Get Updates
Get notified of breaking news, exclusive insights, and must-see stories!

जर MIM मविआत आल्यास महाविकास आघाडीला किती फायदा? महायुतीला नुकसान किती?

महाराष्ट्रात विधानसभा निवडणुका तोंडावर आल्या आहेत. महिना-दीड महिन्यात आचारसंहीताही लागू शकते, यादरम्यान आता सर्वच पक्षांनी मोर्चेबांधणी सुरु केली आहे. जागावाटपासंदर्भात महायुती, महाविकास आघाडीतील घटकपक्ष तिढा सोडवत आहे. याच पार्श्वभुमीवर आता एमआयएमने महाविकास आघाडीला थेट ऑफर दिली असून पक्षात घ्या असं ्म्हटलं आहे.

शरद पवार, उद्धव ठाकरेंनी भ्रमात राहू नये. विधानसभेत पराभव झाला, तर आमच्यावर खापर फोडू नका. एमआयएमला मविआत सोबत घ्या, अशी थेट ऑफर एमआयएम पक्षाचे नेते इम्तियाज जलिल यांनी बुधवारी महाविकास आघाडीला दिली.

Mahayuti Devendra Fadnavis Vs Sharad Pawar Imtiaz Jalil MIM Maharashtra Assembly Election 2024

कसा कुणाला फायदा अन् नुकसान?

जर इम्तियाज जलिल यांच्या जलिल यांची ऑफरचा मविआने मनावर केला, तर महाविकास आघाडीत काँग्रेस, ठाकरे गट, शरद पवार गट, शेतकरी कामगार पार्टी, समाजवादी पक्ष आणि आता एमआयएम असे एकूण सहा पक्ष एकत्र येणार आहेत. त्यामुळे महाविकास आघाडी भक्कम होऊ शकते. यामुळे महाराष्ट्रातील राजकीय समीकरणे बदलू शकतात. याचा कितपत फायदा महाविकास आघाडीला होईल आणि महायुतीला फटका बसेल का हे आपण जाणून घेऊया...

एमआयएमला आपली ताकद कळाली!

इम्तियाज जलिल यांनी काल छत्रपती संभाजीनगरमध्ये पत्रकार परिषद घेतली होती. त्यात त्यांनी आम्ही महाविकास आघाडीत जाण्यास तयार असल्याचे म्हटले होते. मी अनावश्यक मागण्या करणार नसल्याचंही, जलिल यांनी यावेळी स्पष्ट केलं. म्हणजेच एमआयएमला निवडणुकीत काय होऊ शकतं हे लक्षात आलं आहे.

ओबीसी- मराठा आरक्षणाचा एमआयएमला फटका

राज्यात ओबीसी आणि मराठा समाजातील नेत्या आरक्षणावरुन लढे दिले जात आहेत. त्यामुळे सत्ताधाऱ्यांविरोधात दोन्ही बाजूने रोष आहे तर विरोधकांना याचा आपसुकच फायदा मिळत आहे. अशा स्थितीत महायुतीला फटका बसू शकतो तर दुसरीकडे एमआयएला या दोन्ही आरक्षण लढ्याचा फटका बसला आहे. हे औरंगाबाद लोकसभा मतदारसंघातील निवडणुकीतून दिसून आले इथे एमआयएमचा पराभव झाला होता. मागच्यावेळी इम्तियाज जलील हे एमआयएम पक्षातील नेते खासदार होते.

आधी प्रकार वंचित आता एमआयएम

मविआत येण्यासाठी काल इम्तियाज जलील यांनी ऑफर दिली त्याआधी एमआयएमचाच मित्र पक्ष राहीलेल्या वंचितनेही लोकसभा निवडणुकीपुर्वी आधी ठाकरेंच्या शिवसेनेला आणि नंतर महाविकास आघाडीला अशीच ऑफर दिली होती पण त्यांच्यात जागावाटपावरुन युती होऊ शकली नाही शेवटी वंचितने स्वबळावर निवडणूक लढवली होती.

महायुतीला बसू शकतो फटका

इम्तियाज जलील यांनी एमआयएमतर्फे महाविकास आघाडीत येण्याची ऑफर दिल्यानंतर महायुतीत टेन्शन वाढलं हे नक्कीच आहे. पण याचा थेट फटका महायुतीला बसणार हे निश्चितच मानले जात आहे. जर एमआयएम महाविकास आघाडीत सहभागी झाली तर आघाडीचे बळ वाढेल व जी महायुती आणि महाविकास आघाडीत जनमताचा 1 टक्क्यांचा फरक आहे त्यात अंतर पडू शकते अर्थात महायुती येत्या विधानसभा निवडणुकीत बॅकफूटवर जाऊ शकते.

काल काय म्हणाले होते इम्तियाज जलील?

त्यांच्यात घेण्याची थेट ऑफर इम्तियाज जलिल यांनी यावेळी दिली. ते म्हणाले, लोकसभेच्या भ्रमात राहू नका. एमआयएमचे महत्व ओळखा. मी चर्चेला यायला केव्हाही तयार आहे. पण तुम्ही नकार दिला तर पराभवाला आम्हाला जबाबदार धरू नका. २९ ऑगस्टला आमचा विधानसभेचा आराखडा तयार होईल. आम्ही ३० जागांची चाचपणी केली आहे. मी स्वतःही विधानसभा लढविणार असल्याचेही जलिल यांनी स्पष्ट केलं.

यावर राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी इम्तियाज जलिल आमच्यासोबत यायला तयार आहेत. ते वैयक्तीक कुणाशी बोललेले नाहीत. मात्र आम्ही तिन्ही पक्ष व मित्रपक्षांना विचारून निर्णय घेऊ. जयंत पाटील यांनी एमआयएम बरोबर युती करण्यास एक प्रकारे तेही तयार आहेत हे म्हणावे लागेल.

Notifications
Settings
Clear Notifications
Notifications
Use the toggle to switch notifications
  • Block for 8 hours
  • Block for 12 hours
  • Block for 24 hours
  • Don't block
Gender
Select your Gender
  • Male
  • Female
  • Others
Age
Select your Age Range
  • Under 18
  • 18 to 25
  • 26 to 35
  • 36 to 45
  • 45 to 55
  • 55+