"या अवलादी मुळावर उठतील माहीतेयं!" इंदोरीकर महाराजांचा नवा VIDEO! मुलीचं लग्न कसं करणार सांगून टाकलं
Indurikar Maharaj Daughter Marriage : 'लग्न म्हणजे खर्च टाळा, साधेपणाने करा' असा उपदेश आपल्या कीर्तनातून सातत्याने करणाऱ्या आणि प्रचंड लोकप्रिय असलेल्या कीर्तनकार निवृत्ती महाराज इंदोरीकर यांचा एक नवा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये त्यांनी आपल्या मुलीचे लग्न अत्यंत जंगी पद्धतीने आणि मोठ्या खर्चाने करणार असल्याचे स्पष्टपणे बोलले आहे. त्यांच्या या वक्तव्यामुळे त्यांच्या पूर्वीच्या साधेपणाच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उभे राहिले असून, नवा वाद निर्माण होण्याची शक्यता आहे.

'लोक बोंबलतील म्हणून कमी वयात लग्न, पण...'
व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये इंदोरीकर महाराज संवाद साधताना दिसत आहेत. मुलीच्या लग्नाबद्दल बोलताना त्यांनी केलेले वक्तव्य लक्ष वेधून घेणारे आहे. "लोक बोंबलतील म्हणून कमी वयात मुलींची लग्न केली. मला माहित आहे, या अवलादी (वाद करणारे लोक) माझ्यामुळे मुलावर उठतील. मी सांगतो की मी माझ्या मुलीचं लग्न यापेक्षाही जंगी करणार आहे.असे ते या व्हिडिओत म्हटल्याचे दिसते..
'३० मिनिटांच्या सभेसाठी ३ कोटी खर्च' - इंदोरीकरांचे गंभीर आरोप
या व्हिडिओतील संवादात इंदोरीकर महाराजांनी समाजात होणाऱ्या अवाजवी खर्चावर आणि राजकीय खर्चावरही गंभीर भाष्य केले आहे. "तीस मिनिटांच्या सभेसाठी तीन कोटी रुपये खर्च होतात. कोणत्याही चॅनल वाल्यांना विचारून दाखवा. पुढच्या महिन्यात अख्खा तमाशा सुरू होईल. गावोगाव ही विकली गेलेली लोकं आहेत. किती दुसऱ्यांना त्रास देणार, यालाही मर्यादा आहेत." असे त्यांनी राजकारण आणि निवडणुकीवर भाष्य केले
इंदोरीकर महाराजांची पुर्वीची भूमिका vs आताचे वक्तव्य
कीर्तनकार निवृत्ती महाराज इंदोरीकर हे महाराष्ट्रात त्यांच्या रोखठोक कीर्तनासाठी प्रसिद्ध आहेत. त्यांचे कीर्तन 'लग्न म्हणजे खर्च टाळा' आणि 'हुंडा घेऊ नका, साधेपणाने समारंभ करा' यांसारख्या सामाजिक संदेशांसाठी ओळखले जातात.
पूर्वीची भूमिका: कीर्तनातून ते अनेकदा लग्नसोहळ्यातील अवाजवी खर्च टाळण्याचा आणि कमी वयात लग्न करून मुला-मुलींना योग्य वेळी संसार करण्यास प्रवृत्त करण्याचा संदेश देत असत.
नवा यू-टर्न: मात्र, आता व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये त्यांनी स्वतःच्या मुलीचे लग्न 'जंगली' (भव्य) पद्धतीने करणार असल्याचे सांगून, टीकाकारांना लक्ष्य केल्याचे दिसत आहे. त्यांच्या या नव्या भूमिकेमुळे समाजप्रबोधन करणाऱ्या कीर्तनकाराच्या कथनी आणि करनीमध्ये फरक आहे का, अशी चर्चा सुरू झाली आहे.
"तिकडे दुनिया खाल्ली लोकांनी.." संताप अनावर
"तिकडे दुनिया खाल्ली लोकांनी..!" असे वक्तव्य व्हायरल व्हिडिओत दिसून येते. या वक्तव्यातून त्यांनी टीकाकारांना थेट आव्हान दिले असून, लग्नातील साधेपणाच्या भूमिकेपासून ते दुर गेल्याचे दिसून येत आहेत. विशेष म्हणजे त्यांच्या मुलीच्या साखरपुड्यावर टीका झाल्यानंतर त्यांचाही संताप अनावर झाला आणि त्यांनी लोकांनी काय काय केले यावर आपली मतं थेट किर्तनातून व्यक्त केली.












Click it and Unblock the Notifications