Get Updates
Get notified of breaking news, exclusive insights, and must-see stories!

मोठी बातमी; 'या' 8 जिल्ह्यांना हाय अलर्ट; वादळ, वारे, वीजांसह गारपीटीची शक्यता, हवामान विभाग म्हणते

राज्यात अवकाळी पावसाचा अंदाज व्यक्त करण्यात येत असतानाच आता हवामान विभागाने (IMD) पुन्हा एकदा टेन्शन वाढविणारी बातमी सांगितली आहे. कमी दाबाचा पट्टा तयार झाल्यामुळे सध्या राज्यात पुन्हा एकदा गारपिटीसह अवकाळी पावसाचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. पुण्यासह आठ जिल्ह्यांना हाय अलर्ट देण्यात आला आहे. पुढील २४ तास धोक्याचे असल्याचे हवामान विभागाचे म्हणणे आहे.

Meteorological Department warning

काय म्हणतंय हवामान खाते?

हवामान विभागाने महाराष्ट्रातील आठ जिल्ह्यांना हाय अलर्ट दिला आहे. वादळी वाऱ्यासह गारपिट होण्याचा धोका व्यक्त करण्यात आला आहे. महाराष्ट्र्रातील अनेक जिल्ह्यांत गारपिट होण्याचा अंदाज व्यक्त केला गेला असल्याने, शेतकऱ्यांचे टेन्शन वाढले आहे. वादळी वाऱ्यासह पाऊस पडेल, असेही हवामान खात्याचे म्हणणे आहे. येत्या २४ तासांत वाऱ्याचा वेग ताशी 40 ते 45 किमी इतका असेल, असंही सांगितलं आहे.

विजेच्या कडकडाटाची शक्यता

हवामान विभागाने वादळी वाऱ्यासह विजांच्या कडकडाटासह पाऊस पडणार असल्याचं सांगितलं आहे. नागरिकांनी घराबाहेर पडताना काळजी घ्यावी, असं आवाहनही हवामान खात्याकडून करण्यात आले आहे. पुढील 24 तासांमध्ये राज्यातील अनेक भागांमध्ये मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. वाऱ्याचा वेग ताशी ४५ किलोमिटर राहिल, असे सांगण्यात आल्याने अनेकांची चिंता वाढली आहे.

कोणत्या जिल्ह्यांना दिला इशारा?

हवामान विभागाने सांगितल्याप्रमाणे आज सकाळी पुणे आणि पिंपरी- चिंचवडला अवकाळी पावसाने झोडपून काढले. पुढील 3 ते 4 तासांत मुसळधार पावसाचा अंदाज वर्तविण्यात आला आहे. पिंपरी- चिंचवड शहरात अवकाळी पावसाने जोरदार हजेरी लावली. अर्धा ते पाऊण तास झालेला पावसाने सखल भागात पाणी साचले. ऐन शाळा सुटण्याच्या वेळेत पाऊस झाल्याने शाळकरी मुलांनी पावसात भिजण्याचा आनंद घेतला. पावसामुळे हवेत गारवा निर्माण झाल्यानं पुणेकरांना वाढत्या उष्णतेपासून दिलासा मिळाला आहे. दुसरीकडे सोलापूर जिल्ह्यात देखील पावसानं जोरदार हजेरी लावली. मेघगर्जनेसह पाऊस झाला. या पावसामुळे चांगलाच गोंधळ उडाला. आता हवामान विभागाकडून छत्रपती संभाजीनगर, नाशिक, अहिल्यानगर, लातूर, धाराशिव, नांदेड आणि बीडमध्ये पावसाचा इशारा देण्यात आला आहे.

Notifications
Settings
Clear Notifications
Notifications
Use the toggle to switch notifications
  • Block for 8 hours
  • Block for 12 hours
  • Block for 24 hours
  • Don't block
Gender
Select your Gender
  • Male
  • Female
  • Others
Age
Select your Age Range
  • Under 18
  • 18 to 25
  • 26 to 35
  • 36 to 45
  • 45 to 55
  • 55+