HSC Board: बारावीत कमी गुण मिळाले? पेपर रिचेकसाठी HSC बोर्डाची प्रक्रीया अन् शेवटची तारीख घ्या जाणून
HSC Board 12th Paper Recheck Process : राज्यात सुमारे 15 लाखांवर विद्यार्थ्यांनी बारावीची परीक्षा दिली आणि नुकताच बारावी परिक्षेचा निकाल हाती येत आहे. परिक्षेत ग्राह्य धरलेले असतात जास्त गुण मिळतात कमी असे अनेकांच्या बाबतीत घडते, पेपर तपासताना त्रुटी तर झाल नसेल ना..अशीही शंका येते, त्यामुळे अनेकांना पेपर रिचेक कसा करावा, त्याची प्रक्रीया काय असते, हेच समजत नाही.
बारावीच्या परिक्षेत जर तुम्हाला किंवा तुमच्या पाल्यांना कमी गुण प्राप्त झाले असेल किंवा विद्यार्थी नापास झाला असेल तर अशा स्थितीत तुमच्याकडे पेपर पुन्हा तपासणीचा अधिकार असतो. तुम्ही पेपर तपासण्यासाठी महाराष्ट्र माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडे दाद मागू शकता.

एचएचसी बोर्डाकडे तुम्ही पेपर पुन्हा तपासण्यासाठी अर्ज करु शकता. त्याच्या काही सोप्या प्रक्रिया आहेत, या प्रक्रीया समजून तुम्हाला पेपर रिचेक करता येऊ शकतो. तशी सोयही शिक्षण मंडळाने करुन दिली आहे. पेपर रिचेकसाठी पाठवण्याच्या दोन प्रक्रीया आहेत त्या आपण समजून घेऊया.
परीक्षेचा पेपर रिचेक करण्यासाठी या आहेत एचएचसी बोर्डाच्या सूचना
पेपर रिचेक करण्यासाठी शिक्षण मंडळाच्या वेबसाईटवरही आवेदन करता येतात, किंवा ज्या कनिष्ठ महाविद्यालयात आपण शिकत आहात तिथे तु्म्हाला अर्ज करण्याची सोय उपलब्ध करुन देण्यात आली आहे.
हेही वाचा : HSC 12th result 2025 today: आज बारावीचा निकाल! कोणकोणत्या वेबसाईटवर लागणार अन् कसा बघायचा जाणून घ्या
रिचेकसाठी वेबसाईटवरुन अर्ज करावा
ऑनलाईन निकालानंतर उच्च माध्यमिक प्रमाणपत्र बारावी परीक्षा दिलेल्या विद्यार्थ्यांना स्वःतच्या अनिवार्य विषयांपैकी (श्रेणी विषयांव्यतिरिक्त) कोणत्याही विशिष्ट विषयात त्याने संपादन केलेल्या गुणांची पडताळणी करता येते.
उत्तर पत्रिकांच्या छायांकित प्रती, पुर्नमुल्यांकनासाठी (रिचेक) संबंधित विभागीय मंडळाकडे ऑनलाईन पद्धतीने मंडळाच्या अधिकृत वेबसाईटवर पाठवता येऊ शकतात. शिक्षण मंडळाच्या mahahsscbord.in वर विद्यार्थ्यांना अर्ज करता येतो.
हेही वाचा : HSC 12th result : आज निकाल, पण बारावीनंतर काय करायचे? जास्त पगारासाठी कोणता कोर्स करावा, घ्या जाणून
महाविद्यालयामार्फत रिचेकसाठी अर्ज कसा करावा
जर तुम्हाला जास्त गुण मिळण्याची अपेक्षा असतानाही कमी गुण प्राप्त झाले अथवा एखाद्या विषयात तु्म्ही अनुउत्तीर्ण झाल्यास तुम्ही ज्या कनिष्ठ महाविद्यालयामार्फत शिकला आहात, तिथे संपर्क करावा. त्या महाविद्यालयातून शिक्षण मंडळाकडे अर्ज करण्याची सोय उपलब्ध करुन देण्यात आली आहे. यासाठी आवश्यक अटी शर्ती आणि सुचना संकेतस्थळावर देण्यात आलेल्या आहेत.
पेपर रिचेकसाठी कधीपर्यंत अर्ज करु शकता?
आपला पेपर रिचेक करण्यासाठी व उत्तरपत्रिकेची सत्यप्रत मिळवम्यासाठी 6 मे 2025 ते 20 मे 2025 या कालावधीत ऑनलाईन पद्धतीने अर्ज करता येणार आहे. त्यासोबतच ऑनलाईन पद्धतीने शुल्क डेबीट कार्ड, क्रेडिट कार्ड, युपीआय किंवा नेटबँकींग याद्वारे भरता येणार असल्याचे शिक्षण मंडळाने सांगितले आहे.












Click it and Unblock the Notifications