतंही काम करण्यापूर्वी परिणामांचा विचार करा, कारण भावी पिढी त्याच गोष्टींचं अनुसरण करते.
६. जो माणूस काळाच्या दुष्ट वर्तुळातही आपल्या कामात संपूर्णपणे गुंतलेला असतो, त्याच्यासाठी वेळ स्वतःच बदलतो.
७. शत्रूला कमकुवत समजू नका. पण त्याला खूप बलवान समजून घाबरू देखील नका.












Click it and Unblock the Notifications